आज (९ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी चित्रपट सृष्टीला आज प्राप्त झालेले स्वरुप मिळवण्यात सतीश राजवाडे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. अभिनय, मालिकांचे दिग्दर्शन आणि चित्रपटांचे दिग्दर्शन या यात्रेत सतीश राजवाडे यांनी अनेक स्मरणीय कलाकृती प्रेक्षकांना दिल्या आहेत. सतीश राजवाडे यांनी आपल्या चित्रपटांमध्ये अनेक विषय हाताळले आहेत. सतीश राजवाडे यांनी त्यांचा मराठीत गाजलेला "मुंबई पुणे मुंबई" हा चित्रपट हिंदीत "मुंबई दिल्ली मुंबई" या नावाने बनविला. सतीश राजवाडे यांनी आता आपल्या अभिनयाची सेकंड इनिंग सुरु केली असून ते "टाईम बरा वाईट" चित्रपटात डॉन च्या भूमिकेत दिसले होते. आगामी "भय'' या चित्रपटात ते महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
- मृगजळ (२००९)
- एक डाव धोबीपछाड (२००९)
- गैर (२००९)
- मुंबई-पुणे-मुंबई (२०१०)
- बदाम राणी गुलाम चोर (२०१२)
- प्रेमाची गोष्ट (२०१३)
- पोपट (२०१३)
- सांगतो ऐका (२०१४)
- मुंबई दिल्ली मुंबई (हिंदी चित्रपट) (२०१४)
- मुंबई-पुणे-मुंबई २ (२०१५)
सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिका
- असंभव (२००९)
- अग्निहोत्र (२०१०)
- गुंतता हृदय हे (२०११)
- एका लग्नाची दुसरी गोष्ट (२०१२)
No comments:
Post a Comment