ह्या शुक्रवारी तब्बल पांच मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, ''३.५६ किल्लारी'', ''ढिंच्यॅक एंटरप्राइज'', ''न्यायम'' , ''संगती'' आणि ''स्लॅमबूक''.
दिपक भागवत आणि विजय मिश्रा दिग्दर्शित ''३.५६ किल्लारी'' हा सस्पेंस ड्रामा असून तो किल्लारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आधारीत आहे. या चित्रपटात जैकी श्रॉफ, सई ताम्हणकर, गौरी इंगवले, अनुराग शर्मा, पंकज विष्णु, श्रीकांत मोघे आणि रमा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुढील आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या ''शेगावीचा योगी गजानन'' मध्ये पण जैकी श्रॉफ यांची महत्वाची भूमिका आहे तर सई ताम्हणकर यांचा आगामी चित्रपट ''तू ही रे'' प्रदर्शनास सज्ज आहे.
निशांत सपकाळे दिग्दर्शित ''ढिंच्यॅक एंटरप्राइज'' मधून भूषण प्रधान व मनवा नाईक ही युवा जोडी पहिल्यांदाच मोठ्या पद्यावर येत आहे. सध्या भूषण प्रधान हा नव्या पिढीतील अभिनेत्यांपैकी एक आश्वासक चेहरा आहे, त्याने २०१५ मध्ये ''कॉफी आणि बरेच काही'', ''टाइम पास २'', ''टाइम बरा वाईट'' च्या निमित्ताने आपली दर्जेदार उपस्थिति दाखवून दिली आहे. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''जीत'' आणि ''शिव्या'' या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटामध्ये एका युवा उद्योजकाची व त्यांच्या जीवनातील चढउताराची गोष्ट साकारण्यात आली.
ऋतुराज ढोलगड़े दिग्दर्शित ''स्लॅमबूक'' मध्ये तरुण वयातील मोरपंखी प्रेमकथा साकारण्यात आली आहे. या चित्रपटात शांतनु रंगनेकर, ऋतिका श्रोत्री, दिलीप प्रभावळकर, उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, माधवी सोमण, कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण, सुप्रिया पठारे, योगेश शिरसाठ आणि श्रुति मराठे यांच्या भूमिका आहेत.
सुनील अग्रेसर दिग्दर्शित ''न्यायम'' व रामविजय परब दिग्दर्शित ''संगती'' हे मराठी चित्रपट सुद्धा या आठवड्यात प्रदर्शित झाले आहेत.
मराठी चित्रपटांची भाऊ गर्दी अशीच सुरु राहणार असून, पुढील आठवड्यात ''ढोलकी'', ''हायवे'' आणि ''शेगावीचा योगी गजानन'' हे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
No comments:
Post a Comment