आज (१६ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक केदार शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! केदार शिंदे हे महाराष्ट्रातील प्रसिद्द शाहिर "शाहिर साबळे" यांचे नातू आहेत. केदार शिंदे यांनी ''अग बाई अरेच्या'', ''जत्रा'', ''यंदा कर्त्तव्य आहे'', ''माझा नवरा तुझी बायको'', ''मुक्काम पोस्ट लंडन'', ''याचा काही नेम नाही'', ''गलगले निघाले'', ''बकुला नामदेव घोटाळे'', ''इरादा पक्का'', ''ऑन ड्यूटी २४ तास'', ''खो खो'', ''श्रीमंत दामोदर पंत'' अशा दर्जेदार विनोदी चित्रपटाची मेजवानी मराठी प्रेक्षकांना दिली आहे. या चित्रपटांमधून त्याची भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्याबरोबर जोडी विशेष गाजली. हिंदीमध्ये केदार शिंदे यांनी "तो बात पक्की" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
- अगं बाई... अरेच्या (२००६)
- जत्रा (२००६)
- यंदा कर्तव्य आहे (२००६)
- माझा नवरा तुझी बायको (२००६)
- मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
- ह्यांचा काही नेम नाही (२००८)
- बकुळा नामदेव घोटाळे (२००८)
- गलगले निघाले (२००८)
- इरादा पक्का (२०१०)
- ऑन ड्यूटी २४ तास (२०१०)
- श्रीमंत दामोदर पंत (२०१३)
- खो खो (२०१३)
- अग बाई अरेच्या २ (२०१५)
No comments:
Post a Comment