आज (१ जानेवारी) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! आपल्या अभिनायाने आणि आपल्या भारदस्त व्यक्तीमत्वाने नाना पाटेकर यांनी चित्रपट रसिकांच्या मनात घर केलेले आहे. त्यांनी "प्रहार" या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन ही केले आहे. २०१३ साली भारत सरकारतर्फे त्यांना "पदमश्री" या सम्मानाने गौरवण्यात आले आहे. नानांना नेमबाजी या खेळाची आवड असून त्यात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. ते अभिनयासोबतच समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. अनेक सामाजिक कार्यांना व संस्थांना त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. याच भावनेतून त्यांनी २०१५ साली अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून ''नाम फाउंडेशन" या संस्थेची स्थापना केली आहे. हि संस्था शेतकरी आणि त्यांच्या कुटुम्बियांसाठी कार्यरत आहे.
आज त्यांचा महेश मांजरेकर दिग्दर्शित "नटसम्राट" हा मराठी चित्रपट प्रदर्शित आहे. हा चित्रपट नानांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.
नाना पाटेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट
- वेलकम बॅक (२०१५)
- अब तक छप्पन २ (२०१५)
- डॉ. प्रकाश बाबा आमटे (२०१४)
- द ॲटॅक ऑफ २६/११ (२०१३)
- देऊळ (२०११)
- राजनीति (२०१०)
- इट्स माय लाइफ (२००९)
- वेलकम (२००७)
- हॅटट्रिक (२००७)
- टैक्सी नम्बर ९२११ (२००६)
- अपहरण (२००५)
- अब तक छप्पन (२००५)
- पक पक पकाक (२००५)
- ब्लफ़ मास्टर (२००५)
- आँच (२००३)
- डरना मना है (२००३)
- भूत (२००३)
- वध (२००२)
- शक्ति : द पावर (२००२)
- गैंग (२०००)
- तरकीब (२०००)
- कोहराम : द एक्सप्लोजन (१९९९)
- हुतूतू (१९९९)
- युगपुरुष: अ मॅन हू कम्स जस्ट वन्स इन् अ वे (१९९८)
- वजूद (१९९८)
- गु़लाम-ए-मुस्तफ़ा (१९९७)
- यशवंत (१९९७)
- अग्निसाक्षी (१९९६)
- खामोशी : द म्यूझिकल (१९९६)
- हम दोनों (१९९५)
- क्रांतिवीर (१९९४)
- अभय (१९९४)
- अंगार (१९९२)
- तिरंगा (१९९२)
- राजू बन गया जंटलमन (१९९२)
- दीक्षा (१९९१)
- प्रहार : द फायनल ॲटॅक (१९९१)
- थोडसा रूमानी हो जाएँ (१९९०)
- दिशा (१९९०)
- परिंदा (१९८९)
- त्रिशाग्नी (१९८८)
- सलाम बॉम्बे (१९८८)
- सागर संगम (१९८८)
- अंधा युद्ध (१९८७)
- अवाम (१९८७)
- प्रतिघात (१९८७)
- मोहरे (१९८७)
- सूत्रधार (१९८७)
- अंकुश (१९८६)
- दहलीज़ (१९८६)
- आज की आवाज (१९८४)
- गिद्ध : द व्हल्चर (१९८४)
- भालू (१९८०)
- गमन (१९७८)
No comments:
Post a Comment