Friday 30 October 2015

"बेदर्दी", "ते आठ दिवस" आणि "ठण ठण गोपाल"

या आठवड्यात तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, "बेदर्दी", "ते आठ दिवस" आणि "ठण ठण गोपाल".

साहिल सेठ दिग्दर्शित "बेदर्दी" मध्ये कौटुम्बिक कथा साकरण्यात आली असून यात ओमकार कुलकर्णी आणि अरुण नलावडे यांची प्रमुख भूमिका आहे.

श्याम स्वर्णलता धानोरकर दिग्दर्शित "ते आठ दिवस" मध्ये रेणुका शहाणे, तुषार दळवी, आरोह वेलणकर, अतुल तोडणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट आई आणि मुलगी यातील नाते अधोरेखित करणारा आहे.

या आठवड्यात ''ठण ठण गोपाल" हा चित्रपट सुद्धा प्रदर्शित होत आहे, कार्तिक शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात मिलिंद गुणाजी, मिलिंद गवली आणि विवेक चाबुकस्वार यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

विक्रम गोखले

आज (३० ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! विक्रम गोखले त्यांच्या कुटुंबात असलेला अभिनयाचा वारसा घेऊनच अभिनयाच्या क्षेत्रात दाखल झाले. आपल्या समर्थ अभिनयाने विक्रमजी त्यांची प्रत्येक भूमिका लक्ष्यवेधी करतात. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला ५८ वर्षे पूर्ण झाले आहेत. दिग्दर्शक, अभिनेते व अभिनेत्रीच्या कितीतरी पिढ्यांसोबत त्यांनी काम केले आहे. २०१२ साली त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील भष्टाचारावर भाष्य करणारा "आघात" हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. "अनुमति" या चित्रपटसाठी त्यांना सर्वोकृष्ट अभिनयाचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला आहे. अभिनयासोबतच समाजकार्याची आवड सुद्धा त्यांनी जोपासली आहे. त्यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरीता आपण www.vikramgokhle.com या त्यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊ शकता. 

Thursday 29 October 2015

राजेश श्रृंगारपुरे

आज (२९ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते राजेश श्रृंगारपुरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! राजेश श्रृंगारपुरे आपल्या भारदस्त आवाजासाठी आणि पिळदार शरीरयष्टी ओळखले जातात. त्यांनी रामगोपाल वर्मा यांच्या ''सरकार राज" मध्ये महत्वाची भूमिका साकरली होती. त्यानंतर अवधूत गुप्ते यांच्या "झेंडा" या मराठी चित्रपटात राज ठाकरे यांच्याशी साम्य असणारी भूमिका केल्याने ते प्रकाश झोतात आले होते. ते सातत्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये व्यस्त असतात, त्याचाच जोडीला "सील टीम सिक्स" हि हॉलीवुड टीवी मालिका पण त्यांनी केलिय. या वर्षी त्यांचे "युद्ध" आणि "शार्ट कट" हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. 

सतीश मोटलिंग

आज (२९ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सतीश मोटलिंग यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नवे नवे प्रयोग करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये सतीश मोटलिंग यांचे नाव आघाडीवर त्यांच्या प्रत्येक चित्रपटात ते नवनवीन प्रयोग करीत असतात. त्यांनी "तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हव", "अगड़बम", "मैटर" आणि "प्रियतमा" या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचा आगामी "जब मिले छोरा छोरी" आणि ''पाउडर" या चित्रपटात विदेशातील निसर्गरम्य स्थळे बघायला मिळणार आहे. दिग्दर्शकाबरोबरच ते उत्कृष्ट छायाचित्रकार ही आहेत. 

Tuesday 27 October 2015

ख्वाडा

या शुक्रवारी "ख्वाडा" हा बहु-प्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये दोन पुरस्कार मिळाल्यानंतर या चित्रपटाने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले होते.

बाबुराव कऱ्हाडे दिग्दर्शित "ख्वाडा"मध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एका कुटुंबाचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती बाबुराव कऱ्हाडे यांनी खुप संघर्षातून केली आहे. या चित्रपटामध्ये शशांक शेंडे, अनिल नगरकर, भाऊ शिंदे, सुरेखा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अस्सल ग्रामीण बाज असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडून पसंतीची पावती मिळाली आहे.  

Friday 23 October 2015

सिद्धार्थ जाधव

आज (२३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सिद्धार्थ जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. त्यांनी आपल्या अभिनय करकिर्दीची सुरुवात एकांकिका मधून केली. २००६ साली प्रदर्शित झालेल्या केदार शिंदे दिग्दर्शित ''जत्रा'' या चित्रपटाने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. त्यांच वर्षी ते रोहित शेट्टी दिग्दर्शित ''गोलमाल - फन अनलिमिटेड'' या हिंदी चित्रपटात पण झळकले. या मराठी व हिंदी चित्रपटांसोबतच ''ऑउटसोर्सेड'' नावाचा इंग्लिश चित्रपट पण याच वर्षी प्रदर्शित झाला. अशा प्रकारे २००६ साली त्यांनी धमाकेदार सुरवात केली. तेव्हापासून आजतागत ते आपल्या अभिनयाने सर्व रसिकांचे मनोरंजन करीत आहेत. केदार शिंदे यांच्या सोबत त्यांची जोडी खुप गाजली.  "माझा नवरा तुझी बायको", "अग बाई अरेच्या", "बकुळा नामदेव घोटाळे", "जबरदस्त", "साडे माडे तीन", "दे धक्का", "गोलमाल रिटर्नस", "बाप रे बाप डोक्याला ताप", "गलगले निघाले", "उलाढाल", "सुंबरान", "गाव तसं चांगलं", "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय", "सालीने केला घोटाळा", "शिक्षणाच्या आयचा घो", '"हुप्पा हुय्या", "पारध", "क्षणभर विश्रांती", "इरादा पक्का", "लालबाग परळ", "फक्त लढ म्हणा", "सुपरस्टार", "खो-खो", "कुटुंब", "भाऊचा धक्का!", "टाइम प्लीज", "प्रियतमा", "मध्यमवर्ग", "रझाकार", "ड्रीम मॉल", "अग बाई अरेच्या २" आणि ''ढोलकी" या चित्रपटातून ते वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. त्यांच्या विनोदी भूमिका प्रसिद्ध असल्या तरी त्यांनी खुप वैविध्य राखले आहे त्यामुळेच या वर्षी त्यांना ''ड्रीम मॉल'' या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला आहे.

"जागो मोहन प्यारे", "तुमचा मुलगा करतोय काय" आणि "लोच्या झाला रे" या नाटकातून त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांनी सोनी टेलीविज़न या वाहिनीवर ''कॉमेडी सर्कस" या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. प्रसिद्ध हास्य अभिनेता सुनील ग्रोवर यांच्या सोबत ''मैड - मेड इन इंडिया'' या कार्यक्रमात त्यांची भूमिका होती. यांच्या व्यतिरिक्त ''हसा चटकफू'', "घडलंय बिघडलंय", "आपण यांना हसलात का?" आणि "बा, बहू और बेबी" या मालिकेत ही त्यांनी काम केले आहे.

त्यांचा ''शासन'' हा चित्रपट येत्या २२ ऑक्टोबर ला प्रदर्शित होतोय.

Monday 19 October 2015

प्रिया तेंडुलकर

आज (१९ ऑक्टोबर) अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांची जयंती आहे त्यानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली !!!!!

Sunday 18 October 2015

स्वप्निल जोशी

आज (१८ ऑक्टोम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते स्वप्निल जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

मराठी चित्रपट सृष्टीतील आजचे सुपरस्टार ''स्वप्निल जोशी" यांचे नाव घेतले की आपल्याला त्यांचा रामानंद सागर निर्देशित ''कृष्णा" या मालिकेतील त्यांची केंद्रीय भूमिका आठवते. त्यांची ''कृष्णा" ची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. त्यानंतर त्यांनी अनेक टीवी हिंदी व मराठी टीवी मालिकेमधून भूमिका केल्या किंबहुना ते छोट्या पद्यावरच जास्त रमले असे म्हटल्यास वावग ठरणार नाही. ''गुलाम ए मुस्तफा" आणि "दिल विल प्यार व्यार" या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. २०१० साली प्रदर्शित झालेल्या कांचन अधिकारी दिग्दर्शित "मानिनी" या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आगमन केले. हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला व स्वप्निल जोशी यांचा अभिनय पण. मध्यंतरी त्यांनी "चेकमेट", "टारगेट" आणि "आम्ही सातपुते" असे चित्रपट केले. सतीश राजवाडे यांच्या "मुंबई पुणे मुंबई" या चित्रपटात त्यांची मुक्ता बर्वेसोबत केमिस्ट्री खुप गाजली आणि हा चित्रपट सुद्धा खुप चालला. या चित्रपटाचा पुढचा भाग "मुंबई पुणे मुंबई २" येत्या काही दिवसात प्रदर्शित होत आहे. 

संजय जाधव दिग्दर्शित ''दुनियादारी" हा चित्रपट त्यांच्या करियरला वेगळे वळण देणारा ठरला. संजय जाधवचे दिग्दर्शन व स्वप्निल जाधव - सई ताम्हणकर यांची जोडी हा मराठी चित्रपटाच्या यशाचा नविन फार्मूला चित्रपटातून गवसला. "प्यारवाली लवस्टोरी" आणि "तू ही रे" चित्रपटात हेच सिद्ध झाले आहे. सोबतच त्यांनी ''मंगलाष्टक वन्स मोर", "पोर बाजार" आणि "वेलकम ज़िंदगी" हे चित्रपट पण केले. याच वर्षी प्रदर्शित झालेला ''मितवा" या चित्रपटात त्यांची प्रार्थना बेहरे व सोनाली कुलकर्णी यांची जोडी ही पसंत केल्या गेली. 

Saturday 17 October 2015

स्मिता पाटिल

आज (१७ ऑक्टोबर) अभिनेत्री स्मिता पाटिल यांची जयंती आहे त्यानिमित्त त्यांच्या पावन स्मृतिस हार्दिक अभिवादन !!!!!

Friday 16 October 2015

''सिटीजन" आणि "राजवाडे एण्ड सन्स"

आज ''सिटीजन" आणि "राजवाडे एण्ड सन्स" हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि हे दोन्ही चित्रपट युवकांवर आधारित आहेत, हे विशेष.

अमोल शेटगे दिग्दर्शित ''सिटीजन" हा युवकांवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात राजश्री लांडगे, राकेश वशिष्ठ, यतिन कार्येकर, पुष्कर श्रोत्री, उदय टिकेकर, नंदिता जोग, श्रीरंग देशमुख आणि माधव देवचके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

सचिन कुंडलकर दिग्दर्शित "राजवाडे आणि सन्स" या चित्रपटात दोन पिढ्यांचा संघर्ष रेखाटण्यात आला आहे. या चित्रपटात अतुल कुलकर्णी, सचिन खेडीकर, मृणाल कुलकर्णी, सतीश आळेकर, ज्योति सुभाष, सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृगमयी गोडबोले, कृतिका देव, पौर्णिमा मनोहर, राहुल मेहेंदळे अशी दिग्गज आणि युवा कलाकारांची टिम आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अतुल कुलकर्णी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरले आहे.   

अदिती सारंगधर

आज (१६ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अदिती सारंगधर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 

अदिती सारंगधर यांना त्यांच्या करीयरच्या सुरवातीला कांचन अधिकारी यांनी त्यांच्या "दामिनी" या मालिकेत संधी दिली . "दामिनी" नंतर "वादळवाट" या मालिकेतून त्यांना ओळख व लोकप्रियता मिळाली. स्टार प्रवाह वरील "लक्ष्य" या मालिकेतील सलोनी देशमुख भूमिकेनी त्यांना खुप प्रसिद्धि मिळवून दिली. राजन ताम्हने दिग्दर्शित "प्रपोजल" हे नाटक त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरत आहे. अदितीला या नाटकासाठी मटा सन्मान अवार्ड, जी गौरव अवार्ड आणि महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा या तिन्ही ठिकाणी सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या नाटकाने सर्वच नाट्य पुरस्कारांमध्ये बाजी मारली.

टिवी मालिका व नाटकासोबतच त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.    

Tuesday 13 October 2015

कादंबरी कदम

आज (१३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री कादंबरी कदम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! कादंबरी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी मालिकांमध्ये ही व्यस्त असतात. "कभी सौतन कभी सहेली" हि त्यांची पहिली हिंदी टिवी मालिका होती यानंतर त्यांनी "कहता दिल", "तीन बहुरानियाँ" आणि "संस्कार धरोहर अपनों की" या हिंदी मालिकांमधून भूमिका केल्या व लोकप्रियता मिळवली. "अजिंक्य", "आघात", "तुला शिकवीन चांगलाच धडा", "पटलं तर घ्या", "मंगलाष्टक वन्स मोअर", "ही पोरगी कुणाची", "क्षणभर विश्रांती" हे त्यांचे प्रमुख मराठी चित्रपट आहेत.

  

स्पृहा जोशी

आज (१३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री स्पृहा जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 

आज मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अभिनय करणाऱ्या युवा अभिनेत्रीमध्ये स्पृहा जोशी यांचे नाव आघाडीवर आहे. शाळेमध्ये असतानाच त्यांना गजेन्द्र अहिरे यांच्या "माय बाप" या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. "अग्निहोत्र", "एका लग्नाची दूसरी गोष्ट", "उँच माझा झोका", "एका लग्नाची तीसरी गोष्ट" या मालिकांमुळे त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचल्या. स्पृहा जोशी यांचे "समुद्र" हे नाटक सध्या बरेच गाजतेय, त्यांच्या "नांदी" या नाटकाची बरीच चर्चा होती. अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्पृहा जोशी यांनी "नांदी" मध्ये काम केले. त्यांचे  "पेईंग गेस्ट" आणि "बॉयोस्कोप (एक होता काऊ)" हे चित्रपट या वर्षी प्रदर्शित झालेत. स्टार प्रवाह या वाहिनीवर सध्या त्यांची "किचनची सुपरस्टार" हि मालिका सुरु आहे. 

त्या स्तंभलेखन करतात, कविता लिहितात आणि गीतलेखन ही करतात. त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांच्या अभिनया इतक्याच प्रसिद्द आहेत. त्यांनी "बावरे प्रेम हे" आणि "डबल सीट" या चित्रपटासाठी गीतलेखन केले आहे. खास करून त्यांनी "डबल सीट" चित्रपटासाठी लिहिलेली गाणी खूपच श्रवणीय झाली आहे. त्याचा www.kangoshti.blogspot.in हा ब्लॉग वाचकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरत  आहे.  

शरद पोंक्षे

आज (१३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! टि वी, नाटक आणि चित्रपट हि अभिनयाची सर्व माध्यम आपल्या समर्थ अभिनयाने गाजवणारे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. "दामिनी", "अग्निहोत्र" आणि "वादळवाट" या मालिकांनी त्यांना घराघरात पोहचवले. त्यांनी अनेक नाटकात महत्वाच्या भुमिका केल्या असल्या तरी "मी नथूराम गोडसे बोलतोय" हे नाटक त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय महत्वाचे आहे. त्यांनी "हे राम", "८८ अंटोप हिल", "आखरी ख्वाहिश", "ब्लैक फ्राइडे", "ओटी कृष्णामाईची", "एक पल प्यार का", "गाढवाच लग्न", "तूच खरी घरची लक्ष्मी", "गोळाबेरीज", "तुकाराम", "देख तमाशा देख", "ब्लैक होम", "व्हाट अबाउट सावरकर" आणि "संदूक" या हिंदी व मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

Sunday 11 October 2015

निशिगंधा वाड

आज प्रसिद्द अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!! 

निशिगंधा वाड यांनी या मराठी कौटुम्बिक चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्द आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून काम केले आहे. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये "वाजवा रे वाजवा", "शेजारी शेजारी", "एकापेक्षा एक", "प्रतिकार", "बंधन", "कर्मयोद्धा", "बाळा जो जो रे", "जन्मदाता", "सलीम लंगडे पे मत रो", "सासर माहेर", "दादागिरी", "अशी ही ज्ञानेश्वरी", "आप मुझे अच्छे लगने लगे", "तुमको ना भूल पायेंगे", "दिवानगी", "शापित", "रोक", "लाइफ में कभी कभी" आणि "अलीबाबा और चालीस चोर" प्रमुख आहेत. अभिनया सोबतच त्यांना संशोधनाचीही आवड आहे. त्यांच्या प्रबंधासाठी त्यांना मुंबई विद्यापीठातून पीएचडी प्राप्त झाली आहे. त्या "चार चौघी" या मराठी मासिकाशी जुळल्या होत्या.  

समित कक्कड

आज (११ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक व निर्माता समित कक्कड यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

समित कक्कड यांनी आपल्या पहिल्याच "आयना का बायना" चित्रपटातून नवीन ओळख निर्माण केली. "आयना का बायना" हा डांस मूवी प्रकारातील चित्रपट होता. या चित्रपटात सचिन खेडेकर आणि अमृता खानविलकर सोबतच ९ युवा कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाने  दिग्दर्शन, सादरीकरण, अभिनय, नृत्य आणि छायांकन या सगळयाच बाबींसाठी वाहवा मिळवली. हा चित्रपट डब करून सोनी मैक्स या हिंदी चित्रपट वाहिनीवर दाखवण्यात आला. अश्या प्रकारे डब करून हिंदी चित्रपट वाहिनीवर दाखवण्यात आलेला हा पहिलाच चित्रपट ठरला. खर म्हणजे यामुळे मराठी चित्रपटाला एक नवीन वाट सापडली आहे. 

समित कक्कड यांनी त्यांच्या आगामी "एक नंबर" या चित्रपटाची घोषणा सोशल मीडिया वरुन केली आहे. 

Saturday 10 October 2015

कमलाकर सातपुते

आज (१० ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते कमलाकर सातपुते यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! कमलाकर सातपुते यांनी स्वतला खुप कमी वेळात समर्थ विनोदी अभिनेता म्हणून स्थापित केले आहे. चित्रपटांसोबतच ''कॉमेडी एक्सप्रेस" या कार्यक्रमातून ते घराघरात पोहचले आहे. "सांग सांग गंगाराम", "शिवाजी द रियल हीरो", "कुणी देता का घर", "खोखो", "नवरा माझा भँवरा", "प्रीत तुझी माझी", "लावू का लाथ" आणि "काय करू न कस करू" या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत.  त्यांची महत्वाची भूमिका असलेला "दगड़ाबाईची चाळ" हा चित्रपट येत्या काही दिवसात प्रदर्शित होत आहे.

Thursday 8 October 2015

मधुरा वेलणकर

आज (८ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मधुरा वेलणकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

मधुरा वेलणकर ह्या मराठीतील सर्वांच्या आवडत्या अभिनेत्रीपैकी एक आहेत, आपल्या ग्रेसफुल लूकने आणि अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना मोहित केले आहे. सध्या त्यांचे मराठी रंगभूमीवरील नाटक "मिस्टर एण्ड मिस" खुप गाजतय. त्यांनी "जजतरंम ममंतरम", "नॉट ओनली मिराऊत", "सरीवर सरी", "मी अमृता बोलतीये", "आई नं.१", "मातीच्या चुली", "गोजीरी", "गलती", "उलाढाल", "मेड इन चायना", "खबरदार", "कैनवास", "रंगीबेरंगी", "हापुस", "क्षणोक्षणी", "पाऊलवाट", "जन गण मन" आणि "अशाच एका बेटावर" या हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. या पैकी "हापुस" या चित्रपटात त्यांनी जुळ्या मुलींची दुहेरी भूमिका केली होती. त्या शिवाजी साटम यांचे चिरंजीव व प्रसिद्द दिग्दर्शक अभिजीत साटम यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत.   

राजेश चिटणीस

आज (८ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते राजेश चिटणीस यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! राजेश चिटणीस हे जेष्ठ अभिनेते व नकलाकार राजाभाऊ चिटणीस यांचे चिरंजीव आहेत. राजेश चिटणीस यांनी "झपाटलेला २" आणि "निशानी डावा अंगठा" या चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. नागपूरच्या व्यावसायिक रंगभूमीवरील ''असे नवरे अश्या बायका" या नाटकात त्यांची प्रमुख भूमिका होती, सोबतच दरवर्षी ते झाडीपट्टी रंगभूमीमध्ये नवनवीन नाटकांच्या माध्यमातून सक्रीय असतात. 

Wednesday 7 October 2015

रवीन्द्र महाजनी

आज (७ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते रवीन्द्र महाजनी यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 
सत्तरच्या दशकात आपल्या प्रसन्न व्यक्तीमत्वामुळे रविन्द्र महाजनी मराठी चित्रपट सृष्टितील चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जायचे. त्यांनी मराठी सोबतच काही हिंदी आणि गुजराती चित्रपटात पण अभिनय केला आहे. मराठीमध्ये त्यांनी ''जुलुम" या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. "आराम हराम आहे", "मरी हेल उतारो राज", "दुनिया करी सलाम", "तीन चेहरे", "चोरावर मोर", "गोंधळात गोंधळ", "लक्ष्मीचे पाऊले", "बेआबरू", "मुंबईचा फौजदार", "बढ़कर", "गंगा किनारे", "नैन मिले चैन कहाँ", "कानून कानून है", "वहम" आणि "गूंज" हे त्यांचे प्रमुख चित्रपट आहेत. या वर्षी त्यांनी ''काय राव तुम्ही" या चित्रपटातून मराठी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. त्यांचे चिरंजीव गश्मीर महाजनी यांनी या वर्षी चित्रपट सृष्टित पदार्पण केले असून ते सुद्धा वडिलाच्या पाऊलवाटेवर यशस्वीपणे पुढे जात आहेत.

शरद केळकर

आज (७ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते शरद केळकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! शरद केळकर हे छोट्या पद्यावरील स्टार कलाकार आहेत, मागील वर्षी प्रदर्शित "लय भारी" या चित्रपटातून साकारलेल्या संग्राम या खलनायकाच्या भूमिकेने त्यांना मराठी चित्रपट सृष्टित नवीन ओळख मिळवून दिली आहे. या पूर्वी त्यांची जी वाहिनीवरची "सात फेरे" या मालिकेतील नहर प्रताप सिंगची भूमिका खुप गाजली होती. शरद केळकर हे मूळचे मध्यप्रदेश मधील ग्वालियरचे. एम बी ए चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडलिंग विश्वात प्रवेश करून आता ते अभिनेते म्हणून नावारुपाला आले आहेत. त्यांनी ''सिन्दूर तेरे नाम का", "नच बलिये २", "पति पत्नी  और वो", "बैरी पिया", "सर्वगुण संपन्न", "उतरण", "कुछ तो लोग कहेंगे", "सैतान" आणि "एजेंट राघव" या मालिकांमधून अभिनय केला आहे. शरद केळकर यांनी संजय लीला भंसाली यांच्या "राम लीला" या चित्रपटातही महत्वाची भूमिका साकारली होती.  

Tuesday 6 October 2015

रेणुका शहाणे

आज (७ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! आमच्या बालपणीच्या आठवणी पैकी गोष्ट म्हणजे दर रविवारी लागणारी मालिका "सुरभि" आणि त्यात दिसणारे दोन हसरे चेहरे, त्यापैकी एक रेणुका शहाणे. त्या वेळेस ही मालिका अफाट लोकप्रिय झाली होती आणि या मालिकेची सूत्रसंचालिका रेणुका शहाणे सुद्धा. ''सर्कस" या दूरदर्शन वरील लोकप्रिय मालिकेत त्यांनी शाहरुख़ खान यांच्या सोबत अभिनय केला होता. "हम आपके है कौन" या अत्यंत गाजलेल्या चित्रपटात आदर्श सुनेची भूमिका त्यांनी केली. त्यांची हि भूमिका इतकी लोकप्रिय झाली की आज हि त्यांना याच भूमिकेसाठी ओळखले जाते. रेणुका शहाणे यांनी ''रीटा" हा चित्रपट सुद्धा दिग्दर्शित केला आहे. त्या हिंदी चित्रपट अभिनेता आशुतोष राणा यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत. अलीकडे त्यांनी मराठी चित्रपटात पुनरागमन केले असून त्या ''भाकरवाडी ७ किमी", "जाणिवा" आणि "हायवे" या चित्रपटात दिसल्या आहेत

सलिल कुलकर्णी

आज (६ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक सलिल कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सलिल कुलकर्णी यांनी अनेक चित्रपट व अल्बम्सना संगीत दिले आहे. "एक उनाड दिवस", "जन मन गण", "जमीन", "चैंपियन", "आता कशाला उद्याची बात", "धागे दोरे", "छोड़ो कल की बाते", "निशानी डावा अंगठा", "विट्ठल विट्ठल", "पांढर", "चिंटू", "चकवा", "बंड्या आणि बेबी", "हाय काय नाय काय", "आनंदी आनंद", "हॉउसफुल" आणि "बॉयोस्कोप" हि त्यातील काही प्रमुख चित्रपटाची नावे आहेत. त्यांचा गीतकार संदीप खरे यांच्यासोबत "आयुष्यावर बोलू काही" हा गाण्याचा संगीतमय कार्यक्रम खुप प्रसिद्द आहे. "सा रे ग म प" व "गौरव महाराष्ट्राचा" या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून त्यांनी काम बघितले आहे. संगीतासोबतच लेखनाची सुद्धा त्यांना आवड आहे, "लोकसत्ता" या नामांकित वृत्तपत्रासाठी ते स्तम्भलेखन करतात.

Saturday 3 October 2015

सुनील बर्वे

आज (३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सुनील बर्वे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

नाटक, टीवी मालिका व चित्रपट अशी अभिनयाची सर्वच क्षेत्रात आपल्या प्रसन्न अभिनयाने वावर करणारे सुनील बर्वे मागील २५ पेक्षा अधिक वर्ष मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. सुनील बर्वे यांनी आपल्या अभिनय यात्रेची सुरवात "अफलातून" या नाटकातून केली, त्यानंतर त्यांनी "मोरूची मावशी", "कशी मी राहू तशीच", "वन रूम किचन", "चार चौघी", "म्हणून मी तुला कुठे नेत नाही", "ह्यांना जमतं तरी कसं", "असेच आम्ही सारे", "हेलो इन्स्पेक्टर", "श्री तशी सौ", "बायकोच्या नकळतच", "हिच तर प्रेमाची गंमत आहे", "मासिबा" आणि "ऑल  बेस्ट" अशा मराठी, गुजराती आणि इंग्लिश नाटकांमधून भूमिका केल्या. "सुबक" या संस्थेची स्थापना करून द्वारे ते नाट्य निर्मितीच्या क्षेत्रात उतरले. "हर्बेरियम" हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सुरु केला त्यात त्यांनी गाजलेल्या जुन्या ५ नाटकांना नवीन स्वरुपात प्रेक्षकांच्या समोर आणले. यातील सर्वच नाटकांचे मोजके २५ प्रयोग करण्यात आले. यापैकी "झोपी गेलेला जागा झाला" हे नाटक नागपूरला बघण्याची संधी मला मिळाली. "हर्बेरियम" या उपक्रमातील अनुभवावर आधारित याच नावाने पुस्तकही त्यांनी लिहिले असून तारांगण प्रकाशन ने ते प्रकाशित केले आहे.           

सचिन पिळगावकर दिग्दर्शित ''आत्मविश्वास" हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर त्यांनी "सुगंध", "तू तिथे मी", "पाश", "आहुती", "लपंडाव", "जमल हो जमल", "आई", "तन्नू कि टिना", "निदान", "अस्तित्व", "दिवसेंदिवस", "आनंदाचे झाड", "सुर राहु दे", "गोजिरी", "तूच खरी घरची लक्ष्मी", "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं" या चित्रपटात अभिनय केला आहे. या वर्षी त्यांचे "प्राइम टाइम" आणि "हायवे" हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.   

नाटक आणि चित्रपटांसोबतच अनेक मराठी, हिंदी आणि गुजराती मलिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे, या मलिकांमध्ये ''कुंकू", "कळत कळत", "असंभव", "अभी तो मै जवान हु", "अधांतरी", "अवंती", "अवंतिका", "आवाज", "बोलाची कढी", "चाळ नावाची वाचाळ वस्ती", "छैल छबीला", "चतुराई", "गोष्ट एका आनंदची", "हे सारे संचीताचे", "इमारत", "जावई शोध", "झोका", "झुट्न जरीवाला", "ज्योति", "कर्तव्य", "कौन अपना कौन पराया", "कोई सुरत नजर नही आती", "कोरा कागज", "नायक", "प्रपंच", "प्रोप्यारेलाल", "रिमझीम", "सप्तर्शी", "श्रीयुत गंगाधर टिपरे", "स्वयंम", "थरार", "त्रेधा तिरपिट" आणि "वाळवाचा पाऊस" या मालिकांचा समावेश आहे. 

त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.sunilbarve.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

Friday 2 October 2015

कौशल ईमानदार

आज (२ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक कौशल ईमानदार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

कौशल ईमानदार हे त्यांच्या सुमधुर संगीतासाठी ओळखले जातात. पंडित सत्यशील देशपांडे यांच्या कडून त्यांनी संगीताचे धडे घेतले आहेत. कौशल ईमानदार यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या "मराठी अभिमान गीता"ने एक नवीन विश्वविक्रम केला. कौशल ईमानदार यांनी अनेक मलिकांच्या शीर्षक गीतांना संगीत आणि पार्श्वसंगीत दिले. त्यांनी "येलो", "पितृऋण", "संशय कल्लोल", "अजिंठा", "बालगंधर्व" आणि "नॉट ओनली मिसेस राऊत" या मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. मालिका व चित्रपट संगीताच्या सोबतच त्यांचे अनेक संगीत अल्बम्स प्रकाशित झालेले आहेत.

देविका दफ्तरदार

आज (२ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री देविका दफ्तरदार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Thursday 1 October 2015

"दगडी चाळ" आणि "मूंगळा"

उद्या "दगडी चाळ" आणि "मूंगळा" हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

चंद्रकांत कणसे दिग्दर्शित "दगडी चाळ" मध्ये अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, पूजा सावंत आणि संजय खापरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांची जोडी पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे.

विजय देवकर दिग्दर्शित "मूंगळा" हा चित्रपट सामाजिक प्रश्नांवर आधारीत आहे. 

विवेक कजारीया

आज (१ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात निर्माते विवेक कजारीया यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

विवेक कजारीया यांनी ''फँड्री" व "सिद्दार्थ" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यशस्वी निर्माता म्हणून ओळख निर्माण केल्यावर आता ते दिग्दर्शनाकडे वळले आहेत, त्यांची ''दुर्गा" ही पहिली शार्ट फिल्म सध्या चर्चेत आहे. या लघुपटाची ''बुसान चित्रपट महोत्सवा''साठी निवड झाली आहे.    

किरण नाटकी