
काही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हिट झालेले असतात, ''टाईम पास २'' हा त्यापैकीच एक आहे. ''टाईम पास'' प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांना ''टाईम पास २''चे वेध लागले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव फेसबुकच्या माध्यमातून ''टाईम पास २'' बद्दलचे अपडेट सातत्याने पोस्ट करीत अाहेत. त्यांनीच फेसबुकच्या माध्यमातून १ मे ला ''टाईम पास २'' प्रदर्शित होईल असे जाहीर केले आहे.
दरम्यान या चित्रपटांमध्ये दगडू व प्राजक्ता भूमिकेत कोण आहे? याची उत्कंठा अगदी शिगेला पोहचली आहे. हिंदी मध्ये बरेचदा चित्रपटांमध्ये कलाकारांचा लुक व गोष्ट या विषयी गुप्तता ठेवून त्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली जाते, पण चित्रपटाच्या नायक व नायिका या विषयी अशा प्रयोग मराठी चित्रपटामध्ये पहिल्यांदा होत असावा.
No comments:
Post a Comment