Saturday, 2 May 2015

''टाइमपास २'' चित्रपट समीक्षा

''टाइमपास २'' बद्दल सांगायचे असल्यास ''दोन घटका टाइमपास'' असे थोडक्यात वर्णन करता येईल.

''टाइमपास २'' मध्ये ''टाइमपास''चीच कथा पुढे सरकते. ऐनिमेशनच्या रूपाने सुरु झालेली चित्रपटाची कथा कुठेही रेंगाळत नाही. ''टाइमपास २''मध्ये शाब्दिक विनोदावर जास्त भर देण्यात आलाय, चुकीचे इंग्रजी उच्चारण चित्रपटाची बहुतेक पात्र करतात आणि हेच संवाद टाळ्या व हसे वसूल करतात. ''टाइमपास'' मध्ये हिट झालेले सर्व संवाद ''टाइमपास २''मध्येही ऐकायला मिळतात, त्यात विशेष नविन काही भर पडत नाही. कोकणात व मुंबईच्या समुद्र किनारी चित्रित केलेली गाणी व दृश्य प्रेक्षणीय झालेली आहेत. प्रियदर्शन जाधव व प्रिया जाधव यांनी आपले काम चोखपणे पार पाडले आहे. वैभव मांगळे व भाऊ कदम हि आपल्या भूमिकेत अगदी फिट बसले आहेत. विजु माने आपल्या छोट्या भूमिकेत प्रभावीत करतात. दगडू कुठले काम करून  श्रीमंत झालाय, तो नेमके कुठले काम करतो असे अनेक प्रश्न चित्रपट बघताना पडतात पण मसाला चित्रपटात जास्त डोके चालवायचे नसते फक्त जे समोर चालले आहे त्याचा आनंद घ्यायचा असतो. शेवटी प्राजु दगडूला मिळते का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, व त्यासाठी तुम्हाला जवळच्या चित्रपट गृहात जाऊन टाइम पास बघावा लागेल.   

''टाइमपास'' मधील सर्व पात्र मनोरंजक पद्धतीने लिहिल्यात आली असून हॉलीवुडमध्ये ज्या प्रमाणे चित्रपटाच्या सीरीज बनवण्यात येतात त्याचप्रमाणे मराठीत ''टाइमपास'' सीरीज पुढील अनेक वर्षे मराठी चित्रपट सुष्टीत धमाल करेल यात मला काहीही शंका नाही. ''टाइमपास ३ '' केव्हा येतोय हे पाहणे महत्वाचे ठरेल.

No comments:

Post a Comment

किरण नाटकी