Saturday, 8 August 2015

''गुरुकुल'', ''नीलकंठ मास्तर'', ''शॉर्टकट'' आणि ''सुपर्ब प्लान''

या शुक्रवारी पुन्हा एकदा मराठी चित्रपटांची भाऊ गर्दी बघायला मिळाली. तब्बल चार मराठी चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झालेत, ते आहेत ''गुरुकुल'', ''नीलकंठ मास्तर'', ''शॉर्टकट'' आणि ''सुपर्ब प्लान''.

रोमेल रॉड्रिग्स दिग्दर्शित ''गुरुकुल'' मध्ये नागेश भोसले आणि विद्याधर जोशी यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सध्याच्या शिक्षण क्षेत्रातील भष्टाचारावर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटात असित रेडजी, प्रशांत मोहिते, प्रदीप कुँवर, स्वप्निल जोशी, सोनाली शेवले, नेहा खान आणि रीना लीमन यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

गजेन्द्र अहिरे दिग्दर्शित ''नीलकंठ मास्तर'' मध्ये १९४२ चा स्वत्रंतपूर्व काळ साकारण्यात आला आहे. या चित्रपटात पूजा सावंत आणि नेहा महाजन या युवा अभिनेत्री अतिशय वेगळया भूमिकेत दिसणार आहे. गजेन्द्र अहिरे नेहमीच कलाकारांकडून वेगळया प्रकारच्या भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे करवून घेतात. या चित्रपटात विक्रम गोखले, आदिनाथ कोठारे, किशोर कदम, ओमकार गोवर्धन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

''शार्टकट'' या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून बहुधा पहिल्यांदाच हैकिंग हा विषय हाताळण्यात आला आहे. हरीश राऊत दिग्दर्शित या चित्रपटामध्ये राजेश श्रृंगारपुरे, वैभव तत्ववादी, संस्कृती बालगुड़े आणि नरेश बिडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आजच्या तरुणाईची आवड लक्षात घेऊन ''शार्टकट''ची निर्मिती करण्यात आली आहे.

जय तरी दिग्दर्शित ''सुपर्ब प्लान'' हा चित्रपट कॉर्पोरेट जगतातील स्पर्धेवर आधारीत सस्पेंस चित्रपट असून या चित्रपटात तृप्ती भोईर, सत्यानन्द गायतोंडे, गिरीश परदेशी, राजेन्द्र सिसटकर,अतुल तोडणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

No comments:

Post a Comment

किरण नाटकी