Friday 12 June 2015

''नागरीक'', ''शुगर साल्ट आणि प्रेम'', ''तुझ्या विना मर जावा'' व ''ओली माती''

आज तब्बल ४ मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ''नागरीक'', ''शुगर साल्ट आणि प्रेम'', ''तुझ्या विना मर जावा'' व ''ओली माती''.

जयप्राद देसाई दिग्दर्शित ''नागरीक'' या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर, डॉ श्रीराम लागू, दिलीप प्रभावलकर, मिलिंद सोमण, देविका दफ्तरदार, राजेश शर्मा, नीना कुलकर्णी, राजकुमार तांगडे, संभाजी भगत, सुलभा देशपांडे, माधव अभ्यंकर अशी तगडी स्टार कास्ट आहे.या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर यांनी भष्ट यंत्रणेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या पत्रकाराची भूमिका साकारली आहे. राज्य पुरस्कार आणि प्रभात पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला प्रत्येकी पाँच पुरस्कार प्राप्त झाले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जेष्ठ अभिनेते डॉ श्रीराम लागू बऱ्याच वर्षांनंतर मोठ्या पड्यावर दिसणार आहेत, त्यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी मेजवानी ठरणार आहे.या चित्रपटाचा ट्रेलर अतिशय आश्वासक आहे. अशा अनेक वैशिटयाने नटलेला ''नागरीक'' टिकिट खिडकीवरही यशस्वी होईल अशी अपेक्षा करुया.

आज प्रदर्शित झालेला दूसरा मराठी चित्रपट न्हणजे ''शुगर साल्ट आणि प्रेम'', या चित्रपटाचे नाव थोडे कोडयात पाडणारे असले तरी या चित्रपटातुन मराठीतील आघाडीच्या सोनाली कुलकर्णी, शिल्पा तुळसकर व क्रान्ति रेडकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, त्यांना अजिंक्य देव, समीर धर्माधिकारी व प्रसाद ओक यांनी साथ दिलेली आहे. या महिला प्रधान चित्रपटाच्या दिग्दर्शिका सोनाली बांगरेचा आहेत.

मुरली नल्लपा व अशोक कार्लेकर दिग्दर्शित ''तुझ्या विना मर जावा'' मधून विकास पाटिल व प्रार्थना बेहरे हि फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. ''मितवा'' व ''कॉफी आणि बरेच काही'' नंतर प्रार्थना बेहरे आता मराठी चित्रपट सृष्टीत बऱ्यापैकी स्थापित झाली आहे व तिचा ख़ास प्रेक्षक वर्ग ही तिने निर्माण केला आहे. या चित्रपटात प्रतीक्षा लोणकर व अतुल परचुरे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

आज ''ओली माती - तारुण्याच्या उंबरठ्यावर'' हा नरेंद्र गायकवाड दिग्दर्शित चित्रपट विदर्भात प्रदर्शित झाला.  या चित्रपटामध्ये संकेत मोरे, साहिल पटवर्धन, नेहा चिटनीस, प्रीती नारनवरे, गणेश यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा आजच्या तरूणाईवर आधारीत आहे.

No comments:

Post a Comment

किरण नाटकी