Sunday 28 February 2016

वर्षा उसगांवकर



आज (२८ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! वर्षा उसगांवकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून प्रमुख भूमिका केल्या आहेत. लक्ष्मीकांत बर्डे यांच्या सोबत त्यांची सोबत त्यांची जोड़ी खुप गाजली. “अफलातून”, “अबोली”, “अर्जुन”, “आत्मविश्वास”, “आमच्या सारखे आम्हीच”, “उपकार दुधाचे”, “एक होता विदूषक”, “ऐकावं ते नवलच”, “कुठं कुठं शोधू मी तिला”, “खट्याळ सासू नाठाळ सून”, “गंमत जंमत”, “घनचक्कर”, “चल गंमत करु”, “जखमी कुंकू”, “जमलं हो जमलं”, “डोक्याला ताप नाही”, “तुझ्याचसाठी”, “तुझ्यावाचून करमेना”, “धनी कुंकवाचा”, “नवरा बायको”, “पटली रे पटली”, “पसंत आहे मुलगी”, “पैंजण”, “पैज लग्नाची”, “पैसा पैसा पैसा”, “प्रेमाच्या सुलट्या बोंबा”, “बाप रे बाप”, “बायको चुकली स्टँडवर”, “भुताचा भाऊ”, “मज्जाच मज्जा”, “मालमसाला”, “मुंबई ते मॉरिशस”, “यज्ञ”, “राहिले दूर घर माझे”, “रेशीमगाठी”, “लपंडाव”, “शुभमंगल सावधान”, “शेजारी शेजारी”, “सगळीकडे बोंबाबोंब”, “सवत माझी लाडकी”, “सवाल माझ्या प्रेमाचा”, “सुहासिनी”, “सूडचक्र”, “हमाल दे धमाल” आणि “हाऊसफुल्ल” या मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. 

Monday 22 February 2016

केतकी माटेगावकर

आज (२२ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री केतकी माटेगावकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! "सा रे गा मा" या गाण्याच्या रियलिटी शो मधून पहिल्यांदा केतकीची ओळख सर्वांना झाली. गायनानंतर केतकीनी "शाळा" या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयात पाहिले पाऊल टाकले. "शाळा" या पहिल्याच चित्रपटात केतकीनी रसिकांची मने जिंकून घेतली. "शाळा" नंतर ती "काकस्पर्श", "तानी", "टाईम पास", "टाईम पास २" या चित्रपटांमधून दिसली. आता तिचा "फुंटरू" हा मराठी चित्रपट येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटातील तिच्या वेगळया लूकची जोरदार चर्चा आहे. "शाळा" नंतर दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या सोबत तिचा दूसरा चित्रपट असणार आहे.

Friday 19 February 2016

अवधूत गुप्ते

आज (१९ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठीतील प्रसिद्द संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी आपली ओळख आता दिग्दर्शक म्हणून पक्की केली आहे. "झेंडा", "मोरय्या", "जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा" आणि "एक तारा" या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. 

संगीत दिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शना सोबतच टीवीवर "सा रे गा मा" या शोचा परीक्षक आणि "खुपते तिथे गुप्ते" चे सूत्र संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती साठी तुम्ही त्यांच्या www.avadhootgupte.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. 

Wednesday 17 February 2016

प्रसाद ओक

आज (१७ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्रसाद ओक यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रसाद ओक हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आतापर्यंत अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, गायक, सूत्र संचालक, कवी आणि चित्रपट निर्माता अश्या वेगवेगळया भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ते २०११ साली झालेल्या सारेगामापा च्या सेलिब्रिटी पर्वाचे विजेते होते. सध्या "कच्चा निम्बू" या चित्रपटाचे दिग्दर्शन ते करत आहेत.  

Tuesday 16 February 2016

गजेन्द्र अहिरे

आज (१६ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक गजेन्द्र अहिरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गजेन्द्र अहिरे मागील तीन दशकांपासून नाटक, टीवी व चित्रपटांच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी ''विठ्ठल विठ्ठल'', ''नॉट ओनली मिसेस राउत'', ''सरीवर सरी'', ''सैल'', ''सावर रे'', ''त्या रात्री पाऊस होता'',''नातिगोती'', ''दिवसानं दिवस'', ''बयो'', ''शेवरी'', ''एक क्रांतिवीर - वासुदेव बलवंत फड़के'', ''गुलमोहर'', सुम्भराण'', ''पारध'', ''समुद्र'', ''एका शब्दात सांगतो'',  ''हैल्लो जयहिन्द'', ''पिपानी'', ''टूरिंग टॉकीज'', ''अनुमति'', ''पोस्टकार्ड'', ''अनवट'', ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' सारखे वेगवेगळ्या सामाजिक विषयावर आशयपूर्ण व सुन्दर चित्रपट बनवले आहे. अतिशय कमी वेळात चित्रपट बनवण्यासाठी ते प्रसिद्ध असेल तरी त्यांचा प्रत्येक चित्रपट एक वेगळा अनुभव असतो. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''नीलकंठ मास्टर'' व ''टाच'' या चित्रपटाचा समावेश आहे.     

Saturday 6 February 2016

परेश मोकाशी

आज (६ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! परेश मोकाशी हे आज मराठी चित्रपटसुष्टीतील महत्वाचे दिग्दर्शक आहेत.  त्यांना त्यांच्या "हरिचंद्राची फैक्टरी" या पहिल्या चित्रपटासाठी बराच संघर्ष करावा लागला. हा चित्रपट दादासाहेब फालके यांच्या जीवनावर आधारीत होता. प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक झाले. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवला गेला. "एलिज़ाबेथ एकादशी" हा त्यांचा दूसरा मराठी चित्रपट होता. या चित्रपटाला रसिक आणि समीक्षक दोघांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्करांमध्ये सर्वोकृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला.     

Wednesday 3 February 2016

मानसी नाईक

आज (३ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मानसी नाईक यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मानसी नाईक यांनी "ज़बरदस्त" या चित्रपटातून आपली अभिनयाची कारकीर्द सुरु केली. २०१२ साली आलेल्या "तीन बायका फजीती आयका" या चित्रपटातील "वाट बघतोय रिक्शावाला" या आइटम सांग ने त्यांना विशेष प्रसिद्धि मिळवून दिली. या सोबतच त्यांनी "टारगेट", "फक्त लढ म्हणा", "कुटुंब", "कोकणस्थ", "हुतुतु" आणि "मर्डर मिस्त्री" या चित्रपटात अभिनय केला आहे. "चला हवा येऊ दया" च्या काही भागांमध्ये पण त्यांनी अभिनय केला आहे.  

Monday 1 February 2016

विभावरी देशपांडे

आज (१ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री विभावरी देशपांडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! चित्रपट सुष्टित प्रवेश करण्याआधी त्या नाटकांमध्ये अभिनय आणि संवाद लेखन करायच्या. विभावरी देशपांडे यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनय केला असला तरी "हरिचन्द्राची फैक्टरी" या परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपटातील दादासाहेब फाळके यांची पत्नी सरस्वती फाळके यांच्या भूमिकेने त्यांना ओळख मिळवून दिली. या भूमिकेसाठी त्यांना मिफ्ताचा सर्वोकृष्ट  अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. 

विभावरी देशपांडे यांनी खालील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 
  • चकवा (२००४)
  • श्वास (२००४)
  • सातच्या आत घरात (२००४)
  • दम काटा (२००७)
  • मुंबई मेरी जान (२००८)
  • हरिश्‍चंद्राची फॅक्टरी (२००९)
  • नटरंग (२०१०)
  • बालगंधर्व (२०११)
  • देऊळ (२०११)
  • चिंटू (२०१२)
  • तुह्या धर्म कोनचा? (२०१२)   

किरण नाटकी