Friday 11 September 2015

अतुल गोगावले

आज (११ सप्टेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक अतुल गोगावले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!  हिंदी आणि मराठीमधील आघाडीचे संगीत दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जातात. ''अजय अतुल'' या संगीतकार जोडीतील अतुल गोगावले हे थोरले  बंधू. २००९ साली आलेल्या ''जोगवा'' चित्रपटासाठी सर्वोकृष्ट संगीत दिग्दर्शकांचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर २०१० आलेल्या ''नटरंग'' या चित्रपटाने त्यांची गाणी अवघ्या मराठी जनाच्या ओठावर रुळली. रवी जाधव दिग्दर्शित ''नटरंग'' चित्रपटाच्या यशामागे ''अजय-अतुल'' या जोडीच्या संगीताचा महत्वाचा वाटा होता. या चित्रपटातील सर्वच गाणी खुप गाजली. मागील वर्षी आलेल्या ''लय भारी'' या चित्रपटातील ''माऊली माऊली'' या गाण्याने लोकप्रियतेचा नवीन विक्रम निर्माण केला. 

“अगं बाई अरेच्च्या!”, “गोड गुपित”, “जत्रा”, “सावरखेड एक गाव”, “जबरदस्त”, “बंध प्रेमाचे”, “साडे माडे तीन”, “चेकमेट”, “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं”, “मुंबई आमचीच”, “उलाढाल”, “एक डाव धोबीपछाड”, “बेधुंद”, “ऑक्सिजन”, “रिंगा रिंगा”, “भारतीय” आणि “टपाल” या मराठी चित्रपटांना ही त्यांनी संगीत दिले आहे. हरिहरन, कृणाल गांजावाला, सोनू निगम आणि श्रेया घोषाल अशा हिंदीतील दिग्गजांकडून त्यांनी मराठी गाणी गाऊन घेतली आहे. ''सिंघम'' आणि ''अग्निपथ'' या त्यांच्या हिंदी चित्रपटातील गाणी हि खुप लोकप्रिय झाली. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.ajayatul.com या त्यांच्या ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता. या वेबसाईटचे अनावरण माननीय अभिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले होते.

No comments:

Post a Comment

किरण नाटकी