Tuesday, 28 July 2015

''कैर्री ऑन मराठा'', ''मनातल्या उन्हात'' आणि ''पन्हाळा''

ह्या शुक्रवारी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, ''कैर्री ऑन मराठा'', ''मनातल्या उन्हात'' आणि ''पन्हाळा''.

संजय लोंढे दिग्दर्शित ''कैर्री ऑन मराठा'' हि प्रेम कथा असून या चित्रपटात गश्मीर महाजनी आणि कश्मीरा कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोबतच अरुण नलावडे, अमिन हाजी, करीम हाजी, किशोरी बल्लाळ, उषा नाईक, शांतनु मोघे, देविका दफ्तरदार, ओमकार कुलकर्णी, समीर खाडेकर, अमेय कुम्भार आणि सचिन देशपांडे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. गश्मीर महाजनी जेष्ठ अभिनेते रविन्द्र महाजनी यांचे चिरंजीव असून ते या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहेत. ''कैर्री ऑन मराठा'' च्या कथेला महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमावादाची पार्श्वभूमी असल्यामुळे या चित्रपटात प्रेमकथेसोबतच एक्शनचा तडका बघायला मिळणार आहे. 

''मनातल्या उन्हात'' हा वास्तव घटनेवरील आधारीत चित्रपट असून या चित्रपटात कैलाश वाघमारे, किशोर कदम, मिताली जगताप, हंसराज जगताप, समीर धर्माधिकारी, नागेश भोसले, रुचिता जाधव, छाया कदम, मंथन पाटिल यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक पांडूरंग जाधव आहेत. ''मनातल्या उन्हात'' मधून कैलाश वाघमारे नायक न्हणुन पदार्पण करीत आहेत.

नागेश भोसले दिग्दर्शित ''पन्हाळा'' हा चित्रपट या ह्या शुक्रवारी प्रदर्शित झालाय. ''पन्हाळा''मध्ये नागेश भोसले, संग्राम साळवी, समिधा गुरु, अमृता संत आणि मकरंद देशपांडे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून बदलत्या नाते संबंधावर व काळावर भाष्य करण्यात आले आहे. नागेश भोसले यांनी या पूर्वी ''अडगुल मडगुल'', ''गोष्ट छोटी डोंगराएवढी'' आणि ''गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा'' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

No comments:

Post a Comment

किरण नाटकी