Sunday, 31 May 2015

जून महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस

जून महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस 

  • १ जून - लक्ष्मण उतेकर (दिग्दर्शक)
  • २ जून - महेंद्र कदम (दिग्दर्शक) 
  • २ जून - सतीश सालग्रे (दिग्दर्शक)
  • २ जून - तेजश्री प्रधान (अभिनेत्री)
  • ४ जून - अशोक सराफ (अभिनेता)
  • ४ जून - हेमलता बाने (अभिनेत्री) 
  • ५ जून - महेश टिळेकर (दिग्दर्शक) 
  • ६ जून - अक्षय भिंगार्डे (अभिनेता) 
  • ६ जून -आनंद शिशुपाल (दिग्दर्शक) 
  • ९ जून - पल्लवी सुभाष (अभिनेत्री) 
  • ९ जून - समीर पाटिल (दिग्दर्शक)
  • १० जून - पुण्डलिक धुमाळ (दिग्दर्शक)  
  • ११ जून - त्यागराज खाडिलकर (संगीत दिग्दर्शक)  
  • १२ जून - युग (अभिनेता)  
  • १४ जून - मिलिंद पेडणेकर (दिग्दर्शक) 
  • १४ जून - सुनील तावडे (अभिनेता)  
  • १५ जून - राज पैठणकर (दिग्दर्शक)  
  • १५ जून - सुभाष काळे (दिग्दर्शक) 
  • १६ जून - श्रीरंग गोडबोले (दिग्दर्शक) 
  • १७ जून - सिद्धार्थ चांदेकर (अभिनेता) 
  • १७ जून - सुनील अभ्यंकर (अभिनेता) 
  • २१ जून - अशोक कार्लेकर (दिग्दर्शक)  
  • २१ जून - मृणाल कुलकर्णी (अभिनेत्री)    
  • २१ जून - रीमा लागू (अभिनेत्री) 
  • २३ जून - डॉ नेहा राजपाल (गायिका)  
  • २३ जून - जब्बार पटेल (दिग्दर्शक)  
  • २३ जून - स्वप्निल जाधव (अभिनेता) 
  • २५ जून - सई ताम्हणकर (अभिनेत्री) 
  • २८ जून - मंगेश देसाई (अभिनेता)  
  • ३० जून - निलेश साबळे (अभिनेता)
  • ३० जून - सुप्रिया मतकरी (अभिनेत्री) 
  • ३० जून - विकास समुद्रे (अभिनेता)

Tuesday, 26 May 2015

''पेइंग घोस्ट'', ''धुरंधर भाटवडेकर'', ''सिद्धांत'' आणि ''प्राइम टाइम''

''मे'' महिन्यात आता पर्यन्त फक्त ३ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी ह्या शुक्रवारी तब्बल ४ चित्रपट प्रदर्शित होत आहे, ''पेइंग घोस्ट'', ''धुरंधर भाटवडेकर'', ''सिद्धांत'' आणि ''प्राइम टाइम''.

तुम्ही पेइंग गेस्ट ऐकले असेल, पण आता दिग्दर्शक शुश्रुत भागवत प्रेक्षकांसाठी ''पेइंग घोस्ट'' हा नवीन चित्रपट घेऊन येत आहे. व पु काळे यांच्या साहित्यावर आधारीत या चित्रपटात उमेश कामत व स्पृहा जोशी यांची जोडी बघायला मिळणार आहे. ''पेइंग घोस्ट'' चा ट्रेलर  मागील काही दिवसांपासून यू-टुब खुप गाजतोय, या चित्रपटाचे प्रमोशन अतिशय जोरदार पदध्तीने झाले आहे.

क्षितीज झापरकर दिग्दर्शित ''धुरंधर भाटवडेकर'' मध्ये तुम्हाला मोहन आगशे व मोहन जोशी या दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळणार आहे. सोबतच धुरंधर भाटवडेकर मध्ये किशोरी शहाणे, विजय कदम, शांतनु गंगाने, तन्वी हेगड़े, जयंत सावरकर, वृषाली हटलकर आणि दुष्यंत वाघ यांच्या भूमिका आहेत. 

''फँड्री'' आणि ''शाळा'' ह्या दर्जेदार चित्रपटांच्या निर्मात्यांची निर्मिती असलेला विवेक वाघ दिग्दर्शित ''सिद्धांत '' हा चित्रपट ह्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. नातू व आजोबा यांच्या हळुवार नात्याला या चित्रपटात गणिताची पार्श्वभूमी आहे. या चित्रपटात विक्रम गोखले, स्वाती चिटनीस, गणेश यादव, माधवी सोमण, सारंग साठ्ये,  अर्चित देवधर, नेहा महाजन, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत तपस्वी, सूरज सातव, बाबा आफळे, कांचन जाधव यांच्या भूमिका आहेत.

सध्या प्रेक्षकांच्या आवडी निवडी, त्यांच्या आवडीचे विषय घेऊन चित्रपट बनवण्याचा ट्रेन्ड झालाय, अशाच एक चित्रपट या शुक्रवारला प्रदर्शित होत आहे, तो न्हणजे प्राइम टाइम. टिवी वरील मालिका फक्त महिलाच नव्हे तर सर्व आबाळ वृद्धांच्या आवडीचा विषय आहे. याच विषयावर आधरित ''प्राइम टाइम'' या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रमोद कश्यप आहेत. या चित्रपटात किशोर प्रधान, मिलिंद शित्रे, सुलेखा तळवलकर, कृतिका देव, निशा परुलेकर, स्वयम जाधव, अनुराग वरळीकर, गायत्री देशमुख, जयंत गडेकर आणि सुनील बर्वे यांच्या भूमिका आहेत.

Saturday, 23 May 2015

तेजस्विनी पंडित

नाटक, मालिका व चित्रपट या अभिनयाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात समर्थपणे वावरणाऱ्या अभिनेत्रीमध्ये
तेजस्विनी पंडित यांचे नाव सध्या, आघाडीवरील अभिनेत्रींपैकी एक आहे. 23 मे ला पुणे येथे जन्मलेल्या तेजस्विनी पंडित प्रख्यात अभिनेत्री ज्योति चांदेकर यांच्या कन्या आहेत. तेजस्विनी पंडित सॉफ्टवेयर इंजीनियर भूषण बोपचे यांच्याशी 2012 साली विवाहबद्ध झाल्या आहेत. त्या अभिनयासोबतच नृत्य, चित्रकला व खेळांमध्ये निपुण आहेत. ''अग बाई अरेच्या'' या चित्रपटातून त्यांनी आपली कारकिर्द सुरु केली. ''मी सिंधुताई सपकाळ'' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. ऋषिकेश जोशी दिग्दर्शित ''नांदी'' या नाटकातून त्या महत्वाच्या भूमिका साकारत आहेत. हे नाटक सध्या रंगभूमीवर खुप गाजत आहे. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''7 रोशन विला'', संजय जाधव दिग्दर्शित ''तू हि रे'' चित्रपटाचा समावेश आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्त त्यांना अनेक शुभेच्छा. 

तेजस्विनी पंडित यांचे चित्रपट
  • 7 रोशन विला 
  • युध्द (२०१५)
  • कैंडल मार्च (२०१४)
  • एक तारा (२०१४) 
  • मुक्ति (२०१२) 
  • ब्लफमास्टर (२०१२) 
  • पकड़ा पकड़ी (२०१०)
  • मी सिंधुताई सपकाळ (२०१०)
  • वाटवळ (२०१०) 
  • रानभूल (२००९)
  • टारगेट (२००९)
  • गैर (२००९)
  • नाथा पुरे आता (२००५)
  • अग बाई अरेच्या (२००४)

तेजस्विनी पंडित यांच्या अभिनय केलेल्या टि वी मालिका
  • कालाय तस्मै नमः (ETV मराठी - २०१२)
  • एकच ह्या जन्मी जानू (जी मराठी - २०१२)
  • लज्जा (जी मराठी - २०११)
  • तुझ नी माझ घर श्रीमताच (स्टार प्रवाह - २०१०)
  • गाणे तुमचे आमचे (ETV मराठी - २००७)

तेजस्विनी पंडित यांच्या अभिनय केलेले नाटक
  • नांदी 
  • येरे येरे पैसा 
  • रखेली

Friday, 22 May 2015

''अग बाई अरेच्या २'' आणि ''पाशबंध''

आज ''अग बाई अरेच्या २'' आणि ''पाशबंध'' हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत. या दोन्ही चित्रपटात स्त्री केंद्रीय भूमिकेत आहे, हे विशेष.

आज केदार शिंदे दिग्दर्शित ''अग बाई अरेच्या २'' प्रदर्शित झाला, या चित्रपटात सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत. या आधी केदार शिंदे यांनी ''अग बाई अरेच्या'', ''जत्रा'', ''यंदा कर्त्तव्य आहे'', ''माझा नवरा तुझी बायको'', ''मुक्काम पोस्ट लंडन'', ''याचा काही नेम नाही'', ''गलगले निघाले'', ''बकुला नामदेव घोटाळे'', ''इरादा पक्का'', ''ऑन ड्यूटी २४ तास'', ''खो खो'', ''श्रीमंत दामोदर पंत'' अशा दर्जेदार विनोदी चित्रपटाची मेजवानी मराठी प्रेक्षकांना दिली आहे. या चित्रपटांमधून त्याची भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्याबरोबर जोडी विशेष गाजली. हिंदी चित्रपटांनंतर सोनाली कुलकर्णी सध्या सातत्याने वेगवेगळ्या विषयावरच्या मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिका करत आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या रुपातील ''अग बाई अरेच्या २'' च्या पोस्टरना पसंतीची पावती मिळाली आहे.

आनंदराम दिग्दर्शित ''पाशबंध'' मध्ये ''एलिजाबेथ एकादशी'' फेम नंदिता धुरी यांची प्रमुख भूमिका आहे. ३० वर्षापुर्वी धुळे शहरात घडलेल्या सत्य घटनेवर हा मराठी चित्रपट आधारित आधारीत आहे.

Saturday, 16 May 2015

''सासुच स्वयंवर'', ''ऋण'' आणि ''युद्ध''

ह्या शुक्रवारी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, ''सासुच स्वयंवर'', ''ऋण'' आणि ''युद्ध''.१ मे ला प्रदर्शित ''टाइमपास २'' ने टिकिट खिडकीवर नवीन उच्चांक गाठले त्यामुळे मागील आठवड्यात मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. ह्या आठवड्यात तब्बल तीन चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे त्यांची चुरशीची स्पर्धा बघायला मिळेल.

ह्या आठवड्यात प्रदर्शित झालेले तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ''सासुचे स्वयंवर'' हा विनोदी चित्रपट आहे, ''ऋण'' व ''युद्ध'' हे सामाजिक विषयावर आधारित चित्रपट आहे.
       
ओमकार माने दिग्दर्शित ''सासुच स्वयंवर'' मध्ये  पुष्कर जोग, तेजा देवकर, विजय चव्हाण, जयवंत वाडकर, सतीश तारे व सुनील पाल यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत तर सासूच्या भूमिकेत विशाखा सुभेदार दिसणार आहेत. अगदी नावावरूनच आगळा वेगळा वाटणारा हा चित्रपट प्रेक्षकांना किती हसवतो यावरुन या चित्रपटाचे यश ठरणार आहे. 

विशाल गायकवाड़ दिग्दर्शित ''ऋण'' हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट असून यात एका ग्रामीण युवकाच्या संघर्षाची गोष्ट आहे. या चित्रपटामध्ये मनोज जोशी, नारायणी  शास्त्री, राजेश्वरी सचदेव, ओमकार गोवर्धन, विनय आपटे, विजय पाटकर, अनंत जोग, विवेक लागू, उषा नाइक व जयराज नायर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी व नारायणी शास्त्री तृतीय पंथीयांच्या भूमिकेत दिसणार आहे.

राजीव रूइया दिग्दर्शित ''युद्ध - अस्तित्वाची लढाई'' या चित्रपटात राजेश श्रृंगारपुरे, तेजस्विनी पंडित, क्रांति रेडकर, पंकज विष्णु, वर्षा उसगांवकर, स्मिता ओक, संजय कुलकर्णी, सोमनाथ तडवलकर, शीतल मंत्री यांच्या भूमिका आहेत. राजीव रूइया यांनी हिंदीमध्ये ''माय फ्रेंड गणेशा''सह अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

ह्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटामध्ये हिंदी चित्रपट सृष्टितील कलावंताच्या महत्वाच्या भूमिका आहेत, यावरून मराठी चित्रपट सृष्टिचे वाढते आकर्षण व आवाका लक्षात येतो. हे टिकून राहण्यासाठी या चित्रपटांना टिकिट खिडकीवर यश मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. 

पुढील आठवड्यात केदार शिंदे दिग्दर्शित व सोनाली कुलकर्णी यांची भूमिका असलेला ''अरे बाई अरेच्या २'' प्रदर्शित होतोय, त्यामुळे ह्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना आणखी स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे.  

Saturday, 9 May 2015

युवा दिग्दर्शकांची गगन भरारी

मागच्या रविवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात ''कोर्ट'' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे यांचा खास उल्लेख केला. युवा दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे यांच्या ''कोर्ट'' या चित्रपटाने अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी  यांनी गौरवोद्गार काढले. २८ वर्षाच्या या युवा दिग्दर्शकाने केलेल्या कामाबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. यातून दोन गोष्टी ठळकपणे दिसून येतात पहिली न्हणजे मराठी चित्रपटाने राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण केलेली नवीन ओळख, दूसरी गोष्ट न्हाणजे युवा दिग्दर्शकांची गगन भरारी. मराठी चित्रपटांनी अगदी सुरवतीच्या काळापासून राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली असली तरी आता त्यात सातत्य येताना दिसून येत आहे.

''कोर्ट'' या चित्रपटासोबतच ''किल्ला'' या चित्रपटाने सुद्धा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. या वर्षीचा सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार ''किल्ला''ला मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अरुण सुद्धा युवक आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर ''टाईमपास २'' सोबत दाखवला जात आहे. शाळेतील मुलांच्या भावविश्वावर आधारित या चित्रपटाचा नितांत सुन्दर असा ट्रेलर सध्या मराठी रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा चित्रपट येत्या २६ जून ला प्रदर्शित होत आहे.    

सध्या मराठी चित्रपट सृष्टीला जी नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे त्यात हे चैतन्य ताम्हणे व अविनाश अरुण यांच्या सारख्या युवा दिग्दर्शकांचा नक्कीच महत्वाचा वाटा आहे. या दोन्ही दिग्दर्शकांचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे त्यांच्या कडून भविष्य काळात चांगल्या कलाकृती बघायला मिळणार अशी अपेक्षा करुया. हिच गोष्ट मराठी चित्रपट अधिकाधिक समृद्ध होणार आहे, हे स्पष्ट करते. 

पुन्हा ''स्वप्निल सई''

मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक संजय जाधव यांच्या ''तू हि रे'' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त सांग रेकॉर्डिंगने झाला. या चित्रपटात स्वप्निल जोशी व सई ताम्हणकर हि ''दुनियादारी'' व ''प्यारवाली लव स्टोरी'' फेम मराठी चित्रपट रसिकांची आवडती जोडी पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. ''तू हि रे'' च्या निमित्ताने ''दुनियादारी'' व ''प्यारवाली लव स्टोरी'' नंतर दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर हे त्रिकुट पुन्हा एकदा एकत्र आलय. संजय जाधव यांच्या सारखा प्रतिभावंत छायाचित्रकार व दिग्दर्शक यांना स्वप्निल जोशी व सई ताम्हणकर सारख्या देखण्या व दर्जेदार कलवंताची जोड मिळते तेव्हा काय मैजिक होते, हे सर्व मराठी रसिकांनी ''दुनियादारी'' च्या निमित्ताने अनुभवले आहे. आता तेच मैजिक पुन्हा ''तू हि रे'' मध्ये बघायला मिळणार का? हे बघणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे. स्वप्निल जोशी व सई ताम्हणकर यांच्या जोडीला तेजस्विनी पंडित या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ''तू हि रे'' ह्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

अमित राज व पंकज पडघन ''तू हि रे'' चे संगीत दिग्दर्शक आहेत, गाणी गुरु ठाकुर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटाचे पाहिले गाणे आदर्श शिंदे यांच्या आवाजात स्वरबध्द करण्यात आले आहे.

Saturday, 2 May 2015

''टाइमपास २'' चित्रपट समीक्षा

''टाइमपास २'' बद्दल सांगायचे असल्यास ''दोन घटका टाइमपास'' असे थोडक्यात वर्णन करता येईल.

''टाइमपास २'' मध्ये ''टाइमपास''चीच कथा पुढे सरकते. ऐनिमेशनच्या रूपाने सुरु झालेली चित्रपटाची कथा कुठेही रेंगाळत नाही. ''टाइमपास २''मध्ये शाब्दिक विनोदावर जास्त भर देण्यात आलाय, चुकीचे इंग्रजी उच्चारण चित्रपटाची बहुतेक पात्र करतात आणि हेच संवाद टाळ्या व हसे वसूल करतात. ''टाइमपास'' मध्ये हिट झालेले सर्व संवाद ''टाइमपास २''मध्येही ऐकायला मिळतात, त्यात विशेष नविन काही भर पडत नाही. कोकणात व मुंबईच्या समुद्र किनारी चित्रित केलेली गाणी व दृश्य प्रेक्षणीय झालेली आहेत. प्रियदर्शन जाधव व प्रिया जाधव यांनी आपले काम चोखपणे पार पाडले आहे. वैभव मांगळे व भाऊ कदम हि आपल्या भूमिकेत अगदी फिट बसले आहेत. विजु माने आपल्या छोट्या भूमिकेत प्रभावीत करतात. दगडू कुठले काम करून  श्रीमंत झालाय, तो नेमके कुठले काम करतो असे अनेक प्रश्न चित्रपट बघताना पडतात पण मसाला चित्रपटात जास्त डोके चालवायचे नसते फक्त जे समोर चालले आहे त्याचा आनंद घ्यायचा असतो. शेवटी प्राजु दगडूला मिळते का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, व त्यासाठी तुम्हाला जवळच्या चित्रपट गृहात जाऊन टाइम पास बघावा लागेल.   

''टाइमपास'' मधील सर्व पात्र मनोरंजक पद्धतीने लिहिल्यात आली असून हॉलीवुडमध्ये ज्या प्रमाणे चित्रपटाच्या सीरीज बनवण्यात येतात त्याचप्रमाणे मराठीत ''टाइमपास'' सीरीज पुढील अनेक वर्षे मराठी चित्रपट सुष्टीत धमाल करेल यात मला काहीही शंका नाही. ''टाइमपास ३ '' केव्हा येतोय हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Friday, 1 May 2015

हाऊसफुल ''टाइमपास २''

आज रवी जाधव यांचा ''टाइमपास २'' हा हाऊसफुल चित्रपट प्रदर्शित झाला. ''टाइमपास २'' मध्ये प्रियदर्शन जाधव व प्रिया बापट यांनी ''दगडू'' व ''प्राजक्ता'' यांच्या प्रमुख भूमिका केल्या आहेत. ''टाइमपास'' मधील ''दगडू'' व ''प्राजक्ता'' प्रथमेश परब व केतकी माटेगावकर यांच्या हि महत्वाच्या भूमिका या चित्रपटात आहे. अभिनयासोबतच प्रियदर्शन जाधव यांनी ''टाइमपास २'' च्या पटकथालेखकाची महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे, ''टाइमपास'' मध्येही ते पटकथा लेखकाच्या भूमिकेत होते हे विशेष. ''टाइमपास २'' मध्ये संदिप पाठक, नयन जाधव, समीर खांडेकर, भालचंद्र कदम, वैभव मांगळे, चिन्मय केलकर, आरती वडगावकर, क्षिती जोग, उर्मिला कानिटकर, भूषण प्रधान, उदय सबनीस, सम्पदा जोगळेकर, सुप्रिया पठारे आणि शशांक केवळे अशी दर्जेदार कलाकारांची फौज आहे.

मागील काही वर्षापासून नागपूरची ''लक्ष्मी टॉकीज'' हे नागपूरमधील मराठी चित्रपटांच्या प्रेक्षकांसाठी हक्काच ठिकाण बनलय. आज ''लक्ष्मी टॉकीज'' मध्ये ''टाइमपास २'' चा पहिला शो हाऊसफुल झालाय. मी कुठल्या चित्रपटासाठी आज पहिल्यांदाच हाऊसफुलचा बोर्ड बघितला. मला टिकिट मिळाली नाही हे वेगळे सांगायला नको. अनेक प्रेक्षकांना ''टाइमपास २''चे टिकिट न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला. ३.३० च्या शो ची टिकिट मिळवण्यासाठी प्रेक्षकांनी १२. ३० वाजतापासूनच रांगा लावल्या होत्या.     

मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये फारशी स्पर्धा बघायला मिळत नाही पण आज ''टाइमपास २'' ने अक्षय कुमार यांच्या ''गब्बर''ला टिकिट खिडकीवर तगडी टक्कर दिल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. ''रवी जाधव'' व ''टाईमपास'' ची लोकप्रियता, चित्रपटाची कास्ट, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, त्यातून चित्रपटाविषयी निर्माण केलेली उत्सुकता, देखणा व भव्य संगीत प्रकाशन सोहळा या सर्वाचा गोष्टीच्या एकंदरीत नियोजनामुळे ''टाइमपास २'' ला फायदा झालाय. रवी जाधव यांना जाहिरात क्षेत्राची पार्श्वभूमी असल्यामुळे ते प्रमोशन्समध्ये निष्णात आहेत. प्रियदर्शन जाधव व प्रिया बापट सोबतच ''टाइमपास''ची जोडी प्रथमेश परब व केतकी माटेगावकर यांना ही प्रमोशनमध्ये महत्त्व देण्यात आले आहे. सोबतच सोनाली कुलकर्णी यांच्यावर ''मदन पिचकारी'' हे आइटम सांग चित्रित करण्यात आले आहे, त्यांचा हि चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वापर करण्यात आला आहे. ''टाइमपास २'' टिकिट खिडकीवर नवे रेकॉर्ड निर्माण करेल यात काहीही शंका नाही.

किरण नाटकी