Thursday 4 June 2015

''अतिथि'', ''संदूक'' आणि ''साठ लोट पण सगळ खोट''

उद्या ३ मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ''अतिथि'', ''संदूक'' आणि ''साठ लोट पण सगळ खोट''.

आशिष पुजारी दिग्दर्शित ''अतिथि'' हि मल्टीस्टारर ब्लैक कॉमेडी आहे. या चित्रपटात विजय चव्हाण, मिलिंद शिंदे, संजय खापरे, संजय मोहिते, किशोर चौगुले, किशोर नंदलस्कर, नयन जाधव, संजीवनी जााधव, प्रशांत तपस्वी, अनंत जोग, तेजपाल वाघ, रोहित चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात होटल अतिथि देवो भव मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या पाहुण्यांची व मालकाची गोष्ट आहे.

सध्या हिंदी कलाकारांना घेऊन मराठीत चित्रपट करण्याचा ट्रेन्ड सुरु आहे, या मध्ये  आता ''संदूक'' या चित्रपटाची भर पडली आहे. अतुल काळे दिग्दर्शित या चित्रपटात सुमित राघवन व भार्गवी चिरमूले यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात शरद पोंक्षे, अरुण नलावडे, राहुल मेहेंदळे, रमेश वाणी, राहुल गोरे, शांतनु घंघाने, मंगेश सातपुते, सिद्धेश प्रभाकर, दिवेश मेंडगे, नंदकुमार पाटिल, अजित परब, फ़िरदौस मेवावाला यांच्या महत्वाच्या भूमिका आहे. अतुल काळे यांनी या आधी बाळकडू, तिचा बाप त्याचा बाप, दे धक्का, मातीच्या चूली या सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ''संदूक'' हा ऐतिहासिक विनोदी चित्रपट आहे. 

''सरकारनामा'' सारख्या मराठी क्लासिक चित्रपटाच्या दिग्दर्शिका श्रभणी देवधर प्रदीर्घ कालवधीनंतर त्यांचा नवीन चित्रपट ''साठ लोट पण सगळ खोट'' घेऊन मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. चित्रपटाच्या नावातच स्पष्ट होते की हा विनोदी चित्रपट आहे. मकरंद अनासपुरे, आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कर शोत्री अशी तगड़ी स्टार कास्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका व स्टार कास्ट यामुळे प्रेक्षकांच्या या चित्रपटापासून अपेक्षा वाढल्या आहेत.

No comments:

Post a Comment

किरण नाटकी