Saturday 3 January 2015

२०१५ ची मराठी चित्रपट सृष्टि

२०१४ प्रमाणेच याही वर्षी मराठी चित्रपट सृष्टीत अनेक नवीन प्रयोग पाहायला मिळणार आहे. याची सुरवात याच शुक्रवारी ''लोकमान्य - एक युगपुरुष''ने झाली आहे.  या नंतर जनवरी महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित ''बाळकडू'', मकरंद अनासपुरे अभिनीत ''साट लोट पण सगळ खोट'' व  मल्टी स्टारर ''क्लासमेट्स'' प्रदर्शित होणार आहे.  

फरवरी महिन्यात लागोपाठ दोन मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे श्रेयस तळपदे अभिनीत ''बाजी'' व स्वप्निल जोशी अभिनीत ''मितवा''. याच महिन्यात रवि जाधव प्रस्तुत ''कॉफी आणि बरच काही'' सुद्धा प्रदर्शित होणार आहे.  

या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये एक तारा, जाणिवा, पी जी, वक्रतुंड महाकाय, बाबांची शाळा, किल्ला, सिद्धान्त, नीलकण्ठ मास्टर, बुगडी माझी सांडली ग, मर्डर मिस्ट्री, व्हाट अबाउट सावरकर याचा समावेश असणार आहे. 

No comments:

Post a Comment

किरण नाटकी