Sunday 28 June 2015

जुलै महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस

जुलै महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस 

  • १ जुलै - यतिन कर्येकर (अभिनेता)
  • २ जुलै - अन्विता फलटणकर (अभिनेत्री)
  • २ जुलै - हर्षदा खानविलकर (अभिनेत्री)
  • ४ जुलै - कार्तिक शेट्टी (दिग्दर्शक)
  • ४ जुलै - समीर रमेश सुर्वे (दिग्दर्शक)
  • ७ जुलै - अभिजीत खांडकेकर (अभिनेता)
  • ७ जुलै - अनिल कुमार सकत (छायाचित्रकार)
  • ७ जुलै - भारत गायकवाड (दिग्दर्शक)
  • ८ जुलै - अमोल भावे (दिग्दर्शक)
  • ८ जुलै - अविनाश नारकर (अभिनेता) 
  • ९ जुलै - तेजश्री खेले (अभिनेत्री) 
  • १० जुलै - आदित्य इंगळे (दिग्दर्शक)
  • १० जुलै - वैष्णवी रणदिवे (अभिनेता)  
  • ११ जुलै - अतुल परचुरे (अभिनेता)   
  • १३ जुलै - अतुल जगदाले (दिग्दर्शक) 
  • १३ जुलै - मेधा मांजरेकर (अभिनेत्री)   
  • १३ जुलै - स्नेहल विळणकर (अभिनेत्री) 
  • १४ जुलै - बाळकृष्ण शिंदे (अभिनेता)      
  • १५ जुलै - चारुशीला वाच्छानी (अभिनेत्री)  
  • १५ जुलै - पिताम्बर काळे (दिग्दर्शक)  
  • १५ जुलै - पुष्कर जोग (अभिनेता)       
  • १६ जुलै - स्वप्ना वाघमारे जोशी (दिग्दर्शक)  
  • १६ जुलै - वंदना गुप्ते (अभिनेत्री)    
  • १८ जुलै - गुरु ठाकुर (गीतकार)
  • १८ जुलै - श्रीहरी साठे (दिग्दर्शक)  
  • २० जुलै - गणेश यादव (अभिनेता)       
  • २० जुलै - नितिन कांबळे (दिग्दर्शक)  
  • २२ जुलै - मकरंद अनासपुरे (अभिनेता)         
  • २३ जुलै - मिलिंद गुणाजी (अभिनेता)         
  • २३ जुलै - मोहन आगाशे (अभिनेता) 
  • २५ जुलै - सलीम शेख (दिग्दर्शक)  
  • २६ जुलै - विजु माने (दिग्दर्शक)  
  • २७ जुलै - प्रणव रावराणे (अभिनेता) 
  • २८ जुलै - राजन कोठारकर (दिग्दर्शक)   
  • २८ जुलै - संजय छाब्रिया (निर्माता)
  • २९ जुलै - राजेश पिंजानी (निर्माता) 

Thursday 25 June 2015

Marathi Movies Released during January to June 2015

List of Marathi Movies Released during January 2015 to June 2015

Release Date
Movie Name
Director
Actors
02-Jan
Lokmanya Ek Yugpurush
Om Raut
Subodh Bhave, Chinmay Mandlekar, Angad Mhaskar, Sameer Sanjay Vidwans, Prashant Uthale, Priya Bapat, Shweta Bhende, Deepesh Shah, Vikram Gaikwad
16-Jan
Classmates
Aditya Sarpotdar
Ankush Choudhary, Sonalee Kulkarni, Sai Tamhankar, Sushant Shelar, Sachit Patil, Siddharth Chandekar, Suyash Tilak, Pallavi Patil, Sanjay Mone, Kishori Shahane, Ramesh Dev
23-Jan
Balkadu
Atul Kale
Umesh Kamat, Neha Pendse
30-Jan
Ek Tara
Avadhoot Gupte
Santosh Juvekar, Tejaswini Pandit, Urmila Nibalkar, Sagar Karande, Amol Gupte, Mangesh Desai, Abhedya Gupte, Raiees Lashkaria, Sunil Tawade, Chaitanya Chandratre, Santosh Mayekar
06-Feb
Baaji
Nikhil Mahajan
Shreyas Talpade, Amruta Khanvilkar, Jitendra Joshi
13-Feb
Mitava
Swapna Waghmare-Joshi
Swwapnil Joshi, Sonalee Kulkarni, Prarthana Behere, Illa Bhate
20-Feb
Chitrafit 3.0 Mega Pixel
Divakar Ghodake
Seema Azmi, Ashish Pathode, Ravi Patwardhan, Gauri Shankar, Shefali Maydeo, Dansing Rajput, Mike Hevan, Nerav Soni, Vinita, Mahesh Rale, Isha, Sachin Kabir, Vipul Patil, Meenal Chirankar, Komal, Suhas Shirsath
27-Feb
Razzakar
Raj Durge
Siddharth Jadhav, Jyoti Subhash, Zakhir Hussian
27-Feb
Paisacha Paus
Jagdish Vatharkar,  Shailendra Patil
Sayyaji Shinde, Suhas Palshikar, Kamalakar Satpute
06-Mar
Katti Batti
Yuvraj Pawar
Arun Nalawade, Vilas Ujavane, Jayraj Nayar, Sanjivani Jadhav, Ketan Pawar, Pritam Bhujbalrao, Prajakta Yadav
13-Mar
Bugadi Maajhi Sandali Ga
Mansingh Pawar
Kashyap Parulekar, Manasi Moghe, Mohan Joshi, Deepa Chafekar, Ramesh Bhatkar, Ila Bhate, Baba Chauhan
13-Mar
Pikali


13-Mar
Jara Japun Kara
Rakesh Kakria
Sharad Ponkshe, Sanjay Khapare, Aniket Kelkar, Priya Gamre, Prajakta Kelkar, Bhooshan Ghadi, Arun Khandagale, Datta Ubale
27-Mar
Just Gammat
Milind Arun Kavade
Sanjay Narvekar, Jitendra Joshi, Smita Gondkar, Aditi Sarangdhar, Atul Todankar, Deepak Shirke, Vijay Patkar, Aarti Solanki, Jaywant Wadkar, Arun Kadam, Sanjay Kulkarni, Dinesh Hingu, Jayaraj Nair, Ananda Karekar, Deepjyoti Naik, Nayan Jadhav
03-Apr
Cofee Ani Barech Kahi
Prakash Kunte
Vaibhav Tatwawadi, Bhushan Pradhan, Prarthana Behere, Bhushan Pradhan, Neha Mahajan, Anita Date, Suyash Tilak, Vidyadhar Joshi, Ashwini Ekbote, Sandesh Kulkarni, Dilip Prabhavalkar, Suhas Joshi, Avinash Narkar, Anuja Sathe, Bappa Joshi
03-Apr
Kay Rao Tumhi
Dr.Mrunalinni Patil
Ravindra Mahajani, Yateen Karyekar, Satish Pulekar, Hemant Dhome, Niyati Joshi
03-Apr
Prem At First Sight
Santosh Mainkar
Sumaydh Gaikwad, Shweta Pagar, Suchet Gavai
10-Apr
Kakan
Kranti Redkar
Jitendra Joshi, Urmila Kanetkar Kothare, Madhavi Juvekar-Kulkarni, Aashok Shinde, Ashitosh Gaikwad,  Aakash Banerjee
17-Apr
Court
Chaitanya Tamhane
Vivek Gomber, Geetanjali Kulkarni, Vira Sathidar, Pradeep Joshi, Usha Bane, Shirish Pawar
17-Apr
Te Do Divas
Devendra Dodake
Alka Kubal, Mohan Joshi, Arun Nalawade, Chinmay Deshkar, Prasiddhi Ayalwar, Dr. Vilas Ujawane, Roopali Kondewar-More, Sanjeet Dhuri
17-Apr
What About Sawarkar
Rupesh Katare, Nitin Gawde
Sharad Ponkshe, Avinash Narkar, Atul Todankar, Shrikant Bhide, Sara Shravan
24-Apr
Aatali Batali Futali
Amol Padave
Smita Talvalkar
24-Apr
Mhais
Shekhar Naik
Jitendra Joshi, Sanjay Mone
01-May
Timepass 2
Ravi Jadhav
Priyadarshan Jadhav, Priya Bapat, Prathamesh Parab, Ketaki Mategaonkar, Sandeep Pathak, Nayan Jadhav, Sameer Khandekar, Bhalchandra Kadam, Vaibhav Mangale, Chinmay Kelkar, Aarti Wadagbalkar, Kshiti Jog, Urmila Kanitkar, Bhushan Pradhan, Uday Sabnis, Sampada Jogalekar, Supriya Pathare, Shashank Kevale
15-May
Runh
Vishal D Gaikwad
Omkar Govardhan, Manoj Joshi, Narayani Shastri, Rajeshwari Sachdev , Anant Jog, Vijay Patkar, Vinay Apte, Jairaj Nayar
15-May
Sasu Cha Swayamwar
Omkar Mane
Pushkar Jog, Vishakha Subhedar, Teja Deokar, Vijay Chavan, Sunil Pal, Jaywant Wadkar, Satish Tare
15-May
Yudh
Rajiv S Ruia
Rajesh Shringarpure, Tejaswini Pandit, Kranti Redkar, Vishnu
22-May
Aga Bai Arechyaa 2
Kedar Shinde
Sonali Kulkarni, Bharat Jadhav, Prasad Oak, Madhav Deochake, Surabhi Hande
22-May
Dabba Ais Pais
Manish Joshi
Sadashiv Amrapurkar, Ganesh Yadav, Kashmira Kulkarni
22-May
Goa 350 Km
Amol Padave
Yatin Karyekar, Sanjay Mone, Gaurav Gatnekar, Madhuri Desai, Vikas Bangar, Dhanshree Kadhgaonkar
22-May
Pashbandh
Anand Oroskar
Nandita Dhuri
29-May
Dhurandhar Bhatwadekar
Kshitij Zarapkar
Mohan Joshi, Mohan Agashe
29-May
Paying Ghost
Sushrut Bhagwat
Umesh Kamat, Spruha Joshi, Pushkar Shrotri, Sharvani Pillai, Anita Date, Atul Parchure
29-May
Prime Time
Promod Kashyap
Kishore Pradhan, Milind Shintre, Sulekha Talwalkar, Krutika Deo, Nisha Parulekar, Vighnesh More, Anurag Worlikar, Gayatri Deshmukh
29-May
Siddhant
Vivek Wagh
Vikram Gokhale, Sarang Sathaye, Neha Mahajan
05-Jun
Athiti
Ashish Pujari
Vijay Chavan, Milind Shinde, Sanjay Khapre, Sanjay Mohite, Kishor Chaugule, Kishor Nandlaskar, Nayan Jadhav, Sanjivani Jadhav, Prshant Tapsvi, Anat Jog, Tejpal Wagh, Rohit Chavan
05-Jun
Sandook
Atul Kale
Sumit Raghwan, Bhargavi Chirmule, Sharad Ponkshe
05-Jun
Sata Lota Pan Sagla Khota
Shrabani Deodhar
Adinath Kothare, Siddharth Chandekar, Mrunmayee Deshpande, Pooja Sawant, Makarand Anaspure
12-Jun
Nagrik
Jaypraad Desai
Sachin Khedekar, Dr. Shriram Lagoo, Dilip Prabhavalkar, Milind Soman, Devika Daftardar, Rajesh Sharma, Neena Kulkarni, Rajkumar Tangde, Sambhaji Bhagat, Sulabha Deshpande, Madhav Abhyankar
12-Jun
Oli Mati
Narendra Gaikwad
Sanket More, Sahil Patvardhan, Neha Chitnis, Priti Narnavre, Ganesh Yadav
12-Jun
Sugar, Salt & Prem
Sonali Bangera
Sonali Kulkarni, Sameer Dharmadhikari, Ajinkya Deo, Kranti Redkar, Shilpa Tulaskar, Prasad Oak
12-Jun
Tujhya Vin Mar Java
Murali Nallappa, Ashok Karlekar
Vikas Patill, Prarthana Behere, Prateeksha Lonkar, Atul Parchure
26-Jun
Dream Mall
Suraj Dattaram Mulekar
Sidharth Jadhav, Neha Joshi
26-Jun
Killa
Avinash Arun
Parth Bhalerao, Archit Deodhar, Gaurish Gawade
26-Jun
Welcome Zindagi
Umesh Ghadge
Swapnil Joshi, Amruta Khanvilkar, Mohan Agashe, Satish Alekar, Prashant Damle, Mahesh Manjrekar, Bharati Achrekar, Rajeshwari Sachdev, Vivek Lagoo, Pushkar Shrotri, Murli Sharma, Urmila Kanitkar-Kothare, Jayant Wadkar, Mahesh Manjrekar


''ड्रिम मॉल'', ''किल्ला'' आणि ''वेलकम जिंदगी''

उद्या ३ मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ''ड्रिम मॉल'', ''किल्ला'' आणि ''वेलकम जिंदगी''. 

सूरज दत्ताराम मुळेकर दिग्दर्शित ''ड्रिम मॉल'' हा थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव आणि नेहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी सिद्धार्थ जाधव यांना सर्वोकृष्ट खलनायकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या चित्रपटात मॉल मध्ये एका रात्रीत घडणाऱ्या गोष्टीची कथा आहे.

या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोकृष्ट मराठी चित्रपट न्हणुन गौरवण्यात आलेला ''किल्ला'' हा चित्रपट सुद्धा उद्या प्रदर्शित होत आहे. अविनाश अरुण या युवा दिग्दर्शकाने ''किल्ला''चे दिग्दर्शन केले आहे. ''किल्ला'' मध्ये लहान मुलांचे भावविश्व साकारण्यात आले आहे. या चित्रपटात अमृता सुभाष, पार्थ भालेराव, अर्चित देवधर, गौरीश गावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ''किल्ला''ला अनेक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गौरवण्यात आले आहे. 

उमेश घाटगे दिग्दर्शित ''वेलकम जिंदगी'' मध्ये स्वप्निल जोशी आणि अमृता खानविलकर यांची फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. या चित्रपटात मोहन आगाशे, सतीश आळेकर, प्रशांत दामले, महेश मांजरेकर, भारती आचरेकर, राजेश्वरी सचदेव, विवेक लागू, पुष्कर शोत्री, मुरली शर्मा, उर्मिला कानेटकर कोठारे आणि जयंत वाडकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. ''वेलकम जिंदगी''चा ट्रेलर आधीच यूटुबवर गाजत असून ट्रेलरमध्ये या चित्रपटाचे निर्मिती मूल्य अतिशय चांगले असल्याचे दिसून येते. अतिशय आगळ्या वेगळया विषयवार ''वेलकम जिंदगी'' ची निर्मिती करण्यात आली आहे.

सई ताम्हणकर

मराठी चित्रपट सृष्टितील बोल्ड एंड ब्यूटिफुल अभिनेत्री न्हणजे सई ताम्हणकर, अतिशय कमी वेळात  अभिनयाच्या बळावर त्यांनी मराठी चित्रपट सृष्टित आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपट सृष्टि सोबतच या वर्षी त्यांनी ''हंटर'' या हिंदी चित्रपटांमधून महत्त्वाची भूमिका साकारून हिंदी चित्रपट सृष्टित ही यशस्वी पदार्पण केले आहे, या आधी अगदी कारीयरच्या सुरवातीला त्यांनी ''ब्लैक एंड व्हाइट'' आणि ''गजनी'' या दोन मोठ्या हिंदी  चित्रपटातून भूमिका केल्या होत्या. स्वप्निल जोशी यांच्याबरोबर सईची जोडी विशेष गाजली, ''दुनियादारी'', ''मंगलाष्टक वन्स मोर'', ''प्यार वाली लव स्टोरी'' या चित्रपटांमधून हि जोडी प्रेक्षकांसमोर आली आहे. ''तू हि रे'' हा या जोडीचा आगामी चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होतोय. संजय जाधव, स्वप्निल जोशी व सई ताम्हणकर हे त्रिकुट आज मराठी चित्रपट सृष्टित यशाचे सूत्र मानले जाते. आज सई ताम्हणकर यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा.

सई ताम्हणकर यांनी अभिनय केलेले  चित्रपट

  • ब्लैक एण्ड व्हाइट (२००८)
  • सनई चौघडे (२००८) 
  • पिकनिक (२००८) 
  • गजनी (२००८) 
  • हाय काय .... नाय काय ….  (२००९)  
  • बे दुने साढे चार (२००९)
  • सुम्भरान (२००९)  
  • अजब लग्नाची गजब गोष्ट (२०१०)
  • मिशन पॉसिबल (२०१०) 
  • रीटा (२०१०) 
  • लालबाग परळ (२०१०)  
  • झकास (२०११)
  • राडा रॉक्स (२०११) 
  • दोन घडीचा डाव (२०११) 
  • पुणे ५२ (२०१२)  
  • अशाच एका बेटावर (२०१२)
  • गाजराची पुंगी (२०१२)
  • विला (२०१२)
  • नो एन्ट्री पुढे धोका आहे (२०१२) 
  • अघोर (२०१२)
  • बाबुरावला पकडा (२०१२) 
  • धागेदोरे (२०१२)
  • बालक पालक (२०१३)
  • झपाटलेला २ (२०१३)
  • दुनियादारी (२०१३)
  • टाइम प्लीज (२०१३)
  • अनुमति (२०१३)
  • मंगलाष्टक वन्स मोर (२०१३) 
  • तेंदुलकर आउट (२०१३)
  • गुरु पौर्णिमा (२०१४)
  • पोर बाजार (२०१४)
  • प्यार वाली लव स्टोरी (२०१४) 
  • पोस्ट कार्ड (२०१४)
  • सौ शशि देवधर (२०१४)
  • क्लासमेट्स (२०१५)
  • हंटर (२०१५)
  • तू हि रे (२०१५)

सई ताम्हणकर यांनी अभिनय केलेल्या टिवी मालिका

  • फु बाई फु 
  • या गोजिरवाण्या घरात 
  • अग्नी शिखा 
  • साथी रे 
  • कस्तूरी 

Monday 22 June 2015

''२ प्रेमी प्रेमाचे'', ''ब्लैकबोर्ड'', ''टाइम बरा वाईट'' आणि ''वांटेड बायको नंबर १''

आज ''२ प्रेमी प्रेमाचे'', ''ब्लैकबोर्ड'', ''टाइम बरा वाईट'' आणि ''वांटेड बायको नंबर १'' असे तब्बल ४ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहे.

कमल ठाकुर दिग्दर्शित ''२ प्रेमी प्रेमाचे'' या चित्रपटात स्वप्निल जोशी आणि गिरीजा ओक यांची जोडी बघायला मिळणार  आहे. हा चित्रपट मर्मस्पर्शी प्रेमकथेवर आधारीत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर वरुन लक्षात येते की या चित्रपटाचे चित्रीकरण बहुधा खुप पूर्वी झाले असावे. स्वप्निल जोशी यांचा चित्रपट असून सुद्धा या चित्रपटाची फारशी चर्चा झाली नाहीये.

या प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट न्हणजे ''ब्लैकबोर्ड''. दिनेश देवलेकर दिग्दर्शित हा चित्रपट सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर आधारीत आहे. ''ब्लैकबोर्ड'' मध्ये अरुण नलावडे, माधवी जुवेकर, सायली देवधर आणि मृगमयी सुपाळ यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

राहुल वाकणकर दिग्दर्शित ''टाइम बरा वाईट''ची प्रसिद्धी अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आल्यामुळे प्रेक्षकांमध्ये ''टाइम बरा वाईट'' बद्दल उत्सुकता होती. या चित्रपटाचा ट्रेलर एकदम झक्कास असून तो तुम्ही यूटुबवर बघु शकता. आता प्रत्यक्ष चित्रपट कसा आहे? हे बघणे महत्वाचे ठरेल. ''टाइम बरा वाईट'' मध्ये भूषण प्रधान, महेश मांजरेकर, सतीश राजवाड़े, निधि ओझा, ऋषिकेश जोशी, विश्वजीत प्रधान, भाऊ कदम, संजय मोने, आनंद इंगले अशी दिग्गज अभिनेत्यांची फ़ौज आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्ये न्हणजे यात प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे ''भाई राजा'' नावाच्या डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे.

या शुक्रवारी प्रदर्शित झालेला आणखी एक न्हणजे ''वांटेड बायको नंबर १'', हा विनोदी चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केले आहे. ''वांटेड बायको नंबर १'' मध्ये मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, तेजस्विनी लोणारी, स्मिता गोंदकर, संजय खापरे, मनोज टकने, मिथाली वारंग, विजय गोखले अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Wednesday 17 June 2015

''शुगर, सॉल्ट आणि प्रेम''च्या निमित्ताने

चित्रपट निर्मितीची सुरुवात साधारणत गोष्ट लिहिण्यापासून सुरु होते व त्यानंतर सगळयात महत्वाची गोष्ट न्हणजे चित्रपटाचे नाव. चित्रपटाचे नाव समर्पक असेल तर त्याचा फायदा चित्रपटाला होतो पण अनेकदा चित्रपटाचे नाव आकर्षक करण्याच्या नादात, चित्रपटाचे नाव जरा हटके ठेवण्यात येते. मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाचे नाव आहे, ''शुगर, सॉल्ट आणि प्रेम''. आता ''शुगर, सॉल्ट आणि प्रेम''च्या नावावरून काय बोध होतो? ''शुगर, सॉल्ट आणि प्रेम''च्या निमित्ताने आपण अशा जरा हटके मराठी चित्रपटाच्या बद्दल थोडी माहिती घेऊया. अशा प्रकारे खाण्यापिण्याच्या वस्तूवरून चित्रपटाचे नाव ठेवण्याची हि पहिली वेळ नाही, या पूर्वी मागील काही वर्षात ''हापूस'', ''मसाला'', ''कैफेचिनो'', ''एक कप चहा'', ''कॉफी आणि बरेच काही'' असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहे. आता ''तहान'' नावाच्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. ''कांदे पोहे'' नावाचा एक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.  आता ह्या सगळया चित्रपटाचे नाव ऐकून तुमच्या तोंडाला पाणी सुटले असेल तर त्यात नवल कसले!

अशाच प्रकारे मराठी चित्रपटाची नावे इंग्लिशमध्ये किंवा मराठी-हिंदी-इंग्लिश रीमिक्स ठेवण्याचा ट्रेंड मराठीत चित्रपट सृष्टीत मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. येत्या काळात ''ब्लैकबोर्ड'', ''ड्रिम मॉल'', ''शटर'', ''मर्डर मेस्ट्री'', ''शार्टकट'', ''बॉयोस्कोप'', ''७ रोशन विला'', ''ब्लैंकेट'', ''चीटर'', ''डिश्युम'', ''डॉट कॉम मॉम'', ''फाइव डेज'', ''फ्रेंडशिप डॉट कॉम'', ''मुंबई टाइम'', ''पोलिस लाईन'', ''रेडियो नाइट्स'', ''स्लैमबुक'', ''सनराइज'', ''सुपर्ब प्लान'', ''द साइलेंस'', ''यस आय कैन'', ''युथ'' अशा इंग्लिश नावाचे मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या सोबतच येत्या काळात ''टाइम बरा वाईट'', ''वांटेड बायको नं १'', ''वेल कम ज़िन्दगी'', ''ऑनलाइन बिनलाईन'', ''कैरी ऑन मराठा'', ''धिनचाक एंटरप्राइज २०१५'', ''नीलकंठ मास्टर'', ''तू ही रे'', ''फैमिली कट्टा'', ''राजवाडे एंड सन्स'', ''बाइकर्स अड्डा'', ''कैरी ऑन देशपांडे'', ''एक नंबर'', ''एक थ्रिलर नाईट'', ''हटके लव स्टोरी'', ''जब मिले छोरा छोरी'', ''जीत'', ''लाठी'', ''लोच्या ऑनलाइन'', ''स्टोरी हाय पण खरी हाय'', ''वा रे जिंदगी'', ''वेल डन भाल्या'', ''यारी दोस्ती'' अशा मराठी-हिंदी-इंग्लिश रीमिक्स नावाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मांगे एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते ''याचा काही नेम नाही''. असेच काही मराठी चित्रपटांच्या नावाबाबत होत आहे. प्रदर्शित होणाऱ्या आगामी मराठी चित्रपटाच्या यादीत ''घंटा'' नावाचा एक चित्रपट आहे. आता खरच प्रेक्षक ''घंटा'' बघायला जाणार? एक अजुन चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्याचे नाव आहे, ''वाजलाच पाहिजे! गेम की सिनेमा''. अशा चित्रपटाच्या नावातून चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण होत असली तरी बहुधा प्रेक्षकांचा गोंधळ उडण्याची पण शक्यता असते.   


किरण नाटकी