Showing posts with label Khel Mandla. Show all posts
Showing posts with label Khel Mandla. Show all posts

Tuesday, 26 July 2016

विजू माने

आज (२६ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक विजू माने यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! ''गोजिरी'', ''ती रात्र'', ''शर्यत'' व ''खेळ मांडला'' या चित्रपटांचे दिग्दर्शक विजु माने वेगवेगळ्या विषयावर अतिशय देखणे चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ''बॉयोस्कोप''मध्ये विजु माने यांनी किशोर कदम ''सौमित्र'' यांच्या कवितेवर आधारित ''एक होता काऊ'' या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षक त्यांच्या येणाऱ्या ''चूक भूल द्यावी घ्यावी'' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. ''चूक भूल द्यावी घ्यावी'' हा मराठीतील पहिला रोड मूवी प्रकरातील चित्रपट असणार आहे. 

Wednesday, 17 February 2016

प्रसाद ओक

आज (१७ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्रसाद ओक यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रसाद ओक हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आतापर्यंत अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, गायक, सूत्र संचालक, कवी आणि चित्रपट निर्माता अश्या वेगवेगळया भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ते २०११ साली झालेल्या सारेगामापा च्या सेलिब्रिटी पर्वाचे विजेते होते. सध्या "कच्चा निम्बू" या चित्रपटाचे दिग्दर्शन ते करत आहेत.  

किरण नाटकी