Sunday 27 December 2015

गिरीजा ओक

आज (२७ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री गिरीजा ओक यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गिरिजा ओक या सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांच्या कन्या आहेत. त्यांनी "तारे जमीं पर" या हिंदी चित्रपटातून आपली कारकीर्द सुरु केली. या चित्रपटात आमिर खान यांच्यासोबत त्यांची भूमिका होती. यानंतर त्यांनी "गोष्ट छोटी डोंगरा एवढी", "गुलमोहर", "हाउस फुल", "मानिनी", "हुप्पा हुय्या", "अडगुळ मडगुळ", "शोर इन द सिटी", "सायकल किक" आणि "नवरा माझा भवरा" या चित्रपटात वेगवेगळया भूमिका केल्या आहेत.     

Saturday 26 December 2015

गौतम जोगळेकर

आज (२६ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक गौतम जोगळेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गौतम जोगळेकर हे प्रसिद्द चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी नाना पाटेकर दिग्दर्शित "प्रहार" या चित्रपटातून अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. २००५ साली त्यांनी नाना पाटेकर यांना घेऊन "पक पक पकाक" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाद्वारे नाना पाटेकर यांनी मराठी चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. हा चित्रपट टिकिट खिडकीवर यशस्वी ठरला. २०१२ साली "जय जय महाराष्ट्र माझा" हा चित्रपट दिग्दर्शित केला.

सचिन कुंडलकर

आज (२६ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सध्या चित्रपट सुष्टित कार्यरत असलेल्या संवेदनशील दिग्दर्शकांपैकी सचिन कुंडलकर हे आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात मानवी संवेदनाच्या छटा बघायला मिळतात. आतापर्यंत त्यांनी "रेस्टॉरंट", "निरोप", "गंध", "हॅपी जर्नी" आणि "राजवाडे एंड सन्स" हे मराठी चित्रपट दिग्दर्शित केले आहे. हिंदीमध्ये त्यांनी "अय्या" हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रानी मुखर्जी यांची प्रमुख भूमिका होती.

सचिन ककुंडलकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
  • रेस्टॉरंट (२००६)
  • निरोप (२००७)
  • गंध (२००९)
  • अय्या (२०१२)
  • हॅपी जर्नी (२०१४)
  • राजवाडे एंड सन्स (२०१५)

Friday 25 December 2015

अतुल काळे

आज (२५ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अतुल काळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अतुल काळे यांनी वैविध्यपूर्ण विषयावरील मराठी चित्रपट दिग्दर्शित करुन मराठी चित्रपट सुष्टित आपली दिग्दर्शक म्हणून वेगळी छाप सोडली आहे. मागच्या वर्षी अतुल काळे दिग्दर्शित ''बाळकडू" आणि "सन्दूक" हे चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही वेगवेगळया प्रकारचे चित्रपट होते. 

अतुल काळे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
  • मातीच्या चुली (२००६)
  • दे धक्का (२००८)
  • तीचा बाप त्याचा बाप (२०११) 
  • बाळकडू (२०१५)
  • सन्दूक (२०१५)

Friday 18 December 2015

संजय नार्वेकर

आज (१८ डिसेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते संजय नार्वेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Thursday 17 December 2015

रीतेश देशमुख


आज (१७ डिसेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते रीतेश देशमुख यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! रीतेश विलासराव देशमुख या मराठी अभिनेत्याने हिंदी चित्रपट सुष्टित आपल्या अभिनयाने वेगळे स्थान निर्माण केले व नंतर "लय भारी" च्या निमित्ताने मराठीत पदार्पण करुन मराठी टिकिट खिडकीवर उत्पन्नाचे नवीन उच्चांक बनवले. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ''लय भारी" चा  सीक्वल ''माऊली" सध्या निर्माण अवस्थेत आहे. रवी जाधव सध्या त्यांच्या "बैंजो" या पहिल्या हिंदी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत, या चित्रपटात रीतेश देशमुख यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात रीतेश देशमुख एका आगळया वेगळ्या लूकमध्ये बघायला मिळणार आहे. रीतेश देशमुख यांनी खालील हिंदी आणि मराठी चित्रपटात अभिनय केला आहे. 
  • तुझे मेरी कसम (२००३)  
  • आउट ऑफ कन्ट्रोल (२००३)
  • नाच (२००४)
  • मस्ती (२००४)
  • क्या कूल हैं हम (२००५)
  • ब्लफ़ मास्टर (२००५)
  • होम डिलीवरी (२००५)
  • अपना सपना मनी मनी (२००६)
  • डरना जरूरी है (२००६)
  • मालामाल वीकली (२००६)
  • फाइट क्लब (२००६)
  • धमाल (२००७)
  • नमस्ते लंदन (२००७)
  • हे बेबी (२००७)
  • कैश (२००७)
  • ओम शाँति ओम (२००७)
  • दे ताली (२००८)
  • चमकू (२००८)
  • डू नॉट डिस्टर्ब (२००९)
  • अलादीन (२००९)
  • कल किसने देखा (२००९)
  • रण (२०१०)
  • जाने कहा से आयी है (२०१०)
  • हाउसफुल (२०१०)
  • झूठा ही सही (२०१०)
  • फ़ालतू (२०११)
  • डबल धमाल (२०११)
  • कूची कूची होता है (२०११)
  • लव ब्रेकउप ज़िन्दगी (२०११)
  • तेरे नाल लव हो गया (२०१२)
  • हाउसफुल २ (२०१२)
  • क्या सुपर कूल है हम (२०१२)
  • ग्रैंड मस्ती (२०१३)
  • हिम्मतवाला (२०१३)
  • हमशकल्स (२०१४)
  • एक विलन (२०१४)
  • लय भारी (२०१४)
  • एंटरटेनमेंट (२०१४)
  • बंगिस्तान (२०१५)
  • क्या कूल है हम ३ (२०१६)
  • मस्तीजादे (२०१६) 



Saturday 12 December 2015

संतोष जुवेकर

आज (१२ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते संतोष जुवेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! 

मराठी चित्रपट सुष्टिला संतोष जुवेकर यांच्या रूपाने एक डैशिंग हीरो मिळाला आहे. संतोष जुवेकर अवधूत गुप्ते दिग्दर्शित "झेंडा" या चित्रपटातून प्रकाश झोतात आले. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "जब मिले छोरा छोरी" आणि "पोलिस लाइन" या चित्रपटाचा समावेश आहे.    

संतोष जुवेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट 
  • ब्लाईंड गेम (२००६)
  • सखे (२००७)
  • सनई चौघडे (२००८)
  • मुंबई मेरी जान (२००८)
  • पिकनिक (२००८)
  • गलती (२००८)
  • बेधुंद (२००९)
  • चल गंमत करु (२००९)
  • रिंगा रिंगा (२००९)
  • ती रात्र (२०१०)
  • पाश (२०१०)
  • २०१४ राजकारण (२०१०)
  • झेंडा (२०१०)
  • पांगिरा (२०१०)
  • मोरया (२०११)
  • फक्त लढ म्हणा  (२०११)
  • २०१४ राजकारण (२०११)
  • शहानपण देगा देवा (२०११)
  • शर्यत (२०१२)
  • जन गण मन (२०१२)
  • शाळा (२०१२)
  • मॅटर (२०१२)
  • खेळ मांडला (२०१२)
  • या गोल गोल डब्ब्याला (२०१२)
  • ३१ डिसेम्बर (२०१२)
  • गडबड गोंधळ (२०१२)
  • तेंडुलकर आउट (२०१२)
  • रेगे (२०१३)
  • कैंपस कट्टा (२०१४)
  • एक तारा (२०१४)
  • बाइकर्स अड्डा (२०१५)

उमेश कामत

आज (१२ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते उमेश कामत यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेटी नायक म्हणून उमेश कामत यांनी ओळख मिळवली आहे. "कायद्याच बोला" या चित्रपटातून त्यांनी २००६ साली आपली चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. ते प्रिया बापट यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत. त्यांनी खालील मराठी चित्रपटातून अभिनय केला आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती करीता तुम्ही त्यांच्या www.umeshkamat.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.  
  • कायद्याच बोला (२००६)
  • समर - एक संघर्ष (२००६)
  • पटल तर घ्या (२००८)
  • अजब लग्नाची गजब गोष्ट (२०१०)
  • मणि मंगलसूत्र (२०१०)
  • थोडी खट्टी थोडी हट्टी (२०१२)
  • धागे दोरे (२०१२)
  • परीस (२०१३)
  • टाइम प्लीज (२०१३)
  • माय डिअर यश (२०१३)
  • लग्न पाहावे करून (२०१३)
  • पुणे वीअ  बिहार (२०१४) 
  • बाळकडू (२०१५)
  • अ पेइंग घोस्ट (२०१५)
  • मुंबई टाइम (२०१६)

भरत जाधव

आज (१२ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार अभिनेते भरत जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली "लोकधारा" मधून आपली अभिनय यात्रा सुरु केली. नंतर त्यांना "सही रे सही" नाटकातून ओळख मिळाली. त्यांच्या इतर नाटकांमध्ये "श्रीमंत दामोदर पंत", "ऑल  बेस्ट", "आमच्या सारखे आम्हीच" आणि "ढॅण्ट ढॅण" या नाटकांचा समावेश आहे. नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत त्यांची जोडी जमली. या जोडीनी अनेक यशस्वी नाटके व चित्रपट दिले आहेत. भरत जाधव हे त्यांच्या कॉमिक टाइमिंग साठी ओळखले जातात. "चिरंजीव" या त्यांच्या येणाऱ्या चित्रपटात ते अत्यंत वेगळया भूमिकेत दिसणार आहे.  

भरत जाधव यांनी अभिनय केलेले चित्रपट  
  • वास्तव  (१९९९)
  • खतरनाक (२०००)
  • प्राण जाये पर शान न जाये (२००३)
  • हाऊस फुल्ल (२००४)
  • नव-याची कमाल बायकोची धमाल (२००४)
  • खबरदार (२००५)
  • पछाडलेला (२००५)
  • सरीवर सर (२००५)
  • माझा नवरा तुझी बायको (२००६)
  • नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे (२००६)
  • जत्रा (२००६)
  • चालू नवरा भोळी बायको (२००६)
  • गोलमाल (२००६)
  • मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
  • बकुळा नामदेव घोटाळे (२००७)
  • गलगले निघाले (२००८)
  • साडे माडे तीन (२००८)
  • गोंद्या मारतंय तंगडं (२००८)
  • लग्नाची वरात लंडनच्या घरात (२००९)
  • क्षणभर विश्रांती (२०१०)
  • टाटा बिरला आणि मैना (२०१०)
  • शिक्षणाच्या आयच्या घो (२०१०)
  • जावई बापू जिंदाबाद (२०१०)
  • झक मारली बायको केली (२०१०)
  • बम बम बोले (२०१०)
  • डावपेच (२०११)
  • शहाणपण देगा देवा ! (२०११)
  • झिंग चिक झिंग (२०११)
  • फक्त लढ म्हणा (२०११)
  • बाबुरावला पकडा (२०१२)
  • नो एंट्री - पुढे धोका आहे (२०१२)
  • दम असेल तर (२०१२)
  • खो-खो (२०१२)
  • येड्यांची जत्रा (२०१२)
  • पुणे व्हाया बिहार (२०१३)
  • सत ना गत (२०१३)
  • श्रीमंत दामोदर पंत (२०१३)
  • अग बाई अरेच्या २ (२०१५)
  • पी से पी एम तक (२०१५)

किरण नाटकी