Thursday, 26 February 2015

''रझाकार'' आणि ''पैसाचा पाऊस''

उद्या ''रझाकार'' आणि ''पैसाचा पाऊस'' हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे.

''रझाकार'' हि हैदराबाद मधील रझाकारांविरुद्ध सामान्य जनतेने केलेल्या संघर्षाची गोष्ट आहे. ''रझाकार''मध्ये मराठीतील सुपरस्टार सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत आहे. त्यांच्या सोबतच हिंदी चित्रपटांमधील प्रतिभावंत अभिनेता जाकिर हुसैन व ज्योति सुभाष यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक राज दुर्गे आहेत.   

उद्या प्रदर्शित होत असलेला दूसरा चित्रपट ''पैसाचा पाऊस'' हा आहे. ''पैसाचा पाऊस'' मध्ये सयाजी शिंदे , सुहास पळशीकर व कमलाकर सातपुते यांच्या प्रमुख भूमिका अाहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन जगदीश वाठारकर व शैलेन्द्र पाटिल यांनी केले आहे. मधांतरी दक्षिणेकडील चित्रपटांमध्ये अनेक भूमिका गाजविल्यानंतर आता सयाजी शिंदे मराठीमध्ये बऱ्यापैकी सक्रिय झाले आहेत.

Sunday, 22 February 2015

चित्रफित ३.० मेगा पिक्सेल

ह्या आठवड्यात ''चित्रफित ३.० मेगा पिक्सेल'' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दिवाकर घोडके दिग्दर्शित हा त्याच्या बोल्ड पोस्टर्स मुळे चर्चित आहे. सध्या वेगवेगळया विषयवार मराठी चित्रपटाची निर्मिति केल्या जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी मध्ये बोल्ड चित्रपट प्रदर्शित झाला आहे.   

Sunday, 15 February 2015

टाईम पास २

काही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हिट झालेले असतात, ''टाईम पास २'' हा त्यापैकीच एक आहे. ''टाईम पास'' प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांना ''टाईम पास २''चे वेध लागले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव फेसबुकच्या माध्यमातून ''टाईम पास २'' बद्दलचे अपडेट सातत्याने पोस्ट करीत अाहेत. त्यांनीच फेसबुकच्या माध्यमातून १ मे ला ''टाईम पास २'' प्रदर्शित होईल असे जाहीर केले आहे.

दरम्यान या चित्रपटांमध्ये दगडू व प्राजक्ता भूमिकेत कोण आहे? याची उत्कंठा अगदी शिगेला पोहचली आहे. हिंदी मध्ये बरेचदा चित्रपटांमध्ये कलाकारांचा लुक व गोष्ट या विषयी गुप्तता ठेवून त्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली जाते, पण चित्रपटाच्या नायक व नायिका या विषयी अशा प्रयोग मराठी चित्रपटामध्ये पहिल्यांदा होत असावा.  

Thursday, 12 February 2015

मितवा

स्वप्निल जोशी आणि सोनाली कुलकर्णी अभिनीत ''मितवा'' हा बहु-प्रतीक्षित मराठी चित्रपट उद्या प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी आहेत. अगदी निर्मिती पासूनच या चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटाची स्टार कास्ट व चित्रपटाचे मार्केटिंग यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता आहे. स्वप्निल जोशी या चित्रपटात युवा उद्योजकाची भूमिका साकारतोय. संगीतमय प्रेम कथा असलेला हा चित्रपट वैलेंटाइन डे च्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय, ही ह्या चित्रपटसाठी व्यवसायाच्या दृष्टीने जमेची बाजु आहे.

Friday, 6 February 2015

बाजी

आज ''बाजी'' हा बहु-प्रतीक्षित मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. ''बाजी''चे दिग्दर्शन ''पुणे ५२'' फेम निखिल महाजन यांनी केले आहे. ''बाजी''मध्ये श्रेयस तलपडे आणि अमृता खानविलकर यांची जोडी बघायला मिळणार आहे. ''बाजी''च्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनंतर श्रेयस तलपडे मराठी चित्रपटांमध्ये नायकाच्या रुपात पुनरागमन करत आहेत. दुनियादारी नंतर पुन्हा एकदा या चित्रपटात जितेन्द्र जोशी खलनायकाच्या रुपात बघायला मिळणार आहे. ''बाजी''मध्ये रवी जाधव, नागराज मंजुळे आणि गिरिजा ओक पाहुण्या भूमिकेत आहेत. पहिला मराठी सुपरहीरो चित्रपट न्हणुन ''बाजी''चे प्रमोशन केले जात आहे.

किरण नाटकी