आज (३ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
सोनाली कुलकर्णी यांना आपण संवेदनशील अभिनेत्री सोबतच एक संवेदनशील लेखिका म्हणून ही ओळखतो. त्यांनी अनेक वर्षे लोकसत्ताच्या "विवा" या पुरवणीचे संपादन केले, त्यात त्यांनी लिहिलेल्या "सो कूल" या स्तंभावर आधारीत त्यांच नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. व्यावसायिक आणि कलात्मक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट करतांना त्यात योग्य संतुलन त्यांनी साधले आहे. त्यांनी चित्रपट सृष्टितील आपली कारकीर्द गिरीश कर्नाड दिग्दर्शित "चेलुवी" या चित्रपटातून सुरु केली. त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून महत्वाच्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. या चित्रपटांमध्ये "अग्निवर्षा", "कितने दूर कितने पास", "कैरी", "घराबाहेर", "जहा तुम ले चलो", "जुनून", "टॅक्सी नंबर ९२११", "डरना जरूरी है", "डॉ. प्रकाश बाबा आमटे", "डॉ. बाबासाहेब आंबेडकर", "दायरा", "दिल चाहता है", "दिल विल प्यार व्यार", "देवराई", "दोघी", "प्यार तूने क्या किया", "ब्राईड अँड प्रेज्युडिस", "मिशन कश्मिर", "मुक्ता", "सखी", "सिंघम" प्रमुख आहे. या वर्षी त्यांची प्रमुख भूमिका असणारा "अग बाई अरेच्या" हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांना "फूॅक सु डी मी" या इटालियन चित्रपटासाठी मिलान अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सावात सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी "खतरों के खिलाड़ी " व "झलक दिखला जा" या रियलिटी शो मध्ये भाग घेऊन आपल्या एक्शन आणि नृत्य कौशल्यासाठी कौतुक मिळवले. त्यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.sonalikulkarni.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
No comments:
Post a Comment