''मे'' महिन्यात आता पर्यन्त फक्त ३ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी ह्या शुक्रवारी तब्बल ४ चित्रपट प्रदर्शित होत आहे, ''पेइंग घोस्ट'', ''धुरंधर भाटवडेकर'', ''सिद्धांत'' आणि ''प्राइम टाइम''.
तुम्ही पेइंग गेस्ट ऐकले असेल, पण आता दिग्दर्शक शुश्रुत भागवत प्रेक्षकांसाठी ''पेइंग घोस्ट'' हा नवीन चित्रपट घेऊन येत आहे. व पु काळे यांच्या साहित्यावर आधारीत या चित्रपटात उमेश कामत व स्पृहा जोशी यांची जोडी बघायला मिळणार आहे. ''पेइंग घोस्ट'' चा ट्रेलर मागील काही दिवसांपासून यू-टुब खुप गाजतोय, या चित्रपटाचे प्रमोशन अतिशय जोरदार पदध्तीने झाले आहे.
क्षितीज झापरकर दिग्दर्शित ''धुरंधर भाटवडेकर'' मध्ये तुम्हाला मोहन आगशे व मोहन जोशी या दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळणार आहे. सोबतच धुरंधर भाटवडेकर मध्ये किशोरी शहाणे, विजय कदम, शांतनु गंगाने, तन्वी हेगड़े, जयंत सावरकर, वृषाली हटलकर आणि दुष्यंत वाघ यांच्या भूमिका आहेत.
''फँड्री'' आणि ''शाळा'' ह्या दर्जेदार चित्रपटांच्या निर्मात्यांची निर्मिती असलेला विवेक वाघ दिग्दर्शित ''सिद्धांत '' हा चित्रपट ह्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. नातू व आजोबा यांच्या हळुवार नात्याला या चित्रपटात गणिताची पार्श्वभूमी आहे. या चित्रपटात विक्रम गोखले, स्वाती चिटनीस, गणेश यादव, माधवी सोमण, सारंग साठ्ये, अर्चित देवधर, नेहा महाजन, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत तपस्वी, सूरज सातव, बाबा आफळे, कांचन जाधव यांच्या भूमिका आहेत.
सध्या प्रेक्षकांच्या आवडी निवडी, त्यांच्या आवडीचे विषय घेऊन चित्रपट बनवण्याचा ट्रेन्ड झालाय, अशाच एक चित्रपट या शुक्रवारला प्रदर्शित होत आहे, तो न्हणजे प्राइम टाइम. टिवी वरील मालिका फक्त महिलाच नव्हे तर सर्व आबाळ वृद्धांच्या आवडीचा विषय आहे. याच विषयावर आधरित ''प्राइम टाइम'' या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रमोद कश्यप आहेत. या चित्रपटात किशोर प्रधान, मिलिंद शित्रे, सुलेखा तळवलकर, कृतिका देव, निशा परुलेकर, स्वयम जाधव, अनुराग वरळीकर, गायत्री देशमुख, जयंत गडेकर आणि सुनील बर्वे यांच्या भूमिका आहेत.

No comments:
Post a Comment