Wednesday 29 July 2015

''हायवे''च्या निमित्ताने

ह्या शुक्रवारी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, ''कैर्री ऑन मराठा'', ''मनातल्या उन्हात'' आणि ''पन्हाळा''. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ''हायवे'' हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. तशी पूर्व प्रसिद्धीही करण्यात आली होती, पण प्रदर्शनाच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. मराठीत अशा प्रकारची प्रदर्शनाची तारीख बदलण्याची अलीकडे प्रेक्षकांना सवय झाली आहे. काही दिवसांपैकी ''सासुचे स्वयवर'', ''साट लोट पण सगळ खोट'', ''बाइकर्स अड्डा'' अशा चित्रपटाच्या बाबतीत हा प्रकार घडला अाहे. मराठी चित्रपटाच्या वाढत्या संख्येमुळे दर शुक्रवारी मराठी चित्रपटाची भाऊगर्दी वाढत आहे त्यामुळे बहुधा वेळेवर प्रदर्शनाची तारीख बदलण्यात येत असावी. ''बजरंगी भाईजान'' आणि ''बाहुबली''ची टिकिट खिड़की वरची घोडदौड इतर तीन मराठी चित्रपट यामुळे ''हायवे''चे प्रदर्शन लांबवण्यात आले असावे.    
    
''वळु'' आणि ''देऊळ'' नंतर गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी या लेखक दिग्दर्शक जोडीचा ''हायवे - एक सेल्फी आर पार'' हा तीसरा चित्रपट आहे. मराठीतील पहिला रोड मूवी चित्रपट अशी या चित्रपटाची प्रसिद्धि करण्यात येत आहे. ''हायवे''मध्ये गिरीश कुलकर्णी, हुमा कुरैशी, टिस्का चोप्रा, रेणुका शहाणे, विद्याधर जोशी, मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, मयूर खंडगे, श्रीकांत यादव, किशोर चौगुले, किशोर कदम, वृषाली कदम, पूर्वा  पवार आणि नागराज मंजुळे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर एका गूढ़ रम्य चित्रपटाचा फिल देणारा आहे. अधिक सुखासाठी ''हाइवे''चा प्रवास लांबणीवर टाकण्यात आला असला तरी २८ ऑगस्टला या चित्रपटाचा आस्वाद घेण्याचा संधी सर्व प्रेक्षकांना मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

किरण नाटकी