आज (१० सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अतुल
कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! नेशनल स्कूल ऑफ़ ड्रामा मधून त्यांनी आपले शिक्षण केले आहे.
त्यांनी "कैरी", "ध्यासपर्व", "१०वी
फ", "वास्तुपुरुष", "देवराई", "चकवा", "मातीमाय",
"वळू", "नटरंग", "प्रेमाची गोष्ट" आणि "हॅपी
जर्नी" अशा चित्रपटात अभिनय करून आपली संवेदनशील अभिनेता अशी ओळख पक्की केली आहे.
त्यांनी हिंदीमध्ये "हे
राम", "चांदनी
बार", "दम", "सत्ता", "खाकी", "पेज ३", "रंग दे बसंती" अश्या मोजक्या
पण आशयघन चित्रपटात काम करून हिंदी चित्रपट सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली
आहे. त्यापैकी "हे राम" आणि "चांदनी बार" चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार
प्राप्त झाला आहे.
संवेदनशील अभिनयासोबतच संवेदनशील माणूस म्हणून ही त्यांनी आपली ओळख बनवली आहे. वेळोवेळी ते वर्तमानपत्रात अभ्यासपूर्ण लेख लिहून सामाजिक व राजकीय विषयावर आपली मते मांडत असतात. ''क्वेस्ट'' नावाच्या सामाजिक संस्थेद्वारे ते शिक्षणाच्या क्षेत्रात काम करीत आहेत. या संस्थेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही www.quest.org.in वेबसाईटला भेट देऊ शकता. अतुल कुलकर्णी यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.atulkulkarni.com ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता.

No comments:
Post a Comment