आज (२ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते किशोर प्रधान यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरचा. नागपूरलाच त्यांनी एम ए चे शिक्षण पूर्ण केले. नंतर अभिनयाच्या ओढीमुळे त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. किशोर प्रधान यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांनी मराठी , हिंदी आणि इंग्लिश या तीन ही भाषेत नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. आज वयाच्या ७९ व्या वर्षी ही तरुणांना लाजवेल अश्या उत्साहाने ते कार्यरत आहेत. त्यांनी भूमिका केलेल्या चित्रपटांमध्ये "उचला रे उचला", "कशाला उद्याची बात", "खिचडी़", "गॉड ओन्ली नोज", "छोडो कल की बातें", "जब वी मेट", "डॉक्टर डॉक्टर", "त्याचा बाप तिचा बाप", "नवरा अवली बायको लव्हली", "नवरा माझा ब्रम्हचारी", "नाना मामा", "बाप तिचा बाप", "भिंगरी", "मस्ती एक्सप्रेस", "मास्तर एके मास्तर", "मीराबाई नॉट आउट", "मी शिवाजी राजे भोसले बोलतोय", "रफ़्तार", "रानपाखरा", "रूल्स प्यार का सुपरहिट फ़ॉर्म्यूला", "लगे रहो मुन्नाभाई", "लाडीगोडी", "लालबाग परळ", "वन रूम किचन", "वरचा मजला रिकामा त्याचा", "शहाणपण देगा देवा", "शिक्षणाच्या आईचा घो", "शेजारी शेजारी" आणि "सिटी ऑफ गोल्ड" हे चित्रपट प्रमुख आहेत.
No comments:
Post a Comment