Saturday 22 August 2015

''भय''च्या निमित्ताने

आगामी ''भय'' या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांची महत्वाची भूमिका आहे. याच वर्षी जून महिन्यात प्रदर्शित झालेल्या ''टाइम बरा वाईट'' या चित्रपटात ही त्यांनी भैया राजा नावाच्या डॉनची दमदार भूमिका साकारली होती. त्यांच्या या चित्रपटातील अभिनयाचे समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी कौतुक करून त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे त्यांच्या ''भय'' मधील भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे, ''भय''च्या निमित्ताने पुन्हा एकदा दिग्दर्शकांच्या अभिनयाची जादू बघायला मिळणार आहे. दिग्दर्शक हा अभिनेत्यांकडून अभिनय करून घेतो पण जेव्हा दिग्दर्शक मोठ्या पद्यावर अभिनय करतात जेव्हा त्यांचा अभिनय बघण्यात वेगळीच मजा असते. या लेखात आपण सध्या अभिनय करणाऱ्या काही दिग्दर्शकांचा आढावा घेणार आहोत. सतीश राजवाडे यांनी ''प्रेमाची गोष्ट'' या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात स्वराज ही नायकाच्या मित्राची भूमिका केली होती, ही भूमिका अतिशय ग्रेसफुल होती व ती तितक्याच चांगल्या प्रकारे त्यांनी साकारली होती. त्यांच्या करियरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ''वास्तव'' आणि ''हजार चौरासी की माँ'' या हिंदी चित्रपटात सुद्धा भूमिका केल्या होत्या.    

''फँड्री'' या पहिल्याच चित्रपटातून संवेदनशील दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण करणारे नागराज मंजुळे यांनी सुद्धा त्यांच्या दिग्दर्शनाबरोबर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले आहे. ''फँड्री'' या चित्रपटात त्यांनी दिग्दर्शन व अभिनय या दोन्ही बाजू समर्थपणे पेलल्या होत्या. त्यानंतर त्यांनी निखिल महाजन दिग्दर्शित ''बाजी'' मध्ये इंस्पेक्टरची भूमिका साकारली होती. आता ते पुन्हा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ''हायवे'' या चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

''गोजिरी'', ''ती रात्र'', ''शर्यत'', ''खेळ मांडला'' आणि ''बायस्कोप (एक होता काऊ)'' सारखे देखणे चित्रपट दिग्दर्शित करणारे विजु खोटे सुद्धा ''रेगे'' आणि ''टाइम पास २'' या चित्रपटांमधून अभिनय करताना दिसले होते. रवी जाधव सुद्धा निखिल महाजन यांच्या ''बाजी'' या चित्रपटात झळकले होते.  

No comments:

Post a Comment

किरण नाटकी