आज (६ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! परेश मोकाशी हे आज मराठी चित्रपटसुष्टीतील महत्वाचे दिग्दर्शक आहेत. त्यांना त्यांच्या "हरिचंद्राची फैक्टरी" या पहिल्या चित्रपटासाठी बराच संघर्ष करावा लागला. हा चित्रपट दादासाहेब फालके यांच्या जीवनावर आधारीत होता. प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक झाले. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवला गेला. "एलिज़ाबेथ एकादशी" हा त्यांचा दूसरा मराठी चित्रपट होता. या चित्रपटाला रसिक आणि समीक्षक दोघांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्करांमध्ये सर्वोकृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला.
Showing posts with label harichandrachi factory. Show all posts
Showing posts with label harichandrachi factory. Show all posts
Saturday, 6 February 2016
Sunday, 9 November 2014
एलिज़ाबेथ एकादशी
''हरीचंद्राची फैक्टरी''नंतर आता परेश मोकाशी ''एलिज़ाबेथ एकादशी'' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा हा नवीन मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी १४ नवंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी खुप उत्सुकता दिसून येत आहे. फेसबुकवर या चित्रपटाच्या पेजला एका महिन्यातच जवळपास २५ हजार लाइक्स मिळालेले आहेत. या पेजच्या माध्यमातून अतिशय कल्पकपणे या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आहे.
एलिज़ाबेथ व एकादशी या एकमेकांशी कुठल्याही प्रकारे सम्बन्ध नसलेल्या शब्दांना जोडून या चित्रपटाला ''एलिज़ाबेथ एकादशी'' असे नाव ठेवण्यात आलेले आहे. या चित्रपटाची कथा पंढरपुरमध्ये राहणाऱ्या मुलावर आधारित आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सायकलचा अतिशय सुंदरपणे वापर करण्यात आलेला आहे. कदाचित या चित्रपटामध्ये एलिज़ाबेथ हे ह्या सायकलचे नाव असावे. नक्की काय ते तर येत्या शुक्रवारीच कळणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...

