Wednesday, 29 July 2015

''हायवे''च्या निमित्ताने

ह्या शुक्रवारी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, ''कैर्री ऑन मराठा'', ''मनातल्या उन्हात'' आणि ''पन्हाळा''. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ''हायवे'' हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. तशी पूर्व प्रसिद्धीही करण्यात आली होती, पण प्रदर्शनाच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. मराठीत अशा प्रकारची प्रदर्शनाची तारीख बदलण्याची अलीकडे प्रेक्षकांना सवय झाली आहे. काही दिवसांपैकी ''सासुचे स्वयवर'', ''साट लोट पण सगळ खोट'', ''बाइकर्स अड्डा'' अशा चित्रपटाच्या बाबतीत हा प्रकार घडला अाहे. मराठी चित्रपटाच्या वाढत्या संख्येमुळे दर शुक्रवारी मराठी चित्रपटाची भाऊगर्दी वाढत आहे त्यामुळे बहुधा वेळेवर प्रदर्शनाची तारीख बदलण्यात येत असावी. ''बजरंगी भाईजान'' आणि ''बाहुबली''ची टिकिट खिड़की वरची घोडदौड इतर तीन मराठी चित्रपट यामुळे ''हायवे''चे प्रदर्शन लांबवण्यात आले असावे.    
    
''वळु'' आणि ''देऊळ'' नंतर गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी या लेखक दिग्दर्शक जोडीचा ''हायवे - एक सेल्फी आर पार'' हा तीसरा चित्रपट आहे. मराठीतील पहिला रोड मूवी चित्रपट अशी या चित्रपटाची प्रसिद्धि करण्यात येत आहे. ''हायवे''मध्ये गिरीश कुलकर्णी, हुमा कुरैशी, टिस्का चोप्रा, रेणुका शहाणे, विद्याधर जोशी, मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, मयूर खंडगे, श्रीकांत यादव, किशोर चौगुले, किशोर कदम, वृषाली कदम, पूर्वा  पवार आणि नागराज मंजुळे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर एका गूढ़ रम्य चित्रपटाचा फिल देणारा आहे. अधिक सुखासाठी ''हाइवे''चा प्रवास लांबणीवर टाकण्यात आला असला तरी २८ ऑगस्टला या चित्रपटाचा आस्वाद घेण्याचा संधी सर्व प्रेक्षकांना मिळणार आहे.

Tuesday, 28 July 2015

''नच बलिये''च्या निमित्ताने

मराठी चित्रपट सृष्टितील सर्वांची आवडती नायिका अमृता खानविलकर तिच्या जोडीदार हिमांशु मल्होत्रा सह ''नच बलिये''च्या सातव्या पर्वाची विजेती ठरली आहे, त्या करीता तिचे हार्दिक अभिनंदन. या पूर्वी ही सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या मराठमोळ्या जोडीने ''नच बलिये''च्या अगदी पहिल्याच पर्वामध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे मराठी पाऊल पडते पुढे असेच न्हणावे लागेल.

अमृता खानविलकर हिने ''नच बलिये''च्या सातव्या पर्वात भाग घेतला तेव्हाच सर्व प्रेक्षकांना तिच्या विजयाबद्दल खात्री होती कारण मराठी चित्रपट सृष्टित ती तिच्या नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते. अमृताने ''नटरंग'' या चित्रपटामधील ''जाऊ दया ना घरी आता वाजले की बारा'' या लावणीने नवीन ओळख निर्माण केली. २०१२ साली आलेल्या ''आयना का बायना'' या चित्रपटात तिने नृत्य शिक्षकेची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे साकारली होती. ''महाराष्ट्राचे डांसिंग सुपर स्टार - छोटे मास्टर्स'' या शो टीवी शो मध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. अमृताने तिच्या वेबसाइट वर तिचे खास डांस परफार्मंस पण दिले आहेत ते तुम्ही http://www.amrutakhanvilkar.in/my_hits_lavani.php या लिंकवर बघु शकता.

अमृताला तिच्या पुढील कारकिर्दी साठी हार्दिक शुभेच्छा.   

''कैर्री ऑन मराठा'', ''मनातल्या उन्हात'' आणि ''पन्हाळा''

ह्या शुक्रवारी तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत, ''कैर्री ऑन मराठा'', ''मनातल्या उन्हात'' आणि ''पन्हाळा''.

संजय लोंढे दिग्दर्शित ''कैर्री ऑन मराठा'' हि प्रेम कथा असून या चित्रपटात गश्मीर महाजनी आणि कश्मीरा कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोबतच अरुण नलावडे, अमिन हाजी, करीम हाजी, किशोरी बल्लाळ, उषा नाईक, शांतनु मोघे, देविका दफ्तरदार, ओमकार कुलकर्णी, समीर खाडेकर, अमेय कुम्भार आणि सचिन देशपांडे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. गश्मीर महाजनी जेष्ठ अभिनेते रविन्द्र महाजनी यांचे चिरंजीव असून ते या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहेत. ''कैर्री ऑन मराठा'' च्या कथेला महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमावादाची पार्श्वभूमी असल्यामुळे या चित्रपटात प्रेमकथेसोबतच एक्शनचा तडका बघायला मिळणार आहे. 

''मनातल्या उन्हात'' हा वास्तव घटनेवरील आधारीत चित्रपट असून या चित्रपटात कैलाश वाघमारे, किशोर कदम, मिताली जगताप, हंसराज जगताप, समीर धर्माधिकारी, नागेश भोसले, रुचिता जाधव, छाया कदम, मंथन पाटिल यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक पांडूरंग जाधव आहेत. ''मनातल्या उन्हात'' मधून कैलाश वाघमारे नायक न्हणुन पदार्पण करीत आहेत.

नागेश भोसले दिग्दर्शित ''पन्हाळा'' हा चित्रपट या ह्या शुक्रवारी प्रदर्शित झालाय. ''पन्हाळा''मध्ये नागेश भोसले, संग्राम साळवी, समिधा गुरु, अमृता संत आणि मकरंद देशपांडे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून बदलत्या नाते संबंधावर व काळावर भाष्य करण्यात आले आहे. नागेश भोसले यांनी या पूर्वी ''अडगुल मडगुल'', ''गोष्ट छोटी डोंगराएवढी'' आणि ''गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा'' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Wednesday, 22 July 2015

मकरंद अनासपुरे

आज मराठीतील सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !! मकरंद अनासपुरे यांनी ''सरकारनामा'' या चित्रपटातुन आपली मराठी चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. २००५ मध्ये आलेल्या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ''कायद्याच बोला'' या चित्रपटाच्या यशाने त्यांना मराठी चित्रपटांमध्ये एक नवीन ओळख मिळाली. त्या नंतर अनेक विनोदी चित्रपटात त्यांनी अभिनय केला. पण विनोदी अभिनेता असा ठसा पुसण्यासाठी त्यांनी ''सुम्भराण'', ''पारध'', ''अनवट'' अशा चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ''डँबीस'' या चित्रपटाचे दिग्दर्शन हि केले आहे. सोबतच त्यांनी ''गोष्ट छोटी डोंगराएवढी'' आणि ''गल्लीत गोंधळ'' दिल्लीत मुजरा या चित्रपटांची निर्मिती केली आहे.      

मकरंद अनासपुरे यांचे चित्रपट
  • साठ लोट पण सगळ खोट (२०१४)
  • कापूस कोंड्याची गोष्ट (२०१३) 
  • दणक्यावर दणका (२०१३) 
  • वी आर ऑन - होऊन जाऊ दया (२०१३) 
  • गड्या आपल गाँव बर (२०१३) 
  • बीडचा राजा (२०१३)
  • मला एक चांस हवा (२०१२)  
  • तीन बायका फजीती ऐका (२०१२) 
  • तिचा बाप त्याचा बाप (२०११)
  • डँबीस (२०११)
  • दोन घडीचा डाव (२०११)
  • गुलदस्ता (२०११)
  • डावपेच (२०११)
  • पारध (२०१०)
  • हापुस (२०१०)
  • तुक्या तुकविला नाग्या नाचविला (२०१०)
  • अगडबम (२०१०)
  • खुर्ची सम्राट (२०१०)
  • बत्ती गुल पावरफुल (२०१०)
  • मन्या सज्जना (२०१०)
  • माय फ्रेंड गणेशा ३ (२०१०) 
  • निशानी डावा अंगठा (२००९)
  • सगळ करून भागल (२००९)
  • नऊ महिने नऊ दिवस (२००९)
  • बाप रे बाप डोक्याला ताप (२००९)
  • नो प्रॉब्लम (२००९)
  • गोष्ट छोटी डोंगराएवढी (२००९)
  • गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (२००९)
  • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२००९)
  • सासु नंबरी जवाई दस नंबरी (२००८)
  • दे धक्का (२००८)
  • डम डम डिगा डिगा (२००८)
  • उलाढाल (२००८)
  • फुल ३ धमाल (२००८)
  • ऑक्सीजन (२००८)
  • दोघात तिसरा आता सगळ विसरा (२००८)
  • साढ़े माढ़े तीन (२००७)
  • ज़बरदस्त (२००७)       
  • अरे देवा (२००७) 
  • तुला शिकविण चांगलाच धडा (२००७)   
  • जाऊ तिथे खाऊ (२००७) 
  • गाढवाचे लग्न (२००७) 
  • नाना मामा (२००६)
  • शुभमंगल सावधान (२००६)
  • खबरदार (२००६)  
  • कायद्याचे बोला (२००५) 
  • सावरखेड एक गाँव (२००४)
  • सातच्या आत घरात (२००४)
  • प्राण जाए पर शान ना जाए (२००३)
  • जिस देश में गंगा रहता है (२०००)
  • वास्तव (१९९९) 
  • यशवंत (१९९७) 
  • सरकरनामा (१९९७)  

Monday, 20 July 2015

''बायस्कोप''

ह्या शुक्रवारी चार कवितांवर आधारीत चार दिग्दर्शकांने दिग्दर्शित केलेले चार लघुपट अशा प्रकारची अभिनव संकल्पना असलेला ''बायस्कोप'' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ''बायस्कोप''मधील रवी जाधव यांच्या ''मित्रा'' लघुपटाला या वर्षी सर्वोकृष्ठ लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे हा चित्रपट चर्चेच्या झोतात आला होता. रवी जाधव, विजु माने, गजेन्द्र अहिरे, गिरीश मोहीते यांनी संदीप खरे, किशोर कदम ''सौमित्र'', ग़ालिब व लोकनाथ यशवंत यांच्या कवितांवर आधारित लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे. ''मित्रा'', ''एक होता काऊ'', ''दिले नादान'' आणि ''बैल'' अशी लघुपटाची नावे आहेत. या लघुपटांमध्ये वीणा जामकर, मृगमयी देशपांडे, संदीप खरे, कुशल बद्रिके, स्पृहा जोशी, विद्याधर जोशी, संपदा जोगळेकर, आनंद म्हैस्कर, नीना कुलकर्णी, सुहास पळशीकर, मंगेश देसाई, स्मिता ताम्बे, सागर करंडे व उदय सबनीस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

मागच्या आठवड्यात अत्यंत गाजा वाजा करून प्रदर्शित झालेल्या ''मर्डर मेस्ट्री'' ने अपेक्षे प्रमाणे कामगिरी केली नाही. समीक्षकांनी तर या चित्रपटाची खूपच धुलाई केली.   

Friday, 10 July 2015

''मर्डर मेस्त्री''

आज राहुल जाधव दिग्दर्शित ''मर्डर मेस्त्री'' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ''मर्डर मेस्त्री'' मध्ये दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी, वंदना गुप्ते, क्रांति रेडकर, संजय खापरे, मानसी नाईक, विकास कदम, कमलाकर सातपुते अशी तगडी स्टार कास्ट आहे. सस्पेंस आणि विनोदाचे आगळे वेगळे मिश्रण या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचे मार्केटिंग अतिशय जोरदार पद्धतीने करण्यात आले असून त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदीतील प्रख्यात निर्माते नाडियाडवाला मराठीत पदार्पण करीत आहे. ''मर्डर मेस्त्री''चे दिग्दर्शन राहुल जाधव यांनी या आधी ''विजय असो'' आणि ''हेल्लो नंदन'' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

मागील ३ आठवड्यात ''२ प्रेमी प्रेमाचे'', ''ब्लैकबोर्ड'', ''टाइम बरा वाईट'', ''वांटेड बायको नंबर १'', ''ड्रिम मॉल'', ''किल्ला'', ''वेलकम जिंदगी'', ''ढोल ताशे'', ''ऑनलाईन बिनलाईन'' आणि ''शटर'' असे तब्बल १० चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या शुक्रवारी फक्त ''मर्डर मेस्त्री'' हा एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Thursday, 2 July 2015

''ढोल ताशे '', ''ऑनलाईन बिनलाईन'' आणि ''शटर''

मागील दोन आठवड्याप्रमाणेच ह्या आठवड्यातही तीन मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ''ढोल ताशे'', ''ऑनलाईन बिनलाईन'' आणि ''शटर''.

अंकुर काकटकर दिग्दर्शित ''ढोल ताशे'' मध्ये जितेन्द्र जोशी, अभिजीत खांडकेकर, हृषिता भट्ट, प्रदिप वेलणकर, इला भाटे, विद्याधर जोशी, विजय अढाळकर, शेखर फडके, राजकुमार अंजूटे आणि स्व. विनय आपटे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातून ढोल ताशाच्या माध्यमातून युवकांची व राजकारणाची गोष्ट सांगण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हृषिता भट्ट मराठी चित्रपट सृष्टित पुनरागनम करत आहे.  

केदार गायकवाड दिग्दर्शित नवीन पिढीमध्ये असणाऱ्या सोशल मीडीयाच्या क्रेजची गोष्ट सांगणारा ''ऑनलाईन बिनलाईन'' हा चित्रपट ह्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमने, ऋतुजा शिंदे, प्रशांत कामत आणि पौर्णिमा मनोहर अशा यंग चार्म्सच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने केदार गायकवाड हा युवा छायाचित्रकार दिग्दर्शन न्हणुन पदार्पण करीत आहे.

या शुक्रवारी ''शटर'' हा आगळा वेगळा चित्रपट प्रदर्शित होतोय. वि के प्रकाश दिग्दर्शित ''शटर'' मध्ये सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, प्रकाश बरे, जयवंत वाडकर, राधिका हर्षे, कमलेश सावंत आणि अनिरुद्ध हरीप यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. ''नागरीक'' नंतर पुन्हा एकदा सचिन खेडेकर ''शटर''च्या निमित्ताने एका आगळ्या वेगळया भूमिकेत दिसणार आहेत. 

उद्या प्रदर्शित होणाऱ्या सर्वच चित्रपटात आघाडीचे कलावंत आहेत, ''ढोल ताशे'', ''ऑनलाईन बिनलाईन'' आणि ''शटर'' या चित्रपटाचे प्रोमोशनही अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आलेले आहे त्यामुळे मागील दोन आठवड्याप्रमाणेच याही आठवड्यात टिकिट खिडकीवर चुरशीची स्पर्धा बघायला मिळणार आहे.

मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ''ड्रिम मॉल'', ''किल्ला'' आणि ''वेलकम ज़िन्दगी'' या चित्रपटांमध्ये ''किल्ला''ने कमाईच्या बाबतीत बाजी मारली असून या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात तीन कोटींचा गल्ला जमविला आहे. स्वप्निल जोशी यांच्या ''वेलकम ज़िन्दगी''ला पण प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.

पुढच्या आठवड्यात ''मर्डर मेस्ट्री'' हा बहु-प्रतिक्षित हे चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

किरण नाटकी