
''कोर्ट'' या चित्रपटासोबतच ''किल्ला'' या चित्रपटाने सुद्धा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. या वर्षीचा सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार ''किल्ला''ला मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अरुण सुद्धा युवक आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर ''टाईमपास २'' सोबत दाखवला जात आहे. शाळेतील मुलांच्या भावविश्वावर आधारित या चित्रपटाचा नितांत सुन्दर असा ट्रेलर सध्या मराठी रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा चित्रपट येत्या २६ जून ला प्रदर्शित होत आहे.
सध्या मराठी चित्रपट सृष्टीला जी नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे त्यात हे चैतन्य ताम्हणे व अविनाश अरुण यांच्या सारख्या युवा दिग्दर्शकांचा नक्कीच महत्वाचा वाटा आहे. या दोन्ही दिग्दर्शकांचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे त्यांच्या कडून भविष्य काळात चांगल्या कलाकृती बघायला मिळणार अशी अपेक्षा करुया. हिच गोष्ट मराठी चित्रपट अधिकाधिक समृद्ध होणार आहे, हे स्पष्ट करते.
No comments:
Post a Comment