आज (२६ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सुजय डहाके यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सुजय यांनी दिग्दर्शित केलेला
पहिला चित्रपट "शाळा"
हा होता. हा चित्रपट
मिलिंद बोकिळ यांच्या "शाळा"
याच नावाच्या गाजलेल्या
कादंबरीवर आधारित
होता. प्रदर्शनपूर्वीच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात
प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे
पहिल्याच चित्रपटासाठी सुजय यांच्याकडून
खुप अपेक्षा होत्या. चित्रपट
प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाकडून असलेल्या प्रेक्षकांच्या
अपेक्षा पूर्ण झाल्या आणि
सुजय पहिल्याच चित्रपटात स्टार दिग्दर्शक
बनले. त्यांनतर त्याचा दूसरा
चित्रपट "आजोबा" हा त्यांनी
हिंदितील प्रसिद्द अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला
प्रमुख भूमिकेत घेऊन बनवला. हा
चित्रपट आजोबा नावाच्या बिबट्यावर आधारित होता. या वर्षी
त्यांचा "फूंतरू" हा साइंस
फिक्शन चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात
केतकी माटेगांवकर हिची
प्रमुख भूमिका होती पण
हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे
कामगिरी करू शकला
नाही.
सुजय डहाके यांनी दिग्दर्शित
केलेले चित्रपट
- शाळा (२०११)
- आजोबा (२०१४)
- फूंतरू (२०१५)
No comments:
Post a Comment