Showing posts with label milind gunaji. Show all posts
Showing posts with label milind gunaji. Show all posts

Saturday, 23 July 2016

मिलिंद गुणाजी

आज (२३ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "द्रोह काल", "सलमा पे दिल गया है", "दो राहें", "ज़ोर", "विरासत", "हज़ार चौरासी की माँ", "ज़ुल्म-ओ-सितम", "त्रिशक्ति", "गॉडमदर", "ज़ुल्मी", "ज़िन्दगी ज़िन्दाबाद", "जिस देश में गंगा रहता है", "मुलाकात", "अंश", "देवदास", "देव", "असंभव", "मिस्टर प्राइम मिनिस्टर", "ताजमहल", आणि "एलान" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. सोबतच त्यांना पर्यटनाची पण विशेष आवड आहे. याच विषयावर त्यांनी पुस्तके पण लिहिली आहे. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.milindgunaji.in या संकेत स्थळाला भेट देऊ शकता. 

Friday, 30 October 2015

"बेदर्दी", "ते आठ दिवस" आणि "ठण ठण गोपाल"

या आठवड्यात तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, "बेदर्दी", "ते आठ दिवस" आणि "ठण ठण गोपाल".

साहिल सेठ दिग्दर्शित "बेदर्दी" मध्ये कौटुम्बिक कथा साकरण्यात आली असून यात ओमकार कुलकर्णी आणि अरुण नलावडे यांची प्रमुख भूमिका आहे.

श्याम स्वर्णलता धानोरकर दिग्दर्शित "ते आठ दिवस" मध्ये रेणुका शहाणे, तुषार दळवी, आरोह वेलणकर, अतुल तोडणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट आई आणि मुलगी यातील नाते अधोरेखित करणारा आहे.

या आठवड्यात ''ठण ठण गोपाल" हा चित्रपट सुद्धा प्रदर्शित होत आहे, कार्तिक शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात मिलिंद गुणाजी, मिलिंद गवली आणि विवेक चाबुकस्वार यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

किरण नाटकी