गजेन्द्र अहिरे यांचा नवीन चित्रपट ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' येत्या २८ नवंबरला प्रदर्शित होतोय. मागील एका दशकापासून सातत्याने वेगवेगळ्या विषयावर दर्जेदार चित्रपटाची मेजवानी प्रेक्षकांना देणाऱ्या गजेन्द्र अहिरे यांचा हा नवीन चित्रपट ''श्रद्धेचा बाजार'' या विषयवार आधारित आहे. ''स्वामी पब्लिक लिमिटेड''च्या माध्यमातून विक्रम गोखले, विनय आपटे, सुबोध भावे व चिन्मय मंडलेकर या जुन्या व नव्या कसदार अभिनेत्यांचा अभिनय बघायला मिळणार आहे.

या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी ''नितिन देसाई'' व ''चंद्रकांत कुलकर्णी'' यांच्यासारख्या दिग्दर्शकांना सुद्धा दिग्दर्शित केले आहे. अलीकडे त्यांनी मकरंद अनासपुरे यांना पारध, सुंभराण, पिपाणी आणि अनवटच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांपुढे आणले आहे. गजेन्द्र अहिरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment