Sunday 31 January 2016

अंकुश चौधरी

आज (३१ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते अंकुश चौधरी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंकुश चौधरी यांना मराठी चित्रपट सृष्टीतील हिट मशीन म्हटल्यास वावग ठरणार आहे. दिग्दर्शक म्हणून असो किवा अभिनेता म्हणून असो अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिले आहेत. "झकास" आणि "नो एंट्री पुढे धोका आहे" या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. "दुनियादारी", "क्लासमेट्स", "डबल सीट", "दगडी चाळ", "गुरु" असे लागोपाठ यशस्वी चित्रपट त्यांनी अभिनेता म्हणून दिले आहेत. दिपा परब यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव "ऑटोग्राफ" आहे.

Saturday 30 January 2016

निर्मिती सावंत

आज (३० जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! निर्मिती सावंत यांनी नाटक, टीवी आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून अनेक भूमिका केल्या असल्या तरी त्यांच्या "कुमारी गंगू बाई नॉन मेट्रिक" या टीवी मालिकेमधील भूमिकेसाठी त्या प्रसिद्द आहेत. त्यांची ही भूमिका आणि टीवी मालिका इतकी प्रसिद्द झाली की ह्याच नावाने पुढे नाटक आणि चित्रपटाची पण निर्मिती करण्यात आली. या मालिकेमध्ये त्यांच्या सोबत पंढरीनाथ कांबळे यांची भूमिका होती. झी मराठी वरील "फु बाई फु" या कार्यक्रमाचे परीक्षक पद त्यांनी भूषवल आहे. 

निर्मिति सावंत यांनी अभिनय केलेले चित्रपट  
  • बिनधास्त (१९९९) 
  • नवरा माझा नवसाचा (२००४)
  • कायद्याच बोला (२००५)
  • खबरदार (२००५)
  • हि पोरगी कुणाची (२००६ )
  • शुभमंगल सावधान (२००६)
  • वळु (२००६)
  • श्यामची मम्मी (२००८)
  • सासु नम्बरी जवाई दस नम्बरी (२००८)
  • हफ्ता बंद (२००९)
  • निशानी डावा अंगठा (२००९)
  • हॉर्न ओके प्लीज (२००९)
  • आईडिया ची कल्पना (२०१०)
  • चल धर पकड (२०१०)
  • अय्या (२०१२)
  • गंगू बाई नॉन मेट्रिक (२०१३)

रमेश देव

आज (३० जानेवारी) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Wednesday 27 January 2016

श्रेयस तलपदे

आज (२७ जानेवारी) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते श्रेयस तलपदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday 26 January 2016

नंदू माधव

आज (२६ जानेवारी) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते नंदू माधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मोजके पण अतिशय अर्थपूर्ण चित्रपट व भूमिका करणार्या अभिनेत्यांमध्ये नंदू माधव यांची गणना होते. २०१० साली प्रदर्शित झालेल्या परेश मोकाशी दिग्दर्शित "हरिचन्द्राची फैक्टरी" मध्ये त्यांनी दादासाहेब फालके यांची केंद्रीय भूमिका केली होती. हा चित्रपट व त्यांच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा झाली. अभिनयाबरोबर सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय आहेत. त्यांनी खालील चित्रपटात अभिनय केला आहे.  
  • दायरा (१९९६)
  • शूल (१९९९)
  • अशी ज्ञानेश्वरी (२००१) 
  • वळु (२००८) 
  • बारू (२०१०) 
  • मर्मबन्ध (२०१०) 
  • हरिचंद्राची फैक्टरी (२०१०) 
  • जन गण मन (२०१२)
  • शाळा (२०१२)  
  • मुक्ती (२०१२) 
  • टपाल (२०१३) 
  • मैं और चार्ल्स (२०१५)

सुजय डहाके

आज (२६ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सुजय डहाके यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सुजय यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट "शाळा" हा होता. हा चित्रपट मिलिंद बोकिळ यांच्या "शाळा" याच नावाच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित होताप्रदर्शनपूर्वीच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होतीत्यामुळे पहिल्याच चित्रपटासाठी सुजय यांच्याकडून खुप अपेक्षा होत्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाकडून असलेल्या प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आणि सुजय पहिल्याच चित्रपटात स्टार दिग्दर्शक बनलेत्यांनतर त्याचा दूसरा चित्रपट "आजोबा" हा त्यांनी हिंदितील प्रसिद्द अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला प्रमुख भूमिकेत घेऊन बनवला. हा चित्रपट आजोबा नावाच्या बिबट्यावर आधारित होताया वर्षी त्यांचा "फूंतरू" हा साइंस फिक्शन चित्रपट प्रदर्शित झालाया चित्रपटात केतकी माटेगांवकर हिची प्रमुख भूमिका होती पण हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही.

सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
  • शाळा (२०११)
  • आजोबा (२०१४)
  • फूंतरू (२०१५)

Monday 25 January 2016

पूजा सावंत

आज (२५ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री पूजा सावंत यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! पूजा सावंत यांनी २०१० साली सचित पाटिल दिग्दर्शित "क्षणभर विश्रांती" या चित्रपटातून पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत खुप कमी वेळात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असून मराठी चित्रपटांमधील आघाडीच्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसोबत चित्रपट केले आहेत

पूजा सावंत यांनी अभिनय केलेले चित्रपट
  • क्षणभर विश्रांती (२०१०)
  • आता बया (२०११)
  • झकास (२०११)
  • सतरंगी रे (२०१२)
  • पोश्टर बॉयज (२०१४)
  • गोंदण (२०१४
  • सांगतो ऐका (२०१४)
  • साट लोट पण सगळ खोट (२०१५)
  • नीलकंठ मास्टर (२०१५)
  • दगडी चाळ (२०१५)
  • वृंदावन (२०१५)

राजन ताम्हाणे

आज (२५ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते व दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Friday 22 January 2016

लीना भागवत

आज (२२ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री लीना भागवत यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Saturday 16 January 2016

केदार शिंदे

आज (१६ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक केदार शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! केदार शिंदे हे महाराष्ट्रातील प्रसिद्द शाहिर "शाहिर साबळे" यांचे नातू आहेत. केदार शिंदे यांनी ''अग बाई अरेच्या'', ''जत्रा'', ''यंदा कर्त्तव्य आहे'', ''माझा नवरा तुझी बायको'', ''मुक्काम पोस्ट लंडन'', ''याचा काही नेम नाही'', ''गलगले निघाले'', ''बकुला नामदेव घोटाळे'', ''इरादा पक्का'', ''ऑन ड्यूटी २४ तास'', ''खो खो'', ''श्रीमंत दामोदर पंत'' अशा दर्जेदार विनोदी चित्रपटाची मेजवानी मराठी प्रेक्षकांना दिली आहे. या चित्रपटांमधून त्याची भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्याबरोबर जोडी विशेष गाजली. हिंदीमध्ये केदार शिंदे यांनी "तो बात पक्की" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट 
  • अगं बाई... अरेच्या (२००६)
  • जत्रा (२००६)
  • यंदा कर्तव्य आहे (२००६)
  • माझा नवरा तुझी बायको (२००६)
  • मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
  • ह्यांचा काही नेम नाही (२००८)
  • बकुळा नामदेव घोटाळे (२००८)
  • गलगले निघाले (२००८)
  • इरादा पक्का (२०१०)
  • ऑन ड्यूटी २४ तास (२०१०)
  • श्रीमंत दामोदर पंत (२०१३) 
  • खो खो (२०१३)
  • अग बाई अरेच्या २ (२०१५)

Sunday 10 January 2016

निवेदिता सराफ

आज (१० जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Saturday 9 January 2016

सतीश राजवाडे

आज (९ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!  मराठी चित्रपट सृष्टीला आज प्राप्त झालेले स्वरुप मिळवण्यात सतीश राजवाडे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. अभिनय, मालिकांचे दिग्दर्शन आणि चित्रपटांचे दिग्दर्शन या यात्रेत सतीश राजवाडे यांनी अनेक स्मरणीय कलाकृती प्रेक्षकांना दिल्या आहेत. सतीश राजवाडे यांनी आपल्या चित्रपटांमध्ये अनेक विषय हाताळले आहेत. सतीश राजवाडे यांनी त्यांचा मराठीत गाजलेला "मुंबई पुणे मुंबई" हा चित्रपट हिंदीत "मुंबई दिल्ली मुंबई" या नावाने बनविला. सतीश राजवाडे यांनी आता आपल्या अभिनयाची सेकंड इनिंग सुरु केली असून ते "टाईम बरा वाईट" चित्रपटात डॉन च्या भूमिकेत दिसले होते. आगामी "भय'' या चित्रपटात ते महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.  


सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट 
  • मृगजळ (२००९)
  • एक डाव धोबीपछाड (२००९)
  • गैर (२००९)
  • मुंबई-पुणे-मुंबई (२०१०)
  • बदाम राणी गुलाम चोर (२०१२)
  • प्रेमाची गोष्ट (२०१३)
  • पोपट (२०१३)
  • सांगतो ऐका (२०१४)
  • मुंबई दिल्ली मुंबई (हिंदी चित्रपट) (२०१४)
  • मुंबई-पुणे-मुंबई २ (२०१५)

सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिका 
  • असंभव (२००९)
  • अग्निहोत्र (२०१०)
  • गुंतता हृदय हे (२०११)
  • एका लग्नाची दुसरी गोष्ट (२०१२) 


Friday 8 January 2016

सागरिका घाटगे

आज (८ जानेवारी) हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सागरिका घाटगे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सागरिका घाटगे यांनी चक दे इंडिया या हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनय यात्रेला सुरवात केली. हॉकी या खेळावर आधारित या चित्रपटात शाहरुख़ खान मुख्य भूमिकेत होते सोबतच हॉकी टीम ची गोष्ट असल्यामुळे अनेक अभिनेत्रींच्या भूमिका होत्या पण आपल्या पहिल्याच चित्रपटातून सागरिका प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरल्या. २०१३ साली प्रेमाची गोष्ट या सतीश राजवाडे दिग्दर्शित चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट सुष्टित यशस्वी पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्या सोबत अतुल कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका होती. अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे यांचा दमदार अभिनय, फ्रेश स्टोरी, फ्रेश लुक आणि सतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन या मुळे "प्रेमाची गोष्ट" ची भट्टी छान जमली. हा चित्रपटही टिकिट खिडकीवर बर्यापैकी यशस्वी झाला. माझ्या आवडत्या मराठी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. 

सागरिका घाटगे यांनी अभिनय केलेले चित्रपट  

  • चक दे इंडिया (२००७)
  • फॉक्स (२००९)
  • मिले ना मिले हम (२०११)
  • रश (२०१२)
  • प्रेमाची गोष्ट (२०१३)
  • जी भर के जी ले (२०१५)
  • दिलदारियाँ (२०१५)


गिरीश मोहिते

आज (८ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक गिरीश मोहिते यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गिरीश मोहिते यांनी ''तुला शिकवीन चांगला धड़ा'', ''पिकनिक'', ''हि पोरगी कुणाची'', ''बे दुने साडे चार'', ''मनातल्या मनात'', ''प्रतिबिम्ब'', ''भारतीय'' व  ''गुरु पूर्णिमा''च्या माध्यमातून वेगवेगळे विषय मराठीत हाताळले आहे व ते प्रेक्षकांच्या पसन्तीत उतरले आहे.   

Thursday 7 January 2016

अभिराम भडकमकर

आज (७ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात लेखक, अभिनेते अभिराम भडकमकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Monday 4 January 2016

बेला शेंडे

आज (४ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गायिका बेला शेंडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Sunday 3 January 2016

सुदेश मांजरेकर

आज (३ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सुदेश मांजरेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Friday 1 January 2016

क्षिती जोग

आज (१ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री क्षिती जोग यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

किरण करमरकर

आज (१ जानेवारी) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते किरण करमरकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

नाना पाटेकर

आज (१ जानेवारी) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! आपल्या अभिनायाने आणि आपल्या भारदस्त व्यक्तीमत्वाने नाना पाटेकर यांनी चित्रपट रसिकांच्या मनात घर केलेले आहे. त्यांनी "प्रहार" या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन ही केले आहे. २०१३ साली भारत सरकारतर्फे त्यांना "पदमश्री" या सम्मानाने गौरवण्यात आले आहे. नानांना नेमबाजी या खेळाची आवड असून त्यात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. ते अभिनयासोबतच समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. अनेक सामाजिक कार्यांना व संस्थांना त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. याच भावनेतून त्यांनी २०१५ साली अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून ''नाम फाउंडेशन" या संस्थेची स्थापना केली आहे. हि संस्था शेतकरी आणि त्यांच्या कुटुम्बियांसाठी कार्यरत आहे. 

आज त्यांचा महेश मांजरेकर दिग्दर्शित "नटसम्राट" हा मराठी चित्रपट प्रदर्शित  आहे. हा चित्रपट नानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.   

नाना पाटेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट 
  • वेलकम बॅक (२०१५)
  • अब तक छप्पन २ (२०१५)
  • डॉ. प्रकाश बाबा आमटे (२०१४)
  • द ॲटॅक ऑफ २६/११ (२०१३)
  • देऊळ (२०११)
  • राजनीति (२०१०)
  • इट्स माय लाइफ (२००९)
  • वेलकम (२००७)
  • हॅटट्रिक (२००७)
  • टैक्सी  नम्बर ९२११ (२००६)
  • अपहरण (२००५)
  • अब तक छप्पन (२००५)
  • पक पक पकाक (२००५)
  • ब्लफ़ मास्टर (२००५)
  • आँच (२००३)
  • डरना मना है (२००३)
  • भूत (२००३)
  • वध (२००२)
  • शक्ति : द पावर (२००२)
  • गैंग (२०००)
  • तरकीब (२०००)
  • कोहराम : द एक्सप्लोजन (१९९९)
  • हुतूतू (१९९९)
  • युगपुरुष: अ मॅन हू कम्स जस्ट वन्स इन् अ वे (१९९८)
  • वजूद (१९९८)
  • गु़लाम-ए-मुस्तफ़ा (१९९७)
  • यशवंत (१९९७)
  • अग्निसाक्षी (१९९६)
  • खामोशी : द म्यूझिकल (१९९६)
  • हम दोनों (१९९५)
  • क्रांतिवीर (१९९४)
  • अभय (१९९४)
  • अंगार (१९९२)
  • तिरंगा (१९९२)
  • राजू बन गया जंटलमन (१९९२)
  • दीक्षा (१९९१)
  • प्रहार : द फायनल ॲटॅक (१९९१)
  • थोडसा रूमानी हो जाएँ (१९९०)
  • दिशा (१९९०)
  • परिंदा (१९८९)
  • त्रिशाग्नी (१९८८)
  • सलाम बॉम्बे (१९८८)
  • सागर संगम (१९८८)
  • अंधा युद्ध (१९८७)
  • अवाम (१९८७)
  • प्रतिघात (१९८७)
  • मोहरे (१९८७)
  • सूत्रधार (१९८७)
  • अंकुश (१९८६)
  • दहलीज़ (१९८६)
  • आज की आवाज (१९८४)
  • गिद्ध : द व्हल्चर (१९८४)
  • भालू (१९८०)
  • गमन (१९७८)

सचिन खेडेकर

आज (१ जानेवारी) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सचिन खेडेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

किरण नाटकी