Friday 20 November 2015

अविनाश अरुण

आज (२० नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अविनाश अरुण यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! युवा छायाचित्रकार अविनाश अरुण यांनी दिग्दर्शित केलेल्या ''किल्ला'' या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये ''सर्वोकृष्ट मराठी चित्रपट'' म्हणून गौरवण्यात आले. हा चित्रपट मागील वर्षी जून महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी कोकणात घडणारी कथा अतिशय सुंदरपणे साकारली होती. लहान मुलांच्या तरल भावविश्वाचे दर्शन करवणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात तीन कोटींची कमाई करून आशयघन चित्रपट चांगली कमाई करू शकत नाही हा समज खोटा ठरविला.

No comments:

Post a Comment

किरण नाटकी