आज (२८ सप्टेम्बर) भारतरत्न लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
मागील सात दशकांपासून लताजी भारतीय संगीताच्या क्षेत्रात आपल्या सुमधुर आवाजाने अधिराज्य गाजवत आहेत. त्यांना २००१ साली त्यांच्या भारतीय संगीत सृष्टीतील योगदानासाठी "भारतरत्न" या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले आहे. त्यांना ''लता दीदी" या नावाने ओळखले जाते. लता दीदीने आपल्या बालपणी संगीत नाटकात बाल कलाकार म्हणून कामाला सुरवात केली. मास्टर विनायक यांनी त्यांना आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली व त्यातील गाणी खुप गाजली. त्यानंतर हिंदी चित्रपटांमध्ये त्या काळच्या सर्वच दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले.
No comments:
Post a Comment