मराठी चित्रपट सृष्टितील सर्वांची आवडती नायिका अमृता खानविलकर तिच्या जोडीदार हिमांशु मल्होत्रा सह ''नच बलिये''च्या सातव्या पर्वाची विजेती ठरली आहे, त्या करीता तिचे हार्दिक अभिनंदन. या पूर्वी ही सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या मराठमोळ्या जोडीने ''नच बलिये''च्या अगदी पहिल्याच पर्वामध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे मराठी पाऊल पडते पुढे असेच न्हणावे लागेल.
अमृता खानविलकर हिने ''नच बलिये''च्या सातव्या पर्वात भाग घेतला तेव्हाच सर्व प्रेक्षकांना तिच्या विजयाबद्दल खात्री होती कारण मराठी चित्रपट सृष्टित ती तिच्या नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते. अमृताने ''नटरंग'' या चित्रपटामधील ''जाऊ दया ना घरी आता वाजले की बारा'' या लावणीने नवीन ओळख निर्माण केली. २०१२ साली आलेल्या ''आयना का बायना'' या चित्रपटात तिने नृत्य शिक्षकेची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे साकारली होती. ''महाराष्ट्राचे डांसिंग सुपर स्टार - छोटे मास्टर्स'' या शो टीवी शो मध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. अमृताने तिच्या वेबसाइट वर तिचे खास डांस परफार्मंस पण दिले आहेत ते तुम्ही http://www.amrutakhanvilkar.in/my_hits_lavani.php या लिंकवर बघु शकता.
अमृताला तिच्या पुढील कारकिर्दी साठी हार्दिक शुभेच्छा.
अमृताला तिच्या पुढील कारकिर्दी साठी हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment