Showing posts with label ravindra mahajani. Show all posts
Showing posts with label ravindra mahajani. Show all posts

Wednesday, 7 October 2015

रवीन्द्र महाजनी

आज (७ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते रवीन्द्र महाजनी यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 
सत्तरच्या दशकात आपल्या प्रसन्न व्यक्तीमत्वामुळे रविन्द्र महाजनी मराठी चित्रपट सृष्टितील चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जायचे. त्यांनी मराठी सोबतच काही हिंदी आणि गुजराती चित्रपटात पण अभिनय केला आहे. मराठीमध्ये त्यांनी ''जुलुम" या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. "आराम हराम आहे", "मरी हेल उतारो राज", "दुनिया करी सलाम", "तीन चेहरे", "चोरावर मोर", "गोंधळात गोंधळ", "लक्ष्मीचे पाऊले", "बेआबरू", "मुंबईचा फौजदार", "बढ़कर", "गंगा किनारे", "नैन मिले चैन कहाँ", "कानून कानून है", "वहम" आणि "गूंज" हे त्यांचे प्रमुख चित्रपट आहेत. या वर्षी त्यांनी ''काय राव तुम्ही" या चित्रपटातून मराठी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. त्यांचे चिरंजीव गश्मीर महाजनी यांनी या वर्षी चित्रपट सृष्टित पदार्पण केले असून ते सुद्धा वडिलाच्या पाऊलवाटेवर यशस्वीपणे पुढे जात आहेत.

Thursday, 2 April 2015

''कॉफी आणि बरेच काही'' आणि ''काय राव तुम्ही''

उद्या ''कॉफी आणि बरेच काही'' आणि ''काय राव तुम्ही'' हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

रवी जाधव प्रस्तुत व प्रकाश कुंटे दिग्दर्शित ''कॉफी आणि बरेच काही'' हि एक फ्रेश प्रेम कथा आहे. प्रकाश कुंटे यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावलकर, विवेक तत्ववादी, भूषण प्रधान, प्राथना बेहरे, नेहा महाजन, सुहास जोशी अशी स्टारकास्ट आहे. ''हंटर''मध्ये विवेक तत्ववादी हे सरप्राइज़ पैकेज होते, ''हंटर''मध्ये त्यांच्या भूमिकेमुळे त्यांचा चाहता वर्ग वाढला आहे, त्याचा फायदा ''कॉफी आणि बरेच काही''ला होईल अशी अपेक्षा करुया. ''मितवा''मुळे प्राथना बेहरे यांचा सुद्धा प्रेक्षकवर्ग बराच वाढला आहे.  

उद्या प्रदर्शित होणारा दूसरा चित्रपट डॉ मृणालिनी पाटिल दिग्दर्शित ''काय राव तुम्ही'' हा आहे. या चित्रपटात रविन्द्र महाजनी, सतीश पुळेकर, हेमंत ढोमने, नित्या जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ''काय राव तुम्ही'' हा विनोदी चित्रपट असून, हा चित्रपट तुम्हाला वरिष्ठ नागरिकांची प्रेम कथा दाखवणार आहे. मागच्या वर्षी डॉ मृणालिनी पाटिल यांचा ''राखणदार'' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. डॉ मृणालिनी पाटिल सध्या मराठी चित्रपट सृष्टिमध्ये नियमितपणे सक्रिय असलेल्या महिला दिग्दर्शिकांपैकी एक आहेत.

किरण नाटकी