आज (३० सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सतीश मनवर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
मराठी चित्रपट सृष्टीतील संवेदनशील दिग्दर्शक सतीश मनवर यांनी त्यांची सामाजिक विषयाची जाण त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. २००९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट "गाभ्रीचा पाऊस" प्रदर्शित झाला. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यावर आधारित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि ज्योती सुभाष असे कलावंत होते. या चित्रपटाला अंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले. आज सामाजिक विषयावर आधारित चांगल्या मराठी चित्रपटांमध्ये "गाभ्रीचा पाऊस"चे नाव आवर्जून घेतल्या जाते.
त्यांचा दूसरा चित्रपट उपेन्द्र लिमये व विभावरी देशपांडे अभिनीत ''तुह्या धर्म कोंणचा" हा होता. हा चित्रपट आदिवासी समाजात असलेल्या धर्मांतराच्या समस्येवर आधारित होता. या चित्रपटाला २०१४ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये "सामाजिक विषयावरचा सर्वोकृष्ट चित्रपटा"चा पुरस्कार मिळाला आहे.
No comments:
Post a Comment