Wednesday 30 September 2015

ऑक्टोबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस

ऑक्टोबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस 

  • १ ऑक्टोबर - विवेक कजारीया (निर्माता)
  •  ऑक्टोबर - कौशल ईमानदार (संगीत दिग्दर्शक)  
  •  ऑक्टोबर - गणेश गारगोटे (पि आर)
  •  ऑक्टोबर - देविका दफ्तरदार (अभिनेत्री)
  • ३ ऑक्टोबर - सुनील बर्वे (अभिनेता)
  • ३ ऑक्टोबर - अजित भैरवकर (दिग्दर्शक)
  • ५ ऑक्टोबर - संजीव अभ्यंकर (गायक)
  • ६ ऑक्टोबर - प्रकाश पांचाल (दिग्दर्शक)
  • ६ ऑक्टोबर - सलिल कुलकर्णी (संगीत दिग्दर्शक)
  • ८ ऑक्टोबर - मधुरा वेलणकर (अभिनेत्री)
  • ८ ऑक्टोबर - राजेश चिटणीस (अभिनेता)
  • १० ऑक्टोबर - अमोल भुते (अभिनेता) 
  • १० ऑक्टोबर - कमलाकर सातपुते (अभिनेता)
  •  ऑक्टोबर - समित कक्कड (दिग्दर्शक) 
  • १३ ऑक्टोबर - स्पृहा जोशी (अभिनेत्री)
  • १३ ऑक्टोबर - कादंबरी कदम (अभिनेत्री)
  • १३ ऑक्टोबर - शरद पोंक्षे (अभिनेता)
  • १३ ऑक्टोबर - विवेक गोरे (दिग्दर्शक)
  • १५ ऑक्टोबर - मनोहर सरवणकर (दिग्दर्शक)
  • १६ ऑक्टोबर - अदिती सारंगधर (अभिनेत्री)
  • १९ ऑक्टोबर - अजित केतकर (गायक)
  • २० ऑक्टोबर - अतुल तोडणकर (अभिनेता)
  • २१ ऑक्टोबर - क्षितिज वाघ (संगीत दिग्दर्शक)
  • २१ ऑक्टोबर - दिपक नायडू (दिग्दर्शक)
  • २२ ऑक्टोबर - अजित देवळे (दिग्दर्शक)
  • २२ ऑक्टोबर - दिनेश भोसले (दिग्दर्शक) 
  • २३ ऑक्टोबर - सिद्धार्थ जाधव (अभिनेता)
  • २९ ऑक्टोबर - राजेश श्रृंगारपुरे (अभिनेता)
  • २९ ऑक्टोबर - सतीश मोटलिंग (दिग्दर्शक)
  • ३० ऑक्टोबर - विक्रम गोखले (अभिनेता)

सतीश मनवर

आज (३० सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सतीश मनवर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

मराठी चित्रपट सृष्टीतील संवेदनशील दिग्दर्शक सतीश मनवर यांनी त्यांची सामाजिक विषयाची जाण त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. २००९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट "गाभ्रीचा पाऊस" प्रदर्शित झाला. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यावर आधारित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि ज्योती सुभाष असे कलावंत होते. या चित्रपटाला अंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले. आज सामाजिक विषयावर आधारित चांगल्या मराठी चित्रपटांमध्ये "गाभ्रीचा पाऊस"चे नाव आवर्जून घेतल्या जाते. 

त्यांचा दूसरा चित्रपट उपेन्द्र लिमये व विभावरी देशपांडे अभिनीत ''तुह्या धर्म कोंणचा" हा होता. हा चित्रपट आदिवासी समाजात असलेल्या धर्मांतराच्या समस्येवर आधारित होता. या चित्रपटाला २०१४ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये "सामाजिक विषयावरचा सर्वोकृष्ट चित्रपटा"चा पुरस्कार मिळाला आहे.   

Monday 28 September 2015

लता मंगेशकर

आज (२८ सप्टेम्बर) भारतरत्न लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

मागील सात दशकांपासून लताजी भारतीय संगीताच्या क्षेत्रात आपल्या सुमधुर आवाजाने अधिराज्य गाजवत आहेत. त्यांना २००१ साली त्यांच्या भारतीय संगीत सृष्टीतील योगदानासाठी "भारतरत्न" या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले आहे. त्यांना ''लता दीदी" या नावाने ओळखले जाते. लता दीदीने आपल्या बालपणी संगीत नाटकात बाल कलाकार म्हणून कामाला सुरवात केली. मास्टर विनायक यांनी त्यांना आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली व त्यातील गाणी खुप गाजली. त्यानंतर हिंदी चित्रपटांमध्ये त्या काळच्या सर्वच दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले.    

महेश कोठारे

आज (२८ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

महेश कोठारे यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील वाटचालीची सुरवात बालकलाकार म्हणून केली. "धूम धडाका" हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता, या चित्रपटाला चांगले यश मिळाले. त्यानंतर त्यांनी "दे दणा दण", "थरथराट", "धडाकेबाज", "जीवलगा", "झपाटलेला", "माझा छकुला", "धांगडधिंगा", "खतरनाक", "चिमणी पाखरं", "पछाडलेला", "खबरदार", "शुभमंगल सावधान", "जबरदस्त", "वेड लावी जीवा", "दुभंग" आणि "झपाटलेला २" हे चित्रपट दिग्दर्शित केले आहे. या मध्ये त्यांनी लक्ष्मीकांत बर्डे यांच्यासोबत त्यांची जोडी छान जमली. त्यांच्या "छकुला" या चित्रपटावरच आधारित "मासूम" या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन ही त्यांनी केले. दिग्दर्शनबरोबरच त्यांनी चित्रपटात अनेक भूमिका पण केल्या, त्यात विशेष म्हणजे त्यांना इंस्पेक्टर भूमिकांसाठी ओळखले जाते.    

Saturday 26 September 2015

समीर धर्माधिकारी

आज (२६ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील डैशिंग अभिनेते समीर धर्माधिकारी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांच्या डैशिंग व्यक्तिमत्वामुळे त्यांनी जाहिरात व अभिनय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अभिनय केलेल्या सचिन कुंडलकर दिग्दर्शित "निरोप" या चित्रपटाला २००७ सालच्या सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमधून महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. जाहिरात व चित्रपटांसोबतच अनेक ऐतिहासिक काळावर आधारीत टिवी मलिकांमधून त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या मध्ये "एक वीर स्त्री की कहानी …. झांसी की रानी", "महाभारत" आणि "बुद्धा: राजो का राजा" याचा समावेश आहे. सध्या त्यांची ''चक्रवर्ती अशोक सम्राट'' हि मालिका कलर्स या वाहिनीवर प्रदर्शित होत आहे.

Friday 25 September 2015

वैभव तत्ववादी

आज (२५ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील युवा अभिनेते वैभव तत्ववादी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सध्या सातत्याने मराठी चित्रपटात दिसून येणाऱ्या चेहऱ्यापैकी वैभव तत्ववादी हे आहेत. वैभव तत्ववादी हे मूळचे नागपूरचे पण पुण्यात इंजीनियरिंग चे शिक्षण घेत असताना अनेक एकांकिका स्पर्धा त्यांनी गाजवल्या. या स्पर्धांतूनच त्यांचा अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाची सुरुवात ''फक्त लढ म्हणा'' आणि ''सुराज्य'' या चित्रपटांमधून झाली. २०१५ हे वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत लकी ठरले आहे. या वर्षी अप्रैल महिन्यात आलेला त्यांचा चित्रपट ''कॉफी आणि बरेच काही'' यशस्वी ठरला. या चित्रपटात त्यांची प्रार्थना बेहरे यांच्याबरोबर जोडी पसंत केल्या गेली सोबतच त्यांच्या अभिनयाचे कौतुक केल्या गेले. हिच जोडी पुन्हा "मि. एंड मिस सदाचारी" या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या वर्षी आलेला त्यांचा दूसरा मराठी चित्रपट ''शॉर्टकट'' हा हैकिंग या आगळ्या वेगळया विषयावर आधारीत होता.

याच वर्षी त्यांनी हिंदी चित्रपटात पदार्पण केले असून त्यांचा ''हंटर'' पहिला हिंदी चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित झाला असून या चित्रपटात त्यांचा परफार्मंसची नोंद फिल्मफेयर मासिकाने सुद्धा घेतली आहे. त्यांचा आगामी हिंदी चित्रपट संजय लीला भंसाली दिग्दर्शित ''बाजीराव मस्तानी'' असून हा चित्रपट डिसेम्बर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ते चिमाजी अप्पाच्या महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. वैभव तत्ववादी यांच्या येणाऱ्या चित्रपटांमधे ''चीटर'' या चित्रपटाचा समावेश आहे. अश्यप्रकारे वैभव तत्ववादी यांची सुरुवात खुप आश्वासक आहे.

Tuesday 22 September 2015

रवी जाधव

आज (२२ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! जाहिरात क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी २०१० साली ''नटरंग'' चित्रपट दिग्दर्शित करून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान मिळाला, त्यांना सर्वोकृष्ट दिग्दर्शासाठी जी गौरव पुरस्कार देण्यात आला.  यासोबतच अनेक चित्रपट सोहळ्यांमध्ये "नटरंग''ला अनेक पुरस्कार मिळाले. ''नटरंग''ने टिकिट खिडकीवर सुद्धा तूफान गर्दी खेचली. दिग्दर्शन, अभिनय, संगीत, नृत्य अशा सगळ्यालाच अंगासाठी ''नटरंग''चा गौरव करण्यात आला. त्यामुळे पदर्पणातच त्यांनी स्टार दिग्दर्शक अशी ओळख निर्माण केली व ती "बालगंधर्व", "बालक पालक", "टाईमपास", "टाईमपास २" आणि "बायस्कोप (मित्रा)" अशी वाढत गेली.

आता रवी जाधव हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते सध्या ''बैंजो'' या त्यांच्या आगामी हिंदी चित्रपटावर काम करत आहेत. त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.ravijadhav.com या ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता.

Friday 18 September 2015

प्रिया बापट

आज (१८ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री प्रिया बापट यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! २००० साली प्रदर्शित झालेल्या ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर'' या चित्रपटातुन त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली. त्यानंतर ''मुन्नाभाई MBBS'' आणि ''लगे रहो मुन्नाभाई'' या हिंदी चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या पण त्या छोट्या भूमिकेतही त्यांनी आपली चमक दाखवली. ''मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'' या प्रचंड गाजलेल्या चित्रपटात त्यांनी सचिन खेडेकर यांच्या मुलीची भूमिका केली होती. २०१३ साली आलेला महेश मांजरेकर दिग्दर्शित ''काकस्पर्श'' हा चित्रपट त्यांच्या करियरला कलाटणी देणारा ठरला. त्यात प्रिया बापट यांनी बालविधवेची भूमिका केली होती. त्यानंतर ''टाईम प्लीज'', "आंधळी कोथिम्बीर'', "हैप्पी जर्नी ", "लोकमान्य एक युग पुरुष" आणि " टाईम पास २" असे यशस्वी चित्रपट त्यांनी दिले आहे. या सर्वच चित्रपटात त्यांच्या अभिनयाचे व लूकचे कौतुक झाले. 

आज घडीला १९ लाखापेक्षा जास्त लोक त्यांच्या फेसबुक पेजला लाइक करतात, यावरून त्यांचे किती फैंस आहेत याचा सहज अंदाज येऊ शकतो. ''नवा गडी नव राज्य" हे त्यांच अत्यंत गाजलेल नाटक, या नाटकावर ''टाईम प्लीज'' या चित्रपटाची निर्मिती झाली त्यातही त्यांची प्रमुख भूमिका होती. याच नाटकातील त्यांचे सह कलाकार व चित्रपट अभिनेता उमेश कामत यांच्या सोबत त्या विवाहबद्ध झाल्या आहेत. उमेश कामत व प्रिया बापट हि मराठी चित्रपट सृष्टि मधील सर्वात क्यूट जोडी आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.priyabapat.in या ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता. 

Sunday 13 September 2015

उषा नाडकर्णी

आज (१३ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! नकारात्मक भूमिकेसाठी त्या प्रसिद्द आहेत. त्यांची ''माहेरची साडी'' या चित्रपटातील सासूची भूमिका आज ही लोकांच्या लक्षात आहे. बहुधा हिच त्यांची ओळख झाली, इतकी हि भूमिका गाजली. टिवी मालिका ''पवित्र रिश्ता'' मधील त्यांची सविता देशमुख हि भूमिकाही खुप गाजली. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. सोबतच ''सिंहासन'', ''गुंडाराज'', "वास्तव'', ये तेरा घर ये मेरा घर", ''कृष्णा कॉटेज", "वन टू थ्री", ''अगडबंब" आणि "येलो" या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. “गुरू”, “महासागर”, “पुरुष”, “आम्ही बिघडलो”, “पाहुणा” आणि “आमच्या या घरात” या नाटकातून त्यांनी अभिनय केला आहे.

Saturday 12 September 2015

स्मिता ताम्बे

आज (१२ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री स्मिता ताम्बे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मोजके पण चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीमध्ये स्मिता ताम्बे यांचे नाव घेतल्या जाते. अभिनयासोबतच त्या नुत्यामध्ये निपुण आहेत. ''मराठी तारका'' या नुत्याच्या कार्यक्रमाच्या त्या भाग आहेत. त्यांनी ''नाती गोती '', ''तुकाराम'', ''जोगवा '' आणि ''७२ मैल एक प्रवास'' या चित्रपटात अभिनय केला आहे. ''देऊळ'' या मराठी चित्रपटात एक विशेष नुत्य त्यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.

Friday 11 September 2015

अतुल गोगावले

आज (११ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक अतुल गोगावले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!  हिंदी आणि मराठीमधील आघाडीचे संगीत दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जातात. ''अजय अतुल'' या संगीतकार जोडीतील अतुल गोगावले हे थोरले  बंधू. २००९ साली आलेल्या ''जोगवा'' चित्रपटासाठी सर्वोकृष्ट संगीत दिग्दर्शकांचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर २०१० आलेल्या ''नटरंग'' या चित्रपटाने त्यांची गाणी अवघ्या मराठी जनाच्या ओठावर रुळली. रवी जाधव दिग्दर्शित ''नटरंग'' चित्रपटाच्या यशामागे ''अजय-अतुल'' या जोडीच्या संगीताचा महत्वाचा वाटा होता. या चित्रपटातील सर्वच गाणी खुप गाजली. मागील वर्षी आलेल्या ''लय भारी'' या चित्रपटातील ''माऊली माऊली'' या गाण्याने लोकप्रियतेचा नवीन विक्रम निर्माण केला. 

“अगं बाई अरेच्च्या!”, “गोड गुपित”, “जत्रा”, “सावरखेड एक गाव”, “जबरदस्त”, “बंध प्रेमाचे”, “साडे माडे तीन”, “चेकमेट”, “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं”, “मुंबई आमचीच”, “उलाढाल”, “एक डाव धोबीपछाड”, “बेधुंद”, “ऑक्सिजन”, “रिंगा रिंगा”, “भारतीय” आणि “टपाल” या मराठी चित्रपटांना ही त्यांनी संगीत दिले आहे. हरिहरन, कृणाल गांजावाला, सोनू निगम आणि श्रेया घोषाल अशा हिंदीतील दिग्गजांकडून त्यांनी मराठी गाणी गाऊन घेतली आहे. ''सिंघम'' आणि ''अग्निपथ'' या त्यांच्या हिंदी चित्रपटातील गाणी हि खुप लोकप्रिय झाली. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.ajayatul.com या त्यांच्या ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता. या वेबसाईटचे अनावरण माननीय अभिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले होते.

Thursday 10 September 2015

अतुल कुलकर्णी

आज (१० सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! नेशनल स्कूल ऑफ़ ड्रामा मधून त्यांनी आपले शिक्षण केले आहे. त्यांनी "कैरी", "ध्यासपर्व", "१०वी फ", "वास्तुपुरुष", "देवराई", "चकवा", "मातीमाय", "वळू", "नटरंग", "प्रेमाची गोष्ट" आणि "हॅपी जर्नी" अशा चित्रपटात अभिनय करून आपली संवेदनशील अभिनेता अशी ओळख पक्की केली आहे. त्यांनी हिंदीमध्ये "हे राम", "चांदनी बार", "दम", "सत्ता", "खाकी", "पेज ३", "रंग दे बसंती" अश्या मोजक्या पण आशयघन चित्रपटात काम करून हिंदी चित्रपट सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी "हे राम" आणि "चांदनी बार" चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

संवेदनशील अभिनयासोबतच संवेदनशील माणूस म्हणून ही त्यांनी आपली ओळख बनवली आहे. वेळोवेळी ते वर्तमानपत्रात अभ्यासपूर्ण लेख लिहून सामाजिक व राजकीय विषयावर आपली मते मांडत असतात. ''क्वेस्ट'' नावाच्या सामाजिक संस्थेद्वारे ते शिक्षणाच्या क्षेत्रात काम करीत आहेत. या संस्थेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही www.quest.org.in वेबसाईटला भेट देऊ शकता. अतुल कुलकर्णी यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.atulkulkarni.com ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता.

Monday 7 September 2015

राधिका आपटे

आज (७ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री राधिका आपटे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अतिशय कमी त्यांनी आपल्या प्रगल्भ अभिनयाने सर्व चित्रपट रसिकांची मने जिंकून घेतली आहे. त्यांनी मराठी आणि हिंदी बरोबर बंगाली, तेलगू, तामिल, मलयालम आणि इंग्लिश भाषेतील चित्रपटात काम करून खुप कमी वेळात अखिल भारतीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ''वाह !!! लाइफ हो तो ऐसी'' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. निशिकांत कामत दिग्दर्शित ''लई भारी'' या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आपली नवीन ओळख निर्माण केली. या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ''बदलापूर'', ''हंटर'' आणि ''मांझी'' या चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या आणि सशक्त भूमिका साकारल्या व हे सर्व चित्रपट टिकिट खिडकीवर यशस्वी झाले हे सुद्धा विशेष.    

Saturday 5 September 2015

''तू हि रे'' आणि ''द शैडो''

या आठवड्यात दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत ''तू हि रे'' आणि ''द शैडो''. 
 
''दुनियादारी'' व ''प्यारवाली लव स्टोरी'' नंतर दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेते स्वप्निल जोशी व अभिनेत्री सई ताम्हणकर या जोडीचा तीसरा चित्रपट ''तू हि रे'' या शुक्रवारी प्रदर्शित झाला. ''तू हि रे'' मध्ये स्वप्निल जोशी, सईं ताम्हणकर व तेजस्विनी पंडित यांनी प्रेम कहानी रंगवली आहे. या चित्रपटाचे मार्केटिंग अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे, चित्रपटाची स्टार वैल्यू खुप जास्त आहे, स्वप्निल जोशी आणि सईं ताम्हणकर यांच्या जोडीने मराठी प्रेक्षकांच्या मनावर आपले नाव कोरले आहे, संजय जाधव यांचे दिग्दर्शन या सर्व बाबींमुळे हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.  

या आठवड्यात प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट ''द शैडो'' हा भयपट असून रोहन सातघरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मानसी नाईक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.    

मागील आठवड्यात ''ढोलकी'', ''हायवे'' आणि ''शेगावीचा योगी गजानन'' हे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते. 

Friday 4 September 2015

मोहन जोशी

आज (४ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मोहन जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! नाटक, चित्रपट आणि टिवी मालिका या तीन हि क्षेत्रात हुकूमत असणार अस हे व्यक्तिमत्व आहे.हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्या खलनायकाच्या भूमिका विशेष गाजल्या. ते सध्या मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. मोहन जोशी यांनी ‘नटखट नट-खट’ या नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.

Thursday 3 September 2015

मनोज जोशी

आज (३ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मनोज जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी व हिंदी व्यतिरिक्त गुजराती व भोजपुरी चित्रपटांतही त्यांनी अभिनय केला आहे. त्यांची भूमिका असलेल्या ''ऋण'' या मराठी चित्रपटाची या वर्षी बरीच चर्चा झाली. या चित्रपटात त्यांनी अतिशय वेगळी अशी भूमिका साकारली होती.

किरण नाटकी