Friday 23 October 2015

सिद्धार्थ जाधव

आज (२३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सिद्धार्थ जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. त्यांनी आपल्या अभिनय करकिर्दीची सुरुवात एकांकिका मधून केली. २००६ साली प्रदर्शित झालेल्या केदार शिंदे दिग्दर्शित ''जत्रा'' या चित्रपटाने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. त्यांच वर्षी ते रोहित शेट्टी दिग्दर्शित ''गोलमाल - फन अनलिमिटेड'' या हिंदी चित्रपटात पण झळकले. या मराठी व हिंदी चित्रपटांसोबतच ''ऑउटसोर्सेड'' नावाचा इंग्लिश चित्रपट पण याच वर्षी प्रदर्शित झाला. अशा प्रकारे २००६ साली त्यांनी धमाकेदार सुरवात केली. तेव्हापासून आजतागत ते आपल्या अभिनयाने सर्व रसिकांचे मनोरंजन करीत आहेत. केदार शिंदे यांच्या सोबत त्यांची जोडी खुप गाजली.  "माझा नवरा तुझी बायको", "अग बाई अरेच्या", "बकुळा नामदेव घोटाळे", "जबरदस्त", "साडे माडे तीन", "दे धक्का", "गोलमाल रिटर्नस", "बाप रे बाप डोक्याला ताप", "गलगले निघाले", "उलाढाल", "सुंबरान", "गाव तसं चांगलं", "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय", "सालीने केला घोटाळा", "शिक्षणाच्या आयचा घो", '"हुप्पा हुय्या", "पारध", "क्षणभर विश्रांती", "इरादा पक्का", "लालबाग परळ", "फक्त लढ म्हणा", "सुपरस्टार", "खो-खो", "कुटुंब", "भाऊचा धक्का!", "टाइम प्लीज", "प्रियतमा", "मध्यमवर्ग", "रझाकार", "ड्रीम मॉल", "अग बाई अरेच्या २" आणि ''ढोलकी" या चित्रपटातून ते वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. त्यांच्या विनोदी भूमिका प्रसिद्ध असल्या तरी त्यांनी खुप वैविध्य राखले आहे त्यामुळेच या वर्षी त्यांना ''ड्रीम मॉल'' या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला आहे.

"जागो मोहन प्यारे", "तुमचा मुलगा करतोय काय" आणि "लोच्या झाला रे" या नाटकातून त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांनी सोनी टेलीविज़न या वाहिनीवर ''कॉमेडी सर्कस" या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. प्रसिद्ध हास्य अभिनेता सुनील ग्रोवर यांच्या सोबत ''मैड - मेड इन इंडिया'' या कार्यक्रमात त्यांची भूमिका होती. यांच्या व्यतिरिक्त ''हसा चटकफू'', "घडलंय बिघडलंय", "आपण यांना हसलात का?" आणि "बा, बहू और बेबी" या मालिकेत ही त्यांनी काम केले आहे.

त्यांचा ''शासन'' हा चित्रपट येत्या २२ ऑक्टोबर ला प्रदर्शित होतोय.

No comments:

Post a Comment

किरण नाटकी