आज (३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सुनील बर्वे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
नाटक, टीवी मालिका व चित्रपट अशी अभिनयाची सर्वच क्षेत्रात आपल्या प्रसन्न अभिनयाने वावर करणारे सुनील बर्वे मागील २५ पेक्षा अधिक वर्ष मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. सुनील बर्वे यांनी आपल्या अभिनय यात्रेची सुरवात "अफलातून" या नाटकातून केली, त्यानंतर त्यांनी "मोरूची मावशी", "कशी मी राहू तशीच", "वन रूम किचन", "चार चौघी", "म्हणून मी तुला कुठे नेत नाही", "ह्यांना जमतं तरी कसं", "असेच आम्ही सारे", "हेलो इन्स्पेक्टर", "श्री तशी सौ", "बायकोच्या नकळतच", "हिच तर प्रेमाची गंमत आहे", "मासिबा" आणि "ऑल द बेस्ट" अशा मराठी, गुजराती आणि इंग्लिश नाटकांमधून भूमिका केल्या. "सुबक" या संस्थेची स्थापना करून द्वारे ते नाट्य निर्मितीच्या क्षेत्रात उतरले. "हर्बेरियम" हा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी सुरु केला त्यात त्यांनी गाजलेल्या जुन्या ५ नाटकांना नवीन स्वरुपात प्रेक्षकांच्या समोर आणले. यातील सर्वच नाटकांचे मोजके २५ प्रयोग करण्यात आले. यापैकी "झोपी गेलेला जागा झाला" हे नाटक नागपूरला बघण्याची संधी मला मिळाली. "हर्बेरियम" या उपक्रमातील अनुभवावर आधारित याच नावाने पुस्तकही त्यांनी लिहिले असून तारांगण प्रकाशन ने ते प्रकाशित केले आहे.
सचिन पिळगावकर दिग्दर्शित ''आत्मविश्वास" हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर त्यांनी "सुगंध", "तू तिथे मी", "पाश", "आहुती", "लपंडाव", "जमल हो जमल", "आई", "तन्नू कि टिना", "निदान", "अस्तित्व", "दिवसेंदिवस", "आनंदाचे झाड", "सुर राहु दे", "गोजिरी", "तूच खरी घरची लक्ष्मी", "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं" या चित्रपटात अभिनय केला आहे. या वर्षी त्यांचे "प्राइम टाइम" आणि "हायवे" हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
नाटक आणि चित्रपटांसोबतच अनेक मराठी, हिंदी आणि गुजराती मलिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे, या मलिकांमध्ये ''कुंकू", "कळत नकळत", "असंभव", "अभी तो मै जवान हु", "अधांतरी", "अवंती", "अवंतिका", "आवाज", "बोलाची कढी", "चाळ नावाची वाचाळ वस्ती", "छैल छबीला", "चतुराई", "गोष्ट एका आनंदची", "हे सारे संचीताचे", "इमारत", "जावई शोध", "झोका", "झुट्न जरीवाला", "ज्योति", "कर्तव्य", "कौन अपना कौन पराया", "कोई सुरत नजर नही आती", "कोरा कागज", "नायक", "प्रपंच", "प्रो. प्यारेलाल", "रिमझीम", "सप्तर्शी", "श्रीयुत गंगाधर टिपरे", "स्वयंम", "थरार", "त्रेधा तिरपिट" आणि "वाळवाचा पाऊस" या मालिकांचा समावेश आहे.
त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.sunilbarve.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
No comments:
Post a Comment