Thursday, 2 July 2015

''ढोल ताशे '', ''ऑनलाईन बिनलाईन'' आणि ''शटर''

मागील दोन आठवड्याप्रमाणेच ह्या आठवड्यातही तीन मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ''ढोल ताशे'', ''ऑनलाईन बिनलाईन'' आणि ''शटर''.

अंकुर काकटकर दिग्दर्शित ''ढोल ताशे'' मध्ये जितेन्द्र जोशी, अभिजीत खांडकेकर, हृषिता भट्ट, प्रदिप वेलणकर, इला भाटे, विद्याधर जोशी, विजय अढाळकर, शेखर फडके, राजकुमार अंजूटे आणि स्व. विनय आपटे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातून ढोल ताशाच्या माध्यमातून युवकांची व राजकारणाची गोष्ट सांगण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हृषिता भट्ट मराठी चित्रपट सृष्टित पुनरागनम करत आहे.  

केदार गायकवाड दिग्दर्शित नवीन पिढीमध्ये असणाऱ्या सोशल मीडीयाच्या क्रेजची गोष्ट सांगणारा ''ऑनलाईन बिनलाईन'' हा चित्रपट ह्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमने, ऋतुजा शिंदे, प्रशांत कामत आणि पौर्णिमा मनोहर अशा यंग चार्म्सच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने केदार गायकवाड हा युवा छायाचित्रकार दिग्दर्शन न्हणुन पदार्पण करीत आहे.

या शुक्रवारी ''शटर'' हा आगळा वेगळा चित्रपट प्रदर्शित होतोय. वि के प्रकाश दिग्दर्शित ''शटर'' मध्ये सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, प्रकाश बरे, जयवंत वाडकर, राधिका हर्षे, कमलेश सावंत आणि अनिरुद्ध हरीप यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. ''नागरीक'' नंतर पुन्हा एकदा सचिन खेडेकर ''शटर''च्या निमित्ताने एका आगळ्या वेगळया भूमिकेत दिसणार आहेत. 

उद्या प्रदर्शित होणाऱ्या सर्वच चित्रपटात आघाडीचे कलावंत आहेत, ''ढोल ताशे'', ''ऑनलाईन बिनलाईन'' आणि ''शटर'' या चित्रपटाचे प्रोमोशनही अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आलेले आहे त्यामुळे मागील दोन आठवड्याप्रमाणेच याही आठवड्यात टिकिट खिडकीवर चुरशीची स्पर्धा बघायला मिळणार आहे.

मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ''ड्रिम मॉल'', ''किल्ला'' आणि ''वेलकम ज़िन्दगी'' या चित्रपटांमध्ये ''किल्ला''ने कमाईच्या बाबतीत बाजी मारली असून या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात तीन कोटींचा गल्ला जमविला आहे. स्वप्निल जोशी यांच्या ''वेलकम ज़िन्दगी''ला पण प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.

पुढच्या आठवड्यात ''मर्डर मेस्ट्री'' हा बहु-प्रतिक्षित हे चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

No comments:

Post a Comment

किरण नाटकी