Wednesday, 26 August 2015

सप्टेंबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस

सप्टेंबर महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस 

  • २ सप्टेंबर - मंगेश हाडवळे (दिग्दर्शक)
  • ३ सप्टेंबर - देवेन्द्र लुटे (दिग्दर्शक)  
  • ३ सप्टेंबर - मनोज जोशी (अभिनेता)  
  • ४ सप्टेंबर - मोहन जोशी (अभिनेता) 
  • ४ सप्टेंबर - विजय पटवर्धन (अभिनेता) 
  • ५ सप्टेंबर - श्रीकांत देसाई (अभिनेता) 
  • ५ सप्टेंबर - उज्वला गायकवाड (अभिनेत्री)
  • ६ सप्टेंबर - गौरी इंगावळे (अभिनेत्री) 
  • ७ सप्टेंबर - राधिका आपटे (अभिनेत्री) 
  • ८ सप्टेंबर - मोहन खाम्बेटे (अभिनेता) 
  • ८ सप्टेंबर - मृण्मयी कोळवलकर (अभिनेत्री) 
  • ९ सप्टेंबर - पूनम जाधव (अभिनेत्री) 
  • ९ सप्टेंबर - योगेश जाधव (दिग्दर्शक) 
  • १० सप्टेंबर - अतुल कुलकर्णी (अभिनेता) 
  • ११ सप्टेंबर - अतुल गोगावले (संगीत दिग्दर्शक) 
  • १२ सप्टेंबर - स्मिता ताम्बे (अभिनेत्री)  
  • १३ सप्टेंबर - उषा नाडकर्णी (अभिनेत्री)  
  • १६ सप्टेंबर - अजय पुरकर (अभिनेता) 
  • १७ सप्टेंबर - गिरीश वसईकर (दिग्दर्शक) 
  • १८ सप्टेंबर - प्रिया बापट (अभिनेत्री) 
  • २० सप्टेंबर - दिपक करंजीकर (अभिनेता) 
  • २२ सप्टेंबर - रवी जाधव (दिग्दर्शक)
  • २३ सप्टेंबर - मनमीत पेम (अभिनेता) 
  • २४ सप्टेंबर - किरण रोंगे (अभिनेता) 
  • २५ सप्टेंबर - वैभव तत्ववादी (अभिनेता) 
  • २६ सप्टेंबर - गणेश कदम (दिग्दर्शक)  
  • २६ सप्टेंबर - गिरीश वानखेडे 
  • २६ सप्टेंबर - समीर धर्माधिकारी (अभिनेता) 
  • २७ सप्टेंबर - अमिता खोपकर 
  • २७ सप्टेंबर - सचित पाटिल (अभिनेता व दिग्दर्शक) 
  • २८ सप्टेंबर - महेश कोठारे (अभिनेता व दिग्दर्शक)  
  • ३० सप्टेंबर - मंगेश सातपुते (अभिनेता) 
  • ३० सप्टेंबर - सतीश मनवर (दिग्दर्शक)

Sunday, 23 August 2015

नागराज मंजुळे

मराठी चित्रपट सृष्टितील संवेदनशील दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आज (२४ ऑगस्ट) वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!! ''फँड्री'' या पहिल्याच चित्रपटातून संवेदनशील दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण केली आहे. ''फँड्री''ने अनेक राष्ट्रिय व अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजविले सोबतच अनेक पुरस्कारावर आपले नाव कोरले. नागराज मंजुळे यांनी त्यांच्या दिग्दर्शनाबरोबर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले आहे. ''फँड्री'' या चित्रपटात त्यांनी दिग्दर्शन व अभिनय या दोन्ही बाजू समर्थपणे पेलल्या होत्या. त्यानंतर त्यांनी निखिल महाजन दिग्दर्शित ''बाजी'' मध्ये इंस्पेक्टरची भूमिका साकारली होती. आता ते पुन्हा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ''हायवे'' या चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचा ''सैराट'' हा आगामी चित्रपट पुढील वर्षी जनवरी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

Saturday, 22 August 2015

''गणवेश''च्या निमित्ताने

सध्या अतुल जगदाळे दिग्दर्शित ''गणवेश'' या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध छायाचित्रकार अतुल जगदाळे दिग्दर्शनामध्ये पदार्पण करीत आहेत. वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजूराच्या मुलाला गणवेशासाठी काय संघर्ष करावा लागतो याची कथा ''गणवेश'' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या चित्रपटात किशोर कदम, स्मिता ताम्बे आणि मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मागील काही वर्षात छायाचित्रकार ते दिग्दर्शक असा प्रवास केलेल्या छायाचित्रकारांमध्ये संजय जाधव, महेश लिमये, लक्ष्मण उतेकर, अविनाश अरुण, राहुल जाधव आणि केदार गायकवाड प्रमुख आहेत. 

संजय जाधव तर सातत्याने ''चेकमेट'', ''रींगा रींगा'', ''फक्त लढ म्हणा'', ''दुनियादारी'' आणि ''प्यारवाली लव स्टोरी'' असे यशस्वी चित्रपट देऊन मराठी चित्रपट सृष्टित आघाडीचे दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित झाले आहे. त्यांच्या ''दुनियादारी'' या चित्रपटाने मराठी चित्रपटांमध्ये नविन विक्रम निर्माण केले. त्यांचा आगामी ''तू ही रे'' हा चित्रपट येत्या सप्टेम्बर महिन्यात प्रदर्शित होतोय. या चित्रपटात प्रेक्षकांची आवडती जोडी स्वप्निल जोशी व सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत आहे. 

''उत्तरायण'', ''कॉर्पोरेट'', ''ट्रैफिक सिंगल'', ''फैशन'', ''दबंग'', ''नटरंग'', ''बालगंधर्व'', ''बालक पालक'' आणि ''हिरोइन'' अश्या गाजलेल्या हिंदी व मराठी चित्रपटाचे छायाचित्रकार महेश लिमये यांनी मागील वर्षी अप्रैल २०१४ मध्ये ''येलो'' हा अतिशय वेगळा विषय असलेला चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षक दोघांची कौतुकाची पावती मिळाली. गौरी गाडगीळ, मृणाल कुलकर्णी, उपेन्द्र लिमये आणि ऋषिकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष जूरी पुरस्कार मिळाला होता. तर चित्रपटाची नायिका गौरी गाडगीळ व संजना रॉय यांना विशेष उल्लेख पुरस्कार मिळाला होता. 

''ब्लू'', ''इंग्लिश विंग्लिश'', ''बॉस'', ''लेकर हम दिवाना दिल'' आणि ''तेवर'' या हिंदी चित्रपटांचे छायाचित्रकार लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला त्यांचा पहिला मराठी चित्रपट ''टपाल'' मागील वर्षी सप्टेम्बर २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. नंदू माधव व वीणा जामकर अभिनीत ''टपाल'' नंतर आता ''लालबागची राणी'' हा त्यांचा नवीन मराठी चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटिला येत आहेत. 

युवा छायाचित्रकार अविनाश अरुण यांनी दिग्दर्शित केलेल्या ''किल्ला'' या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये ''सर्वोकृष्ट मराठी चित्रपट'' म्हणून गौरवण्यात आले. हा चित्रपट या वर्षी जून महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी कोकणात घडणारी कथा अतिशय सुंदरपणे साकारली होती.
लहान मुलांच्या तरल भावविश्वाचे दर्शन करवणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात तीन कोटींची कमाई करून आशयघन चित्रपट चांगली कमाई करू शकत नाही हा समज खोटा ठरविला.  

छायाचित्रकार राहुल जाधव यांचा ''मर्डर मेस्ट्री'' हा चित्रपट या वर्षी जुलाई महिन्यात प्रदर्शित झाला. ''विजय असो'' आणि ''हैलो नंदन'' नंतर हा त्यांचा तीसरा चित्रपट होता. हिंदीतील प्रसिद्द निर्माता नाडीयाडवाला
यांची निर्मिती असलेल्या ''मर्डर मेस्ट्री'' ने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. 

जुलाई महिन्यातच प्रदर्शित झालेल्या ''ऑनलाईन बिनलाईन'' च्या निमित्ताने केदार गायकवाड यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. सिद्धार्थ चांदेकर व हेमंत ढोमे अभिनीत या चित्रपटातून आजच्या युवा पिढीची सोशल मीडिया विषयी असलेली क्रेज असा विषय मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांनी गौरवले पण मराठी चित्रपटाच्या भाऊगर्दी मुळे या चित्रपटाला नुकसान सोसावे लागले. 

२०१४ व २०१५ या वर्षात छायाचित्रकारांनी दिग्दर्शनात पदार्पण करून नवनवीन विषय संवेदनशीलपणे हाताळले. त्यांच्या चित्रपटांना अनेक पुरस्कार मिळाली, प्रेक्षकांचे व समीक्षकांचे कौतुक मिळाले. अशाच प्रकारे येणाऱ्या काळात ही आपल्याला त्यांच्या कडून नवनवीन प्रयोग बघायला मिळतील अशी अपेक्षा करुया. छायाचित्रकारांनी दिग्दर्शित केलेले सर्वच चित्रपट यशस्वी झाले असे नाही मात्र ते चित्रपट देखणे होते हे मात्र नक्की !!!!

''भय''च्या निमित्ताने

आगामी ''भय'' या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांची महत्वाची भूमिका आहे. याच वर्षी जून महिन्यात प्रदर्शित झालेल्या ''टाइम बरा वाईट'' या चित्रपटात ही त्यांनी भैया राजा नावाच्या डॉनची दमदार भूमिका साकारली होती. त्यांच्या या चित्रपटातील अभिनयाचे समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी कौतुक करून त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे त्यांच्या ''भय'' मधील भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे, ''भय''च्या निमित्ताने पुन्हा एकदा दिग्दर्शकांच्या अभिनयाची जादू बघायला मिळणार आहे. दिग्दर्शक हा अभिनेत्यांकडून अभिनय करून घेतो पण जेव्हा दिग्दर्शक मोठ्या पद्यावर अभिनय करतात जेव्हा त्यांचा अभिनय बघण्यात वेगळीच मजा असते. या लेखात आपण सध्या अभिनय करणाऱ्या काही दिग्दर्शकांचा आढावा घेणार आहोत. सतीश राजवाडे यांनी ''प्रेमाची गोष्ट'' या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात स्वराज ही नायकाच्या मित्राची भूमिका केली होती, ही भूमिका अतिशय ग्रेसफुल होती व ती तितक्याच चांगल्या प्रकारे त्यांनी साकारली होती. त्यांच्या करियरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ''वास्तव'' आणि ''हजार चौरासी की माँ'' या हिंदी चित्रपटात सुद्धा भूमिका केल्या होत्या.    

''फँड्री'' या पहिल्याच चित्रपटातून संवेदनशील दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण करणारे नागराज मंजुळे यांनी सुद्धा त्यांच्या दिग्दर्शनाबरोबर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले आहे. ''फँड्री'' या चित्रपटात त्यांनी दिग्दर्शन व अभिनय या दोन्ही बाजू समर्थपणे पेलल्या होत्या. त्यानंतर त्यांनी निखिल महाजन दिग्दर्शित ''बाजी'' मध्ये इंस्पेक्टरची भूमिका साकारली होती. आता ते पुन्हा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ''हायवे'' या चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

''गोजिरी'', ''ती रात्र'', ''शर्यत'', ''खेळ मांडला'' आणि ''बायस्कोप (एक होता काऊ)'' सारखे देखणे चित्रपट दिग्दर्शित करणारे विजु खोटे सुद्धा ''रेगे'' आणि ''टाइम पास २'' या चित्रपटांमधून अभिनय करताना दिसले होते. रवी जाधव सुद्धा निखिल महाजन यांच्या ''बाजी'' या चित्रपटात झळकले होते.  

''३.५६ किल्लारी'', ''ढिंच्यॅक एंटरप्राइज'', ''न्यायम'', ''संगती'' आणि ''स्लॅमबूक''

ह्या शुक्रवारी तब्बल पांच मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, ''३.५६ किल्लारी'', ''ढिंच्यॅक एंटरप्राइज'', ''न्यायम'' , ''संगती'' आणि ''स्लॅमबूक''. 

दिपक भागवत आणि विजय मिश्रा दिग्दर्शित ''३.५६ किल्लारी'' हा सस्पेंस ड्रामा असून तो किल्लारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आधारीत आहे. या चित्रपटात जैकी श्रॉफ, सई ताम्हणकर, गौरी इंगवले, अनुराग शर्मा, पंकज विष्णु, श्रीकांत मोघे आणि रमा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुढील आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या ''शेगावीचा योगी गजानन'' मध्ये पण  जैकी श्रॉफ यांची महत्वाची भूमिका आहे तर सई ताम्हणकर यांचा आगामी चित्रपट ''तू ही रे'' प्रदर्शनास सज्ज आहे.  

निशांत सपकाळे दिग्दर्शित ''ढिंच्यॅक एंटरप्राइज'' मधून भूषण प्रधान व मनवा नाईक ही युवा जोडी पहिल्यांदाच मोठ्या पद्यावर येत आहे. सध्या भूषण प्रधान हा नव्या पिढीतील अभिनेत्यांपैकी एक आश्वासक चेहरा आहे, त्याने २०१५ मध्ये ''कॉफी आणि बरेच काही'', ''टाइम पास २'', ''टाइम बरा वाईट'' च्या निमित्ताने आपली दर्जेदार उपस्थिति दाखवून दिली आहे. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''जीत'' आणि ''शिव्या'' या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटामध्ये एका युवा उद्योजकाची व त्यांच्या जीवनातील चढउताराची गोष्ट साकारण्यात आली. 

ऋतुराज ढोलगड़े दिग्दर्शित ''स्लॅमबूक'' मध्ये तरुण वयातील मोरपंखी प्रेमकथा साकारण्यात आली आहे. या चित्रपटात शांतनु रंगनेकर, ऋतिका  श्रोत्री, दिलीप प्रभावळकर, उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, माधवी सोमण, कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण, सुप्रिया पठारे, योगेश शिरसाठ आणि श्रुति मराठे यांच्या भूमिका आहेत.  

सुनील अग्रेसर दिग्दर्शित ''न्यायम'' व रामविजय परब दिग्दर्शित ''संगती'' हे मराठी चित्रपट सुद्धा या आठवड्यात प्रदर्शित झाले आहेत. 

मराठी चित्रपटांची भाऊ गर्दी अशीच सुरु राहणार असून, पुढील आठवड्यात ''ढोलकी'', ''हायवे'' आणि ''शेगावीचा योगी गजानन'' हे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.  

Friday, 21 August 2015

Marathi Movies Released in 2014

Marathi Movies Released in 2014



Release Date
Name of Movie
Director
Cast
03/01/2014
Timepass
Ravi Jadhav
Prathamesh Parab, Ketaki Mategaonkar,Vaibhav Mangle, Bhalchandra Kadam,Meghana Erande, Urmila Kanitkar
07/01/2014
Sangharsh
Saisparsh
Rajesh Shringarpure, Sangeeta Kapure, Prajakta Mali, Nakul Ghanekar, Anshuman Vichare
10/01/2014
1909
Abhay Kambli
Akshay Shimpi, Rohan Pednekar,Shrikant Bhide
31/01/2014
Pune Via Bihar
Sachin Goswami
Bharat Jadhav, Umesh Kamat,Mrunmayee Deshpande
14/02/2014
Fandry
Nagraj Manjule
Kishore Kadam, Chhaya Kadam, Somnath Avghade, Nagraj Manjule
14/02/2014
Khairlanjichya Mathyawar
Raju Meshram
Kishori Shahane, Vilas Ujawane
14/02/2014
Priyatama
Satish Motling
Siddarth Jadhav, Girija Joshi, Sanjay Khapre, Charusheela Vacchani, Praful Samant, Sagar Satpute
21/02/2014
Sau Shashi Deodhar
Amol Shetge
Sai Tamhankar, Ajinkya Deo, Tushar Dalvi
28/02/2014
Akalpith
Prasad Acharekar
Mohan Agashe, Nirmiti Sawant, Renuka Shahane
07/03/2014
Dhag
Shivaji Lotan Patil
Upendra Limaye, Usha Jadhav, Nagesh Bhosale
14/03/2014
Hello Nandan
Rahul Jadhav
Adinath Kothare, Mrunal Thakur
21/03/2014
Waakya
Deepak Kadam
Priyanka Dnyanlaxmi, Abhijeet kulkarni, Prema kiran, Raj dutta, Kishori Shahane, Ganesh yadav, nisha kathote
28/03/2014
Taptapadi
Sachin Nagargoje
Veena Jamkar, Kashyap Parulekar, Sruti Marathe, Neena Kulkarni, Sharad Ponkshe, Ashwini Ekbote, Ambarish Deshpande
04/04/2014
Yellow
Mahesh Limaye
Mrinal Kulkarni, Upendra Limaye, Rishikesh Joshi, Manoj Joshi, Aishwarya Narkar
18/04/2014
Surajya
Santosh Manjrekar
Vaibbhav Tatwawdi,Mrunal Thakur,Sharad Ponkshe
02/05/2014
Dusari Goshta
Chandrakant Kulkarni
Siddharth Chandekar,Neha Pendse, Vikram Gokhale
09/05/2014
Ajoba
Sujay Dahake
Urmila Matondkar,Rishikesh Joshi,Dilip Prabhavalkar,Neha Mahajan
09/05/2014
Bhakarkhadi 7 km
Umesh Namjoshi
Aniket Vishwasrao,Veena Jamakar,Apurva Nemalekar
09/05/2014
Ek Hazarachi Note
Shrihari Sathe
Usha Naik, Sandeep Pathak, Ganesh Yadav, Shrikant Yadav, Pooja Nayak
23/05/2014
Aandhali Koshimbir
Aditya Ingale
Ashok Saraf, Vandana Gupte,Aniket Vishwasrao
20/06/2014
Daptar - The School Bag
Pundalik Dhumal
Tom Alter, Yash Shah, Tanvi Kamat, Abhay Kamat
11/07/2014
Lai Bhaari
Nishikant Kamat
Ritesh Deshmukh, Radhika Apte, Aditi Pohankar
25/07/2014
Anvat
Gajendra Ahire
Adinath Kothare, Urmila Kanetkar, Makarand Anaspure
01/08/2014
Astu
Sumitra Bhave
Mohan Agashe, Milind Soman, Amruta Subhash
01/08/2014
Poshter Boyz
Sameer Patil
Aniket Vishwasrao, Dilip Prabhavalkar, Hrishikesh Joshi
08/08/2014
Rama-Madhav
Mrinal Kulkarni
Ravindra Mankani, Mrinal Kulkarni
15/08/2014
Rege
Abhijeet Panase
Mahesh Manjarekar, Pushkar Shrotri, Santosh Juvekar
15/08/2014
Vaadhdivsachya Haardik Shubhechcha
Deepak Naidu
Ankush Choudhary,Madhu Sharma,Pushkar Shrotri
26/09/2014
Baavare Prem He
Ajay Kishor Naik
Siddharth Chandekar, Urmila Kanitkar
26/09/2014
Tapaal
Laxman Utekar
Nandu Madhav,Veena Jamkar,Urmila Kanitkar
02/10/2014
Sanngto Aika
Satish Rajwade
Sachin Pilgaonkar, Vaibhav Mangle, Milind Shinde
10/10/2014
Dr. Prakash baba Amte
Samruddhi Porey
Nana Patekar, Sonali Kulkarni
10/10/2014
Ishq Wala Love
Renu Desai
Adinath kothare, Sulagna Panigrahi
10/10/2014
Punha Gondhal Punha Mujra
Balkrushna Shinde
Makarand Anaspure, Sayaji Shinde
24/10/2014
Pyaar Vali Love Story
Sanjay Jadhav
Swapnil Joshi, Sai Tamhankar, Urmila Kanitkar,Sameer Dharmadhikari, Upendra Limaye
14/11/2014
Dhyaas 3D
Mandar Shinde
Suhas Palshikar
14/11/2014
Elizabeth Ekadashi
Paresh Mokashi
Shrirang Mahajan,Sayali Bhandarkar,Pushkar Lonarkar,Nandita Dhuri
21/11/2014
Mamachya Gavala Jaaoo Yaa
Sameer Joshi
Abhijeet Khandkekar,Mrunmayee Deshpande
21/11/2014
Vitti Dandu
Ganesh Kadam
Dilip Prabhavalkar,Ashok Samarth,Mrunal Thakur,Ravindra Mankani
28/11/2014
Happy Journey
Sachin Kundalkar
Atul Kulkarni,Priya Bapat,Pallavi Subhash, Siddharth Menon
28/11/2014
Swami Public Ltd.
Gajendra Ahire
Subodh Bhave,Vikram Gokhale,Chinmay Mandalekar,Vinay Apte,Saunskruti Kher
05/12/2014
Candle March
Sachin Dev
Manva Naik, Tejaswini Pandit, Smita Tambe
05/12/2014
Wanted Bayko Number One
Raju Pareskar
Makarand Anaspure, Sayaji Shinde, Tejaswini Lonari, Smita Gondkar,Sanjay Khapre
12/12/2014
Madhyamvarg
Hari Fernandes
Siddharth Jadhav,Ravi Kishan,Kashmira Kulkarni
12/12/2014
Miss Match
Girish Vasaikar
Bhushan Pradhan, Mrinmai Kolwalkar,Uday Tikekar
12/12/2014
Premasathi Coming Suun
Ankur Kakatkar
Adinath Kothare,Jitendra Joshi,Neha Pendse,Resham Tipnis,Vijay Patkar,Suhas Joshi,Anchal Poddar
26/12/2014
Avatarachi Goshta
Nitin Dixit
Ashish Vidyarthi, Adinath Kothare, Leena Bhagwat, Mihiresh Joshi
26/12/2014
IPL The Film
Deepak Kadam
Swapnil Joshi, Santosh Mayekar, Shital K Upare, Kshitija Ghosalkar, Vijay Patkar


किरण नाटकी