मी आज ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' बघितला, हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याची इच्छा होती पण एकूण कामाचा व्याप बघता ते आज शक्य झाले. आज चित्रपट प्रदर्शित होऊन ५१ दिवसानंतरही हा चित्रपट बघण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी होती. ८व्या आठवड्यातही हा चित्रपट गर्दी खेचतोय हेच ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो''चे व मराठी चित्रपटाचे मोठे यश आहे.
जवळपास तीन वर्षापुर्वी ''मी सिंधुताई सपकाळ'' बघितला होता, हा चित्रपट सिंधुताई सपकाळ यांच्या ''मी वनवासी'' या आत्मचरित्रावर आधारित होता. आत्मचरित्रावर आधारित हा एक उत्तम चित्रपट आहे. ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' याच परंपरेतला चित्रपट आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला मी डॉ प्रकाश आमटे यांचे आत्मकथन ''प्रकाशवाटा'' वाचले होते, त्यात त्यांनी वर्णन केलेले हेमलकसा मधील सुरुवातीचे दिवस, त्यांना आलेल्या अडचणी, अनुभव सगळेच अंगावर काटा आणणारे होते. हे पुस्तक वाचल्यावर तुम्ही संवेदनशील झाल्याशिवाय राहत नाही. कमी अधिक प्रमाणात हाच अनुभव ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' बघून येतो.
डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून हेमलकसा येथे जंगलात शून्यातून विश्व उभारले. विविध समस्यांना तोंड देत, तेथील आदिवासी समाजाला प्रतिकूल परिस्थितीत आयोग्यसेवा उपलब्ध करून दिली. तेवढ्यावरच न थांबता तिथे शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देत, तेथील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ते करीत आहेत.
एक चित्रपट न्हणुन ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' मध्ये काही उणिवा असल्या तरी या चित्रपटाची कथा थेट मनाला भिडणारी आहे. विश्वास वाटायला कठीण अशी ही सत्यकथा आहे. नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे यांच्या सोबतच सर्व सहकलाकारांचा अभिनय अगदी प्रभवशाली आहे. वास्तविक लोकेशन्सवर चित्रपट चित्रित झाल्यामुळे चित्रपटाचा प्रभाव वाढवण्यास मदत झाली आहे. चित्रपट बघताना प्रेक्षक हरवून जातातच पण चित्रपट संपल्यावर येणारे आमटे कुटुंबिय व कार्यकर्ते यांचे फोटोज बघण्यासाठी पण थांबतात, यासाठी आपण खास करून समृद्धि पोरे यांचे अभिनन्दन करायला हवे ज्यांनी हे प्रेरणादायी कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत केली आहे.
या चित्रपटात बऱ्याच वैद्यरभीय व नागपूरच्या कलाकारांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विदर्भात चित्रीकरण झालेल्या चित्रपटात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.
''प्रकाशवाटा'' ते ''डॉ प्रकाश बाबा आमटे - द रियल हीरो'' मधील मुख्य प्रेरणा आहे, बदल. ज्या प्रकारे डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी गडचिरोलीच्या आदिवासी समाजात सकारात्मक बदल घडून आणला आहे. त्याच प्रकारे आपण स्वत मध्ये व आपल्या समाजात काय सकारात्मक बदल घडून आणतो हेच महत्वाचे आहे.

No comments:
Post a Comment