Friday 18 September 2015

प्रिया बापट

आज (१८ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री प्रिया बापट यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! २००० साली प्रदर्शित झालेल्या ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर'' या चित्रपटातुन त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली. त्यानंतर ''मुन्नाभाई MBBS'' आणि ''लगे रहो मुन्नाभाई'' या हिंदी चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या पण त्या छोट्या भूमिकेतही त्यांनी आपली चमक दाखवली. ''मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'' या प्रचंड गाजलेल्या चित्रपटात त्यांनी सचिन खेडेकर यांच्या मुलीची भूमिका केली होती. २०१३ साली आलेला महेश मांजरेकर दिग्दर्शित ''काकस्पर्श'' हा चित्रपट त्यांच्या करियरला कलाटणी देणारा ठरला. त्यात प्रिया बापट यांनी बालविधवेची भूमिका केली होती. त्यानंतर ''टाईम प्लीज'', "आंधळी कोथिम्बीर'', "हैप्पी जर्नी ", "लोकमान्य एक युग पुरुष" आणि " टाईम पास २" असे यशस्वी चित्रपट त्यांनी दिले आहे. या सर्वच चित्रपटात त्यांच्या अभिनयाचे व लूकचे कौतुक झाले. 

आज घडीला १९ लाखापेक्षा जास्त लोक त्यांच्या फेसबुक पेजला लाइक करतात, यावरून त्यांचे किती फैंस आहेत याचा सहज अंदाज येऊ शकतो. ''नवा गडी नव राज्य" हे त्यांच अत्यंत गाजलेल नाटक, या नाटकावर ''टाईम प्लीज'' या चित्रपटाची निर्मिती झाली त्यातही त्यांची प्रमुख भूमिका होती. याच नाटकातील त्यांचे सह कलाकार व चित्रपट अभिनेता उमेश कामत यांच्या सोबत त्या विवाहबद्ध झाल्या आहेत. उमेश कामत व प्रिया बापट हि मराठी चित्रपट सृष्टि मधील सर्वात क्यूट जोडी आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या www.priyabapat.in या ऑफिसियल वेबसाईटला भेट देऊ शकता. 

No comments:

Post a Comment

किरण नाटकी