Tuesday 5 April 2016

प्रशांत दामले

आज (५ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रशांत दामले मराठी रसिकांमध्ये लोकप्रिय अभिनेते आहेत  .  त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत नाटक, टीवी आणि चित्रपट या तिन्ही माध्यमावर आपला ठसा उमटवाला आहे   . त्यांनी २६ नाटकात अभिनय केला असून त्यामध्ये "चार दिवस प्रेमाचे", "जादू तेरी नजर", "गेला माधव कुणीकडे", "एका लग्नाची गोष्ट", "ओळख ना पाळख", "प्रियतमा", "मोरूची मावशी", "लग्नाची बेडी", "लेकुरे उदंड झाली", "शूss कुठं बोलायवं नाही", "नकळत दिसले सारे" आणि "कार्टी काळजात घुसली" प्रमुख आहेत. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये “अक्का”, “आई पाहिजे”, “आत्मविश्वास”, “आनंदाचे झाड’, “आम्ही दोघे राजा राणी”, “इना मिना डिका”, “एक रात्र मंतरलेली”, “एकदा पहावं करुन”, “खुळ्यांचा बाजार”, “घरंदाज”, “चल गंमत करु”, “चार दिवस सासूचे”, “तू तिथं मी”, “पसंत आहे मुलगी”, “पुढचं पाऊल”, “फटफजिती”, “बंडलबाज”, “बाप रे बाप”, “मधुचंद्राची रात्र”, “माझा छकुला”, “रेशीमगाठी”, “वाजवा रे वाजवा”, “विधिलिखित”, “सगळीकडे बोंबाबोंब”, “सगळे सारखेच” आणि “सवत माझी लाडकी” प्रमुख आहेत. त्यांच्याविषयी अधिक माहिती करीता तुम्ही त्यांच्या www.prashantdamle.com या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता.

No comments:

Post a Comment

किरण नाटकी