Saturday, 1 August 2015

''देऊळ बंद'',''जाणिवा'' आणि ''ओळख''

काल तीन चित्रपट प्रदर्शित झालेत ''देऊळ बंद'', ''जाणिवा'' आणि ''ओळख''.

''देऊळ बंद''च्या निमित्ताने प्रख्यात लेखक प्रवीण तरडे दिग्दर्शक म्हणुन पदार्पण करीत आहेत. ''देऊळ बंद''मध्ये देवांवर विश्वास न ठेवणार्या शास्त्रद्यांची गोष्ट सांगितली आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्ये म्हणजे यात मोहन जोशी, श्री स्वामी समर्थच्या भूमिकेत दिसणार आहे. मागील आठवड्यात ''कैर्री ऑन मराठा'' मधून मराठी चित्रपट सृष्टित पदार्पण केलेले गश्मीर महाजनी या चित्रपटात शात्रद्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये गिरीजा जोशी, मोहन आगाशे, निवेदिता सराफ, श्वेता शिंदे, सतीश आळेकर, शर्वरी जेमनीस, सुनील अभ्यंकर, प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, रमेश परदेशी, देवेन्द्र गायकवाड, दिपक करंजीकर आणि आर्या घरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

राजेश रणशिंगे दिग्दर्शित ''जाणिवा'' प्रख्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे चिरंजीव सत्या मांजरेकर मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण करीत आहेत. ''जाणिवा''ची कथा आजचा युवक व त्यांच्या सामजिक जबाबदारीवर भाष्य करते, या चित्रपटाला एका वास्तव घटनेची पार्श्वभूमी देण्यात आलेली आहे. या चित्रपटात वैभवी शांडिल्य, अनुराधा मुखर्जी, देवदत्त दाणी, संकेत अग्रवाल, किरण करमाकर, रेणुका शहाणे, अतुल परचुरे, इंदिरा कृष्णन, सलिल अंकोला, उषा नाडकर्णी आणि किशोर कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

जमिल खान दिग्दर्शित ''ओळख'' हा चित्रपट सुद्धा या शुक्रवारी प्रदर्शित झालाय. या चित्रपटात भूषण पाटिल, अलका आठल्ये, अरुण नलावडे, खुशबू तावडे, अंजली उजवणे, अनुज नाईक, नंदकुमार पाटिल आणि गणेश यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.      

No comments:

Post a Comment

किरण नाटकी