आज ''कोर्ट'',''ते दोन दिवस'' आणि ''व्हाट अबाउट सावरकर'' हे तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत. या पैकी दोन चित्रपटाचे नागपूर कनेक्शन आहे.
आज ''कोर्ट'' हा या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ सन्मान मिळालेला चित्रपट प्रदर्शित झाला. युवा दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे यांच्या ''कोर्ट'' या पहिल्याच चित्रपटाने त्यांना अंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळून दिली आहे. या चित्रपटाची कथा भारतीय न्याय व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर नारायण कांबळे या लोक शाहीराची गोष्ट सांगते. या चित्रपटात वीरा साथीदार ''नारायण कांबळे'' यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. वीरा साथीदार मूळचे नागपूरचे असून ते लेखक, कवी व पत्रकार सुद्धा आहेत. या चित्रपटात चित्रपटाचे निर्माते विवेक गोम्बर ही एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अंतरराष्ट्रीय पातळीवर समीक्षकांनी गौरवलेला आणि अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय मिळालेला पुरस्कार मिळालेला ''कोर्ट'' आता प्रेक्षकांच्या कोर्टात दाखल झालाय.
आज प्रदर्शित झालेला ''व्हाट अबाउट सावरकर'' हा वि दा सावरकर यांच्या विचाराने प्रेरीत एका युवकाची व त्याने केलेल्या संघर्षाची गोष्ट आहे. रुपेश कटरे व नितीन गावडे दिग्दर्शित या चित्रपटात शरद पोंक्षे, अविनाश नारकर, अतुल तोडंनकर, श्रीकांत भिडे व सारा श्रवण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून वि दा सावरकर यांच्या विचाराची तरुण पिढीला ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment