काल ''चला हवा येऊ दया'' या शो चे ७४ भाग पूर्ण झाले, आता ७५ व्या भागात काय धमाल होईल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या शो मध्ये मागील ७४ भागात मराठीतील जवळपास सर्वच दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. ''लई भारी'' चित्रपटाच्या निमित्ताने या ''चला हवा येऊ दया''ची सुरूवात करण्यात आली होती. ५० व्या भागात ''बाजी''च्या निमित्ताने श्रेयस तळपदे यांनी या शो मध्ये हजेरी लावली होती.
एका पेक्षा एक दर्जेदार कलावंतांची फौज व उत्फुर्त विनोद हि ह्या शो ची खास वैशिष्ट्ये आहे. निलेश साबळे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, विनीत बोंडे, श्रेया बुगडे, मानसी नाईक हे सर्व कलाकार प्रत्येक भागात प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतात. सेलिब्रिटी बदलत जातात पण हे सर्व कलाकार अगदी प्रत्येक भागात धमाल करतात. कित्येकदा तर सेलिब्रिटी पेक्षा हेच कलाकार जास्त भाव जाऊन जातात, किंबहुना हे सर्वच कलाकार आता सेलिब्रिटी झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही. भारत गणेशपुरे यांनी रंगवलेला सरपंच, भाऊ कदम रंगवत असलेले डैडी, कुशल बद्रिके यांचा डायरेक्टर व सरपंचाचा मुलगा, सागर करंडे यांनी रंगवलेली स्त्री पात्रे, विनीत बोंडे यांचे छोटा मुलगा, श्रेया बुगडे यांनी रंगवलेले मिसेस बडबडे हे सर्व पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. तुषार देवल यांच्या उल्लेखाशिवाय हा लेख अपुरा आहे. त्यांचा ''जेम्स बैंड'' तर या शो ची जान आहे. शो च्या सुरवातीला प्रियदर्शन जाधव पण ''चला हवा येऊ दया'' मध्ये भुमिका करायचे पण त्यांना हा शो मध्येच सोडावा लागला. या शो मध्ये येणारे सेलेब्रिटी ही ''चला हवा येऊ दया'' चे नियमित प्रेक्षक व चाहते असल्याचे मान्य करतात.
''चला हवा येऊ दया''च्या निमित्ताने मराठी चित्रपट व नाटकांच्या प्रसिद्धीसाठी महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मराठी चित्रपटांची हवा करण्यात ''चला हवा येऊ दया'' महत्वाची भूमिका बजावत आहे. ''चला हवा येऊ दया'' चे सर्वच एपिसोड हिट आहेत पण ''डॉ प्रकाश बाबा आमटे''च्या निमित्ताने करण्यात आलेला नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी यांच्या सोबतचा एपिसोड, टिम दुनियादारी, टिम हंटर सोबतचा एपिसोड माझे पर्सनल फेवरेट आहेत. ''चला हवा येऊ दया'' हा शो ''कॉमेडी नाइट्स विथ कपिल'' वर बेतलेला असल्याची या शो च्या चर्चा सुरवातीला होती. पण आपली ओळख निर्माण करण्यात हा शो पूर्णपणे यशस्वी झाला आहे.

टेलीविज़न सोबतच यूटुबवर सुद्धा या शो चे तितकेच दर्शक आहेत, हे येथे विषेश नमूद करायला हवे.
No comments:
Post a Comment