मराठी चित्रपट सृष्टितील बोल्ड एंड ब्यूटिफुल अभिनेत्री न्हणजे सई ताम्हणकर, अतिशय कमी वेळात अभिनयाच्या बळावर त्यांनी मराठी चित्रपट सृष्टित आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपट सृष्टि सोबतच या वर्षी त्यांनी ''हंटर'' या हिंदी चित्रपटांमधून महत्त्वाची भूमिका साकारून हिंदी चित्रपट सृष्टित ही यशस्वी पदार्पण केले आहे, या आधी अगदी कारीयरच्या सुरवातीला त्यांनी ''ब्लैक एंड व्हाइट'' आणि ''गजनी'' या दोन मोठ्या हिंदी चित्रपटातून भूमिका केल्या होत्या. स्वप्निल जोशी यांच्याबरोबर सईची जोडी विशेष गाजली, ''दुनियादारी'', ''मंगलाष्टक वन्स मोर'', ''प्यार वाली लव स्टोरी'' या चित्रपटांमधून हि जोडी प्रेक्षकांसमोर आली आहे. ''तू हि रे'' हा या जोडीचा आगामी चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होतोय. संजय जाधव, स्वप्निल जोशी व सई ताम्हणकर हे त्रिकुट आज मराठी चित्रपट सृष्टित यशाचे सूत्र मानले जाते. आज सई ताम्हणकर यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा.
सई ताम्हणकर यांनी अभिनय केलेले चित्रपट
सई ताम्हणकर यांनी अभिनय केलेल्या टिवी मालिका
सई ताम्हणकर यांनी अभिनय केलेले चित्रपट
- ब्लैक एण्ड व्हाइट (२००८)
- सनई चौघडे (२००८)
- पिकनिक (२००८)
- गजनी (२००८)
- हाय काय .... नाय काय …. (२००९)
- बे दुने साढे चार (२००९)
- सुम्भरान (२००९)
- अजब लग्नाची गजब गोष्ट (२०१०)
- मिशन पॉसिबल (२०१०)
- रीटा (२०१०)
- लालबाग परळ (२०१०)
- झकास (२०११)
- राडा रॉक्स (२०११)
- दोन घडीचा डाव (२०११)
- पुणे ५२ (२०१२)
- अशाच एका बेटावर (२०१२)
- गाजराची पुंगी (२०१२)
- विला (२०१२)
- नो एन्ट्री पुढे धोका आहे (२०१२)
- अघोर (२०१२)
- बाबुरावला पकडा (२०१२)
- धागेदोरे (२०१२)
- बालक पालक (२०१३)
- झपाटलेला २ (२०१३)
- दुनियादारी (२०१३)
- टाइम प्लीज (२०१३)
- अनुमति (२०१३)
- मंगलाष्टक वन्स मोर (२०१३)
- तेंदुलकर आउट (२०१३)
- गुरु पौर्णिमा (२०१४)
- पोर बाजार (२०१४)
- प्यार वाली लव स्टोरी (२०१४)
- पोस्ट कार्ड (२०१४)
- सौ शशि देवधर (२०१४)
- क्लासमेट्स (२०१५)
- हंटर (२०१५)
- तू हि रे (२०१५)
- फु बाई फु
- या गोजिरवाण्या घरात
- अग्नी शिखा
- साथी रे
- कस्तूरी
No comments:
Post a Comment