आज (२५ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील युवा अभिनेते वैभव
तत्ववादी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
सध्या सातत्याने मराठी चित्रपटात दिसून येणाऱ्या चेहऱ्यापैकी वैभव तत्ववादी
हे आहेत. वैभव तत्ववादी हे मूळचे नागपूरचे पण पुण्यात इंजीनियरिंग चे
शिक्षण घेत असताना अनेक एकांकिका स्पर्धा त्यांनी गाजवल्या. या
स्पर्धांतूनच त्यांचा अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाची
सुरुवात ''फक्त लढ म्हणा'' आणि ''सुराज्य'' या चित्रपटांमधून झाली. २०१५
हे वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत लकी ठरले आहे. या वर्षी अप्रैल महिन्यात
आलेला त्यांचा चित्रपट ''कॉफी आणि बरेच काही'' यशस्वी ठरला. या चित्रपटात
त्यांची प्रार्थना बेहरे यांच्याबरोबर जोडी पसंत केल्या गेली सोबतच
त्यांच्या अभिनयाचे कौतुक केल्या गेले. हिच जोडी पुन्हा "मि. एंड मिस
सदाचारी" या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या वर्षी आलेला
त्यांचा दूसरा मराठी चित्रपट ''शॉर्टकट'' हा हैकिंग या आगळ्या वेगळया विषयावर आधारीत होता.
याच वर्षी त्यांनी हिंदी चित्रपटात पदार्पण केले असून त्यांचा ''हंटर'' पहिला हिंदी चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित झाला असून या चित्रपटात त्यांचा परफार्मंसची नोंद फिल्मफेयर मासिकाने सुद्धा घेतली आहे. त्यांचा आगामी हिंदी चित्रपट संजय लीला भंसाली दिग्दर्शित ''बाजीराव मस्तानी'' असून हा चित्रपट डिसेम्बर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ते चिमाजी अप्पाच्या महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. वैभव तत्ववादी यांच्या येणाऱ्या चित्रपटांमधे ''चीटर'' या चित्रपटाचा समावेश आहे. अश्यप्रकारे वैभव तत्ववादी यांची सुरुवात खुप आश्वासक आहे.

No comments:
Post a Comment